STATE SYLLABUS
CLASS – 8
MARATHI MEDIUM
SUBJECT – SCIENCE
PART – 2
विज्ञान
नमुना प्रश्नोत्तरे
9. Sound
विषय – विज्ञान
इयत्ता – आठवी
9. ध्वनी (Sound)
थोडक्यात महत्वाची माहिती…
ध्वनी कणांच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो.
ध्वनीला माध्यमाची (हवा,पाणी,घन)गरज असते.
ध्वनी लहरींच्या स्वरूपात प्रसारित होतात. ध्वनिलहरी अनुतरंग लहरी आहेत.
प्रकाशाच्या वेगापेक्षा ध्वनीचा वेग कमी असतो.
स्वरयंत्र – मानवी घशामध्ये आवाजाची निर्मिती करणारे स्नायू युक्त यंत्र आहे त्यास स्वरयंत्र म्हणतात. स्वर यंत्रात स्वरतंतू असतात.
ध्वनीच्या प्रसरणास माध्यमाची गरज असते.
साहित्य: काचेची हंडी,मोबाईल,फोन,वाताकर्षक,पंप
कृती – आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक काचेची हवाबंद हंडी घ्या.त्यामध्ये मोबाईल लटकवा. हंडीतील हवा वाताकर्षक पंपाने काढून घ्या.
स्पष्टीकरण :- बाहेरून ज्यावेळी कॉल कराल त्यावेळी रिंगटोनचा आवाज ऐकू येईल.पण ज्यावेळी वाताकर्षक पंपाने हवा काढून घ्याल त्यावेळी रिंगटोन चा आवाज
हळूहळू कमी होईल.
निष्कर्ष – या प्रयोगावरून आपणास असे कळते की ध्वनीच्या प्रकरणास माध्यमाची गरज असते.
आयाम – तरंगामध्ये सर्वात अधिक केलेले विस्थापन म्हणजे आयाम होय. आवाजाची तीव्रता आयाम वरती अवलंबून असते.
वारंवारता-:
प्रत्येक सेकंदाला आंदोलनाची संख्या किंवा कंपनाची संख्या म्हणजे वारंवारता होय. ध्वनीची वारंवारता Hz (हर्ट्झ)मध्ये मोजतात.
तरंगवेग -: वारंवारता व तरंग लांबी यांच्या गुणाकारास तरंग वेग म्हणतात.
1. योग्य उत्तर निवडा.
१.ध्वनीचे प्रसारण
(a) फक्त वायूमार्फत
(b) फक्त घनपदार्थामार्फत
(c) फक्त द्रवपदार्थामार्फत
(d) घन, द्रव आणि वायूमार्फत होते.
उत्तर – (d) घन, द्रव आणि वायूमार्फत होते.
2. खालीलपैकी कोणाच्या आवाजाची वारंवारता सर्वात कमी आहे?
(a) लहान मुलगी
(b) लहान मुलगा
(c) पुरुष
(d) स्त्री
उत्तर – (c) पुरुष
3. खालील विधानांमध्ये, सत्य असलेल्या विधांनापुढे ‘T’ ची खूण करा आणि असत्य विधानांपूढे ‘F’ ची खूण करा.
(a) निर्वात पोकळीत ध्वनी प्रसारित होत नाही. (T/F) ( T )
(b) कंप पावणाऱ्या पदार्थांच्या आंदोलनाची संख्या / सेकंदाला आंदोलन काल म्हणतात. (T/F) ( F )
(c) जर कंपनाचा विस्तार मोठा असेल तर ध्वनी कमजोर असतो. (T/F) ( F )
(d) मानवी कर्णांकरिता, ऐकू येण्याचा पल्ला 20 Hz ते 20,000 Hz. (T/F) ( T )
(e) कंपनाची वारंवारता कमी असताना, ध्वनीचा चढउतार जास्त असतो. (T/F) ( F )
(f) नको असलेला ध्वनी अथवा ऐकण्यास अयोग्य असलेला आवाज म्हणजे संगीत (T/F) ( F )
(g) ध्वनी प्रदूषण अंशतः बहिरेपणास कारणीभूत होते ? (T/F) ( F )
4. योग्य शब्दांनी रिकाम्या जागा भरा.
(a) पदार्थाने एक आंदोलन पूर्ण करण्याकरिता घेतलेल्या वेळेला आवर्तन काळ म्हणतात.
(b) कंपनाच्या आयामाने आवाजाचा मोठेपणा निश्चित केला
जातो.
(c) वारंवारतेचे एकक Hz आहे.
(d) नको असलेल्या आवाजाला कर्कशपणा म्हणतात.
(e) कंपनाच्या उच्चतेने ध्वनीचा कर्कशपणा निश्चित केला जातो.
5.
दोलकाची 4 सेकंदात 40 आंदोलने होतात. त्याचा आंदोलन काल आणि वारंवारता काढा.
उत्तर – वारंवारता = आंदोलन / काळ
= 40/4
= 10 Hz
काल = 1 / वारंवारता
= 1 / 10
= 0.1 Sec
6. प्रत्येक सेकंदाला 500 आंदोलन या सरासरी वेगाने डासांचे पंख कंप पावत असल्यास गुणगुणण्याचा आवाज निर्माण होतो. तर आंदोलनाचा आंदोलन काळ किती असेल ?
उत्तर – वारंवारता = आंदोलन / काळ
= 500 / 1
= 500 Hz
काळ = 1 / वारंवारता
= 1 / 500
= 0.002 Sec.
7. खालील वाद्यांमध्ये आवाज निर्मितीसाठी कोणते भाग कंप पावत असतात ते ओळखा.
(a) ढोलक (b) सितार (c) बासरी
उत्तर –
ढोलक : ताणलेले कातडे
सितार ताणलेली तार
बासरी : हवेचा स्तंभ
8. गोंगाट आणि सितार यातील फरक काय आहे? काही वेळेस संगीत गोंगाट होऊ शकतो का?
उत्तर – गोंगाट म्हणजे कानाला नकोसा वाटणारा आवाज होय.यामुळे ध्वनिप्रदूषण होते.संगीतामुळे मनाला आनंद मिळतो.कानाला पुन्हा पुन्हा ऐकण्यास योग्य असलेल्या ध्वनी होय.काही संगीत वाद्ये मोठ्या वारंवार त्याची असतात.त्यामुळे दोन्हीचा चढ-उतार जास्त होतो दोन्ही कर्कश बनतो ध्वनिप्रदूषण होते.
9. तुमच्या सभोवताली ध्वनी प्रदूषण करणाऱ्या उगमांची यादी तयार करा.
उत्तर – ध्वनी प्रदूषण करणारी कारणे खालीलप्रमाणे -:
वाढत्या कारखान्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते.
लग्नसमारंभात
उत्सव प्रसंगी वापरण्यात येणारी म्युझिक सिस्टिम.
वाढती रहदारी
वाहनांचा जास्त वापर घरगुती वापरात असलेली उपकरणे इत्यादी.
10. मानवाला ध्वनी प्रदूषण कोणत्या प्रकारे हानीकारक आहे? ते स्पष्ट करा.
उत्तर – ध्वनी प्रदूषण मानवी जीवनासाठी आणि कारक आहे ते खालील प्रमाणे स्पष्ट होईल.
उच्च रक्तदाब (B.P.)
डोकेदुखी
कानाला बहिरेपणा येतो.
हृदयविकाराचा झटका येतो.
झोप न लागणे.
अतिकाळजी.
चक्कर येणे. इत्यादी.
11. तुमचे पालक घर खरेदीस जातात. त्यांना एक रस्त्यालगतचे आणि दुसरे रस्त्यापासून तीन गल्ल्या आत घर देवू केले जाते. तुमच्या पालकांनी कोणते घर खरेदी करावे असे तुम्हाला वाटते? तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण द्या.
उत्तर – त्यांनी रस्त्यापासून आत असलेले घर घ्यावे असे मला वाटते कारण त्यांनी रस्त्यालगतचे घर जर घेतले तर वाहनांचा आवाज येईल ध्वनी प्रदूषण होईल दूर ला कचरा घरात येईल वाहनांच्या आवाजामुळे झोप लागणार नाही गोंगाट कर्कश आवाज सतत कानावर पडेल.
12. स्वरयंत्राची (larynx) आकृती कान आणि त्याचे कार्य तुमच्या शब्दात वर्णन करा.
उत्तर – स्वर यंत्र
कार्य – बोलण्यास मदत करते ध्वनी निर्माण करण्यास मदत करते.
कान –
कार्य – मानवी कान ऐकण्याचे व शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य पार पाडते.
13. वीज आकाशात कडाडतांना प्रथम प्रकाश दिसतो व नंतर काही वेळाने गडगडाटाचा आवाज ऐकू येतो. असे का होते? याचे स्पष्टीकरण तुम्ही देवू शकता ?
उत्तर – वीज आकाशात कडाडताना वीज प्रथम दिसते व नंतर काही वेळाने गडगडाटाचा आवाज येतो कारण ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग जास्त असतो.
तुम्ही काय शिकलात –
Ø कंप पावणारे पदार्थ ध्वनी निर्माण करतात.
Ø मानवात स्वरयंत्र कंप पावत असल्यामुळे ध्वनी निर्माण होतो.
Ø ध्वनी माध्यमातून (वायू, द्रव किंवा घन) प्रसारित होतो तो माध्यम नसलेल्या जागेत प्रसारित होत नाही.
Ø कानाच्या पडदयावर ध्वनी कंपनाची जाणीव होत असल्यामुळे तो मेंदूला संवेदना पाठवितो यालाच ऐकणे म्हणतात.
Ø आंदोलनाची किंवा कंपनाची प्रत्येक सेकंदातील संख्या म्हणजे आंदोलनाची (कंपनाची) वारंवारता होय.
Ø ध्वनीची वारंवारता हर्टझ् मध्ये (Hz) व्यक्त केली जाते.
Ø कंपनाचा आयाम मोठा असेल तर ध्वनी मोठा असतो.
Ø कंपनाची वारंवारता जास्त असल्यास, ध्वनीचा चढउतार जास्त असतो आणि ध्वनी कर्कश असतो.
Ø ऐकण्यास योग्य नसलेला ध्वनी गोंगाट असतो.
Ø खूप जास्त अथवा नकोसा असलेला ध्वनी, ध्वनी प्रदूषणाकडे नेतो ध्वनी प्रदूषणामुळे मानवात आरोग्याविषयक समस्या निर्माण होतात.
Ø ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
Ø रस्त्याच्या कडेने आणि जेथे शक्य असेल तेथे झाडे लावण्याने ध्वनी प्रदूषण कमी करणे शक्य आहे.
PDF DOWNLOAD LINK