10.सुंदर ते ध्यान
कवी परिचय – पु.ल.देशपांडे
पूर्ण नाव – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
टोपण नाव – पु.ल. , भाई
जन्म – 8 नोव्हेंबर 1919
मृत्यू – 12 जून 2000
लेखन साहित्य –
नाटके – सुंदर मी होणार, तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी इत्यादी नाटके.
व्यक्ति चित्रे – गणगोत,’व्यक्ती आणि वल्ली‘, गुण गाईन आवडी
प्रवास वर्णन – अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी
एकपात्री प्रयोग – बटाटयाची चाळ, वाऱ्यावरची वरात, ‘असा मी असा मी‘
पुरस्कार – पद्मश्री सन्मान,महाराष्ट्र भूषण,साहित्य अकादमी,महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार,पद्मभूषण
शब्दार्थ :
■ कासे – कमरेला
■ मकर माथा – कपाळ
■औत – नांगर
■मकर कुंडले – मगरीच्या आकाराचा कानातील अलंकार
■ उबारा – ऊब
टीप : विडंबन काव्य
: अशा प्रकारच्या काव्यातून खट्याळपणे विनोदाची उधळण केली जाते.
I .
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) सुंदर ते ध्यान असे कोणाला उद्देशून म्हटले आहे.
(अ) शेतकरी
(ब) विठ्ठल
(क) औत
(ड) विळा
उत्तर – (अ) शेतकरी
(आ) शेतकऱ्यांची मकरकुंडले कोणती आहेत ?
(अ) नांगर-विळा
(ब) तुळशी हार
(क) कासे पीतांबर
(ड) घामाच्या धारा
उत्तर – (ड) घामाच्या धारा
(इ) झोपडीत रखुमाई कशी राहिली आहे?
(अ) भुकेलेली
(ब) माथ्यावर टिळा लावून
(क) कष्टणारी
(ड) कमरेवर हात
उत्तर– (अ) भुकेलेली
(ई) अन्नावीण देखील आई काय करते?
(अ) कष्ट करते
(ब) वाट पाहते
(क) आरती म्हणते
(ड) नगारे वाजविते
उत्तर – (अ) कष्ट करते
(उ) भुकेलेली पोरे आरत्या कशी म्हणत आहेत ?
(अ) घोंगडीचा उबारा घेऊन
(ब) माथ्यावर टिळा लावून
(क) पोटाचे नगारे वाजवून
(ड) कष्ट
करून
उत्तर –(क) पोटाचे नगारे वाजवून
प्र.2 खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात
लिहा
1. शेतकऱ्याचे ध्यान कशावरती आहे?
उत्तर – शेतकऱ्याचे
ध्यान शेतावर आहे.
2. शेतकऱ्यांचा पोषक कसा आहे?
उत्तर – शेतकऱ्याने
खादीचे धोतर आणि लंगोट एखाद्या पितांबरासारखं नेसलेले आहे.असा पोशाख केला आहे.
3. शेतकऱ्याला थंडीला उबारा कशाचा मिळतो?
उत्तर – शेतकर्याला
थंडीचा उबारा कांबळ्याची घोंगडी पांघरलेल्याने मिळतो.
4.चिखलाचा टिळा कोणी व कोठे लावला आहे?
उत्तर – चिखलाचा टिळा
शेतकऱ्यांनी आपल्या कपाळावर लावला आहे.
प्र.3 खालील प्रश्नांची दोन किंवा तीन
वाक्यात उत्तरे लिहा
1. भुकेलेली पोरे आरत्या कशी म्हणत असत?
उत्तर – शेतकऱ्यांची भुकेलेली पोरे आरत्या म्हणत
आहेत.आरत्या शेतकऱ्यांसाठी वडिलांच्यासाठी म्हणत आहेत आणि ही पोरे आपल्या पोटाचे
नगारे वाजवत या आरत्या म्हणत आहेत.
2. शेतकरी नांगरटी करण्यासाठी कसं निघाला आहे?
उत्तर – शेतकरी
नांगरटी करण्यासाठी खादीच्या वस्त्रांचा पितांबर धोतर व लंगोट करून निघाला आहे.त्याने
घामाच्या धारांची मकर कुंडले कानात घातली आहेत आणि
कांबळ्याच्या घोंगडी पासून उबारा मिळवला आहे.
प्र. 4 संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
1. “तुळशी हार नाही गळा
कमरेला विळा
माथ्यावर टिळा,चिखलाचा”
संदर्भ – वरील काव्याचे चरण कवी पु.ल.देशपांडे यांच्या ‘सुंदर ते ध्यान’ या विडंबन काव्यातील
आहेत.हे संत तुकारामाच्या ‘सुंदर ते ध्यान’ या विठ्ठलाच्या अभंगाचे विडंबन काव्य
आहे.
स्पष्टीकरण – या काव्यातील कवीने समाजाला आपल्या शेतीत ध्यान पिकवून अन्न देणाऱ्या या
शेतकऱ्यांच्या घरची गरिबी व त्याची स्थिती उपासमारीची कशी आहे.त्याचे दर्शन घडविले
आहे.विडंबन काव्याचे हेच वैशिष्ट्य आहे.
2. “आरत्या म्हणती
त्यांची भुकेलेली पोरे
पोटाचे नगारे वाजवोनी”
संदर्भ – वरील काव्याचे चरण कवी पु.ल.देशपांडे यांच्या ‘सुंदर ते ध्यान’ या विडंबन काव्यातील
आहेत.हे संत तुकारामाच्या ‘सुंदर ते ध्यान’ या विठ्ठलाच्या अभंगाचे विडंबन काव्य
आहे.
स्पष्टीकरण- शेतकऱ्यांची केवळ बायकोच भुकेलेली झोपलेली नसून त्यांची मुलेदेखील उपाशीपोटीच
घरांमध्ये आपल्या वडिलांच्या कर्तव्याचा गोष्टी करून त्यावर आधारित आरत्या
म्हणत.वडिलांचा मोठेपणा गात आहेत.समाजातील अन्नदात्या शेतकर्यांच्या घरची स्थिती कशी आहे.याचे दर्शन कवीने या
विडंबन अभंगातून व्यक्त केले आहे.
प्र. 5 खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा
1. नांगरटी करण्यासाठी शेतकरी निघाला असल्याचे वर्णन कसे
केले आहे?
उत्तर – शेतकरी शेतावर नांगरटी करण्यासाठी
खांद्यावर नांगर घेऊन निघाला आहे.त्यांनी पितांबरासारखे खादीचे हाताने विणलेल्या
वस्त्राचे धोतर व लंगोट नेसली असून त्यांने आपल्या कानात घामाच्या धारांची कुंडले
धारण केली आहेत.तसेच थंडीपासून संरक्षणासाठी उबारा मिळावा म्हणून कांबळ्याची घोंगडी
अंगावर घेतली आहे.गळ्यात तुळशीचा हार नेसून त्याने आपल्या कमरेला विळा कोयता खोचला
आहे आणि कपाळावर गंधासारख्या चिखलाचा टिळा लावला आहे.
2. झोपडीत रखुमाई आणि पोरे कशी राहिली आहेत त्यांचे वर्णन
करा
उत्तर – शेतकऱ्यांच्या झोपडीत त्यांची
बायको पत्नी रखुमाई मुलांची आई अपार कष्ट करणारी असल्याने पोटासाठी कसे काबाड कष्ट
करून उपास पोटीच भुकेलेली काम करत आहे.शेतकऱ्यांची मुले देखील पोटाला न मिळाल्याने
झोपडीतच आपल्या पोटाचे नगारे आपल्या हाताने वाजवीत जणू कष्टकरी बापाच्या कर्तृत्वाच्या
आरत्याच म्हणत गात आहेत.असे कवीने विडंबनात्मक वर्णन केले आहे.
प्र. 6 पुढील प्रश्नांचे आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा
1. शेतकऱ्यांचे जीवन चरित्र कसे वर्णन केले आहे? ते लिहा.
उत्तर –
कवी पु.ल.देशपांडे यांनी संत तुकारामाच्या ‘सुंदर ते ध्यान’ या अभंगाचा
आधार आपल्या सुंदर ते ध्यान या शेतकर्यांच्या जीवनाचे चरित्र करण्यासाठी
विडबन काव्यासाठी निवडले आहे.परमेश्वर विठ्ठल हा सर्वांचे भले करणारा देव तसाच
शेतकरी हा देखील स्वतः कष्ट करून शेती पिकवतो.तो देखील अन्नदाता आहे.परंतु हाच
अन्नदाता स्वतः रहातो.त्यांची पत्नी मुले बाळे कशी राहतात.जगात त्यांचे दर्शन
कवीने या विडंबन काव्यातून घडविले आहे.हा शेतकरी सकाळी उठतो.खांद्यावर नांगर घेऊन
शेत नांगरण्यासाठी शेतावर जातो जाताना.त्याने खादीच्या कपडाचे धोतर एखाद्या
पीतांबर नेसल्याच्या थाटात नेसून लंगोट करून तो नांगरट करण्यासाठी नियमित जातो.त्या
बळीराजा विठ्ठलाने आपल्या अंगावर कानात घामाच्या धारांची कवच-कुंडले एखाद्या अलंकारासारखी
धारण केलेली आहेत आणि थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कांबळ्याची घोंगडी खांद्यावर
घेतली आहेत.त्यांच्या गळ्यात विठ्ठलाप्रमाणे तुळशी हार नाहीत. परंतु त्यांनी
कमरेला विळा कोयता खोवला आहे.असा हा विठ्ठलासारखा सर्वांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरची गरिबी
मात्र उपासमारीची आहे.रखुमाईसारखी त्यांची पत्नी उपाशीपोटी घरात राहते आणि मुले देखील
उपाशी पोटी पोटांचे नगारे वाजवत.आरडाओरडा करीत आरत्याप्रमाणे घरात पडलेली असतात
असे या शेतकऱ्यांचे जीवन आहे.
भाषा अभ्यास
अ. समानार्थी शब्द लिहा
1. औत – नागर
2.घोंगडी – कांबळे,रग
3 उबारा – उष्णता
4 माथा – कपाळ,ललाट
5 मकर – मगर,सुसर
ब. खालील शब्दांचा विग्रह करून समास ओळखा
1 पोटनगारा –पोटाचा नगारा
षष्टी तत्पुरुष समास
2. मकर कुंडले –मगरी मकरी सारखे दिसणारे कानातील अलंकार
कर्मधारय समास
3. पितांबर –पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र
षष्टी तत्पुरुष समास
4. तुळशीहार –तुळशीचा हार
षष्टी तत्पुरुष समास