बेळगाव जिल्ह्यातील शाळेना सुट्टी जिल्हाधिकारी मा.एम.जी.हिरेमठ (LEAVE DECLARED FOR ALL SCHOOLS OF BELGAUM DISTRICT )


        10.01.2022 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तपशीलवार चर्चा केल्यानुसार कोविड-19 विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी खालील आदेश जारी करण्यात आले.

    बेळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.एम.जी.हिरेमठ यांनी जारी केलेल्यां आदेशानुसार  संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याने  सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार आणि शासन आदेश क्रमांक: (1) नुसार बेळगाव जिल्ह्यातील 1 ली ते 9 वी पर्यंतच्या सर्व माध्यम शाळा तसेच निवासी शाळांसह सर्व शाळांना 11.01.2022 पासून 18.01.2022 पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

    तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंडसंहिता अधिनियम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे आहे..

अधिकृत आदेश खालील प्रमाणे 







Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *