पाठ 19 आलोकाबाईस पत्र (ALOKABAIS PATRA)

 

पाठ 19 आलोकाबाईस पत्र




गाडगे महाराज (
फेब्रुवारी २३
, १८७६-२० डिसेंबर इ.स.
१९५६ ) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब
, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी ; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.

       गाडगे
महाराज / गाडगे बाबा :


नाव : डेबूजी झिंगराजी जानोरकर

जन्म : फेब्रुवारी २३, १८७६
( शेणगाव अंजनगाव
, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र)




मृत्यू: २० डिंसेंबर १९५६ वलगांव (अमरावती)

                                             तीर्थी
धोंडापाणी देव रोकडा सज्जनी


असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे
थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका
, मूर्तिपूजा
करू नका
, सावकाराचे कर्ज काढू
नका
, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या
गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.
माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून
रंजल्या-गांजल्या
, अनाथ लोकांसाठी
महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा
, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू
केली. रंजले-गांजले
, दीन दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत
असत.डोक्यावर झिंज्या
, त्यावर खापराच्या
तुकड्याची टोपी
, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर् या हातात मडके
असा त्यांचा वेश असे.




शब्दार्थ आणि टीपा :
गोरक्षण -गाईंच्या रक्षणासाठी बांधलेली इमारत.
आलोकाबाई -संत गाडगेबाबांची मुलगी
पाहुणेबोवा -आलोकाबाईचा पती (फकीरराव)
दादा-अच्युतराव देशमुख, व्यवस्थापक
बंदगी चाकरी, सेवा
पक्के ठाम,नक्की,निश्चित

ट्रस्ट विश्वस्त मंडळ

ट्रस्टी- विश्वस्थ

उचलता न येणे आश्रमातील कोणत्याही वस्तूवर अधिकार नसणे असा विश्वस्तांचा नियम
दंडक

किंमत  मान-सन्मान प्रतिष्ठा

साधु  संत,सज्जन

साहेब  मालक
परमेश्वर

वाटेला लावणे  निरोप देणे,मार्गी लावणे

भूतंग- भूतबाधित स्त्री

दाल – डाळ

घुसणे  बळजबरीने प्रवेश करणे

खटला भरणे पोलिसांत लेखी तक्रार नोंदविणे

उदार  मोठ्या मनाचा

कबीराची बाई  संत कबीर यांची पत्नी

कुछ – काहीतरी,थोडे

उद्धार करणे  सुधारणा करणे

गहाण  गरजेपोटी पैसे घेण्यासाठी त्या बदल्यात मौल्यवान
वस्तू ठेवणे

भंडारा  महाप्रसादाचे जेवण

भुकेकु  भूक
लागलेला

दैनावस्था  गरीबी

अन्नछत्र  मोफत जेवणाची व्यवस्था




प्र 1. खाली
दिलेल्या चार पर्यायातून योग्य उत्तर निवडून लिहा

आलोकाबाई या गाडगे महाराजांच्या कोण होत्या?
अ) बहीण

ब) पत्नी

क) मुलगी

ड) आई

उत्तर –क) मुलगी
2) तुला भूत लागले असे गाडगेबाबा
म्हणतात.

अ) पैशाचे

ब) खाण्याचे

क) पाण्याचे

ड) कपड्यांचे

उत्तर –अ) पैशाचे
3) गोरक्षणाचे व्यवस्थापक कोण होते?
अ) पाहुणेबोवा

ब) गाडगेबाबा

क) दादा

ड) वासुदेव

उत्तर –क) दादा
4) कबीराच्या मुलाचे नाव होते
अ) रहीम

ब) कमाल

क) जमाल

ड) कलाल

उत्तर –ब) कमाल






प्र2. खालील
प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1)
आलोकाबाईंच्या मुलाचे नाव
काय
?
उत्तर – आलोकाबाईंच्या मुलाचे नाव वासुदेवराव असे होते.
2) गाडगेबाबांनी दादांना काय
सांगण्यास सांगितले आहे
?
उत्तर -गाडगेबाबांनी दादांना पाहुणेबोवांचे दोन रुपये बंद
करण्यास सांगितले आहे.

3) साधूच्या घरातील माणसे कशी असतात
?
उत्तर – साधूच्या घरातील माणसे उदार असतात.
4) कबीरांनी संतांना कसे जेवू घातले?
उत्तर – कबीरांनी बाईला वाण्याच्या घरी गहाण ठेवून संतांना जेवू
घातले.

प्र3. रिकाम्या
जागी योग्य शब्द भरा.

1) तू मेल्याशिवाय भूत
निघणार नाही.

2)
दादांचे नाव अच्युतराव
देशमुख
होते.

3)
कर साहिबकी बंदगी और
भुकेकु कुछ दे.

4)
गाडगेबाबांजवळ बारा
आणे त्याग असेल तर आलोकाबाईकडे एक रुपया त्याग असावयास पाहिजे.





प्र4. जोड्या
जुळवा.

     अ                                     ब 
1. दादा                         क.आश्रमाचे व्यवस्थापक
2.
वासुदेव                     
ड.आलोकाबाईचा मुलगा


3.
आलोकाबाई             
इ.गाडगेबाबांची मुलगी


4.
पाहुणेबोवा                 ड.आलोकाबाईचा पती
5.
कमाल                         
ब.कबीरपुत्र

प्र5. खालील
प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1.
पाहुणेबोवांना पोलिसांच्या
ताब्यात देण्याची शक्यता का होती
?
उत्तर -पाहुणे बुवांनी न विचारता धर्म शाळेतील खोलीतले सामान
काढून खोलीत घुसले होते. गाडगेबाबा नस
ते
तर ट्रस्टीनी खटला भरून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची शक्यता होती.

2.गोरक्षणाच्या लोकांचे प्रेम
संपादन करण्यासाठी आलोकाबाईनी कसे वागण्याचा सल्ला गाडगेबाबांनी दिला
?
उत्तर -तुमच्यावर गोरक्षणाच्या लोकांचे एवढे प्रेम असायला
पाहिजे की त्यांनी तुम्हाला आपल्या खोलीत राहायला सांगायला पाहिजे होते.पण तुम्हाला
कोणीही विचारत नाही.शहाणे असला तर तेथे राहू नका हा सल्ला दिला.





प्र6. खालील
प्रश्नांची प्रत्येकी चार- र-पाच वाक्यात उत्तरे लिहा.

1)
साधूच्या घरातील माणसे
उदार असतात हे सांगण्यासाठी गाडगेबाबांनी कोणती उदाहरणे दिली आहेत
?
उत्तर – साधूच्या घरातील माणसे उदार असतात तुकाराम बुवा उदार
तसेच त्यांची मुलेही उदार कबीर उदार कमाल उदार कबीरांची बाईही उदार संत आले कबीर
यांच्या घरी कबीर आणि बाईला वाण्याच्या घरात गहाण ठेवून संतांना जेऊ घातले मरता
मरता कबीरानी मुलाला धर्म सांगितला.

प्र 7. खालील
प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.

1) ‘
आलोकाबाईस पत्रया पाठावरून गाडगेबाबांचा स्वभाव कसा होता हे स्पष्ट करा.
उत्तर -या पाठावरून असे समजते की गाडगेबाबांचा स्वभाव खरा
होता.दुसऱ्याला वेळीच मदत करून माणुसकी राखण्याचा होता व स्पष्ट होता.असे दिसून
येते की आपल्या स्वतःच्या मुलीच्या जावयाच्या चुकीच्या वागण्याचे त्यांनी कौतुक
केले नाही.समाजाच्या दृष्टीने ते चूक असे होते हेच त्यांनी निदर्शनास आणले.संतांची
किंवा मोठ्या सन्माननीय व्यक्तीचे नातेवाईक असलो तरी आपण चांगली वागणूक
करावी.कसेही वागण्याची भावना चुकीची आहे.या पाठातून गाडगेबाबांचा स्वभाव कडक
,शिस्तप्रिय,प्रेमळ असा होता हे
समजते.




भाषाभ्यास :
अ. विरुद्धार्थी शब्द लिहा.
1) निश्चित x अनिश्चित
2)
अपमान x मान
3)
उदार x कंजूष
ब. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1)
खटला भरणे -पोलिसात
लेखी तक्रार नोंदविणे.

ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांवर खटला भरला.
2) उद्धार करणे
सुधारणा करणे

रामाने रावणाचा उद्धार केला.






Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *