17.आमची गोव्याची सहल (17. aamchi govyaachi sahal)



 
विषय – मराठी 
इयत्ता – सातवी 
 



 

नवीन शब्दार्थ :

शंका कुशंका – बऱ्या वाईट विचारांची भीती अथवा संशय

आजन्म – जन्मभर, जन्मापासून,

भयावह – भीतीदायक

स्लाईड्स – लहान वस्तू पडद्यावर मोठी दर्शविण्यासाठी वापरली जाणारी काच

घाट – डोंगरावरुन जाणारा वळणावळणाचा रस्ता

वाकप्रचार :

चुळबुळ सुरु होणे – उतावळेपणा करणे.

कुरबुर करणे – असंतोष दाखविणे.

मंत्रमुग्ध होणे – आश्चर्याने तोंडातून शब्द न निघणे.

नजरेत साठविणे – डोळ्याने पाहून आपल्या लक्षात ठेवणे.

भीतीने गारठणे -अतिशय घाबरणे.

प्रस्ताव – विचार,

मंत्रमुग्ध होणे – मोहित होणे, वनराई- दाट झाडी




टीप :

नीरफणस: कोकणात व घाटमाथ्यावर आढळणारे एक फणसाच्या जातीचे फळ.

भिरंड : सोल तयार करण्यासाठी वापरले जाणारे आंबट फळ

कोकम: भिरंडाचा आंबट रस, आमसूलाचे रस

साळंद्री : अंगावर काटे असणारा एक प्राणी (साळ, साळिंद्र

पिसोळी: मुंगुसाच्या आकाराचा, शेवाळी रंगाचा मऊ केस असलेला प्राणी.

दशावतारी: कोकणात चालणाऱ्या पारंपारिक पौराणिक नाटकांचा प्रकार.

हेमाडपंथी : हेमाडपंत यांच्या स्थापत्यशास्त्रानुसार बांधकामाची पध्दत

अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. मुख्याध्यापकांनी मुलांसमोर व शिक्षकांसमोर कोणता प्रस्ताव ठेवला?

उत्तर – मुख्याध्यापकांनी मुलांसमोर व शिक्षकांसमोर गोवा सहलीचा प्रस्ताव ठेवला.

२. कावेरीला आश्चर्य का वाटले?

उत्तर – कावेरीच्या बाबांनी कोकांहीही कुरबुर न करता कावेरीला गोवा सहलीस परवानगी दिली याचे कावेरीला आश्चर्य वाटले.

३. तांबडी सुर्ला या ठिकाणी सर्वानी काय पाहिले?

उत्तर – तांबडी सुर्ला येथे सर्वानी हेमाडपंथी बांधणीचे प्राचीन शिवमंदिर पाहिले.

४. चैत्री म्हणजे काय ?

उत्तर – नागेश मंदिरात चैत्र  महिन्यात विशेष पूजा केली जाते त्या पूजेला चैत्री म्हणतात.

५. मोठ्या समईची उंची किती आहे?

उत्तर – मोठ्या समईची उंची 12.5 मीटर आहे.

६. मांडवी नदी समुद्राला कोठे मिळते?

उत्तर – मांडवी नदी मिरामार येथे अरबी समुद्राला मिळते.




आ. खालील रिकाम्या जागा भरा :

१. कावेरीची परीक्षा संपताच गोवा येथे सहल जाणार होती.

२. गोव्याच्या हद्दीत लागलेले पहिले गाव मोलम.

३.पणजी हे गोव्यातील मध्यवर्ती शहर आहे.

४. कोकणात दशावतार हा नाट्यप्रकार पहायला मिळतो.

५. गोव्याची मुख्य भाषा कोंकणी  ही आहे.

६. ओल्ड गोवा येथे सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च हे प्रसिध्द चर्च आहे.

इ. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा.

१. मुले मंत्रमुग्ध का झाली?

उत्तर – गोवा हद्दीतील मोलम या गावानंतर मुले दुधसागर हे पहिले ठिकाण पहायला गेली.तेथे मुलांनी उंचावरून कोसळणारा दुधासारखा कोसळणारा पांढऱ्याशुभ्र पाण्याचा धबधबा व त्याच्या आजूबाजूला वनराई,भयावह खडक पाहून मुले मंत्रमुग्ध झाली.

२. दोनापॉल येथे विद्यार्थ्यांना काय दाखविले ?

उत्तर – दोनापॉल येथे विद्यार्थ्यांना इंडियन ओशियनोग्राफीक सेंटरला भेट दिली.तेथे मुलांनी स्लाईड्स व चित्रफितीद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांची रचना व समुद्रातील जैविक विश्वाची माहिती दाखान्यात आली.

३. अभयारण्यात विद्यार्थ्यांनी कोणकोणते प्राणी पाहिले ?

उत्तर – अभयारण्यात विद्यार्थ्यांनी ससे, मोर, साळुंद्री, पिसोळी, मुंगुस, घोरपड, हरीण, बिबटा वाघ, पट्टेरी वाघ इत्यादी प्राणी पाहिले.तेथील सर्पोद्द्यानात नाग, धामीण, घोणस, इत्यादी प्रकारचे साप पाहिले.तेरा फूट लांबीचा अजगर पाहून आम्ही भीतीने मुले गारठून गेली.

४. मसाल्याच्या बागेत विद्यार्थ्यांना काय दाखविले ?

उत्तर – ‘मसाल्याची बागेत गेल्यावर बागेच्या मालकांनी मुलांचं स्वागत करुन मुलांना बागेतील लवंग, जायफळ, मिरी, वेलदोडे इत्यादी मसाल्याच्या पदार्थाची रोपे तसेच फणस, नीरफणस, भिरंड, काजू, नारळ, सुपारी, अननस यांची झाडे दाखवून त्यांची माहिती दिली.अननस कसे लागतात हे पहावयास मिळाले.




५. गोव्यातील देवळांचे वैशिष्ट्य कोणते ?

उत्तर – गोव्यातील जास्तीत जास्त मंदिरे हेमाडपंथी बांधणीतील आहेत.येथे जास्तीत जास्त देवीदेवतांची मंदिरे आहेत.येथी देवांच्या उत्सवांना
दूरदूरचे भक्तगण येतात.
मंगेशी मंदिर,नागरी मंदिर अशी प्रसिद्ध मंदिरे येथे आहेत.म्हलासा नारायणी मंदिरासमोर 12.5 मीटर उंचीची भारतातील सर्वात उंच समई आहे.आहे.

ई. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ होतात. ते अर्थ जाणून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा.

उदा : घाट – डोंगरावरुन जाणारा वळणावळणाचा रस्ता.

आमची गाडी घाटात हळू जात होती.

घाट – एखादी गुप्त योजना

संगोळ्ळी रायण्णाने इंग्रजांच्या कचेरीवर हल्ला करण्याचा घाट घातला.

१. शिला, शीला

शिला – दगड – दगड

मंदिरातील देवाची एक शिला मूर्ती पाहून सर्व मुले थक्क झाली.

शीला – चारित्र्यवान,मुलीचे नाव  

शीला नावाची मुलगी हुशार आहे.

२. सुर सूर

सुर –  देवता

राक्षसांचा त्रास पाहून ऋषीमंडळीनी सुरांकडे धाव घेतली.

सूर – संगीतातील स्वर

मुलांनी सुरात गाणे गाईले.




३. पाट,पाट

पाट – बसावायाचा पाट

आईने आमच्या जेवणासाठी पाट मांडले.

पाट – पाणी अडवणारा बंधारा

ऊसाला पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्याने पाट बांधले.

४. पाणि – पाणी

पाणि – हात

विष्णूने आपल्या पानीत चक्र घेतले आहे.

पाणी – जल,नीर

दुपारी जेवणानंतर सर्वांनी पाणी पिले.

५. सूत – सुत

सूत –  धागा,दोरा

माझा मित्र सूत काढून त्यापासून कपडे विणतो.

सुत – मुलगा

हनुमान हा अंजनीसुत होता.

६. शिर – शीर

शिर – डोके

महाराजांनी अपराध्यांना शिरच्छेद करण्याची शिक्षा सुनावली.

शीर – रक्तवाहिनी

आपल्या शरीरात अनेक शिरा आहेत.




उ. खाली कांही वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत ते
समजून घेऊन वाक् प्रचारांचा वाक्यात उपयोग कर.

१. अभिवादन करणे – नमस्कार करणे

मी दररोज सकाळी माझ्या आईबाबांना अभिवादन करतो.

२. आकाश फाटणे – चारी बाजूंनी संकटे येणे.

कोरोनामुळे कामगारांवर एक प्रकारे आकाशच फाटले.

३. उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे.

माझ्या शिक्षांनी माल पुढील शिक्षणास उत्तेजन
दिले.

४. गळ घालणे – अतिशय आग्रह करणे, खूप विनंती

सहलीला जाण्यासाठी माझ्या मित्रांनी मला गळ
घातली.

५. दडी मारणे – लपून बसणे

पोलिसांना पाहून चोर दडी मारून बसले.

६. धावा करणे – संकट समयी मदतीला प्रार्थना करणे.

पगारासाठी व आर्थिक मदतीसाठी कामगारांनी सरकारकडे
धावा केला.

७. शब्द झेलणे – आज्ञा पाळणे.

आज्ञा देताच तानाजीने महाराजांचे शेब्द झेलले.

 




Share with your best friend :)