इयत्ता – आठवी
विषय – मराठी
पाठ – 16
भाऊराया
शब्दार्थ आणि टीपा :
निज – स्वतःचा
अपराध – गुन्हा,चूक
कुसेल – कुजेल
संताप – राग
भातुकली – लहानपणी खेळला
जाणारा खेळ,यात स्वयंपाक करतात.राग प्रेम सारे काही खोटे खोटे असते.
कस्तुरी- हरिणाच्या बेंबीत
असणारी एक सुगंधी कातडी गाठ.
स्वाध्याय
प्र 1. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका
वाक्यात लिहा.
1) दादाला राग का आला असावा ?
उत्तर – लहानपणी भांडणांमध्ये बहिणीने भावाच्या चावा घेतला म्हणून दादाला राग आला असावा.
2) दादा कसा येईल ?
उत्तर -दादा धावत येईल.
प्र2. खालील प्रश्नाचे उत्तर तीन-चार वाक्यात लिहा.
1) दादा न येण्याची कोणकोणती कारणे बहिणीच्या मनात येतात ?
उत्तर -दादा हात न येण्याची कारणे बहिणीच्या मनात अनेक कारणे येत होती. बालपणी खेळताना आपण दादा चावा घेतला त्यामुळे
त्याला राग आला असावा.तसेच भातुकलीच्या खेळात खाऊ खाल्ल्यामुळे आपण रागावलो अशी कारणे बहिणीच्या मनात येत होती.
प्र3. खालील प्रश्नाचे उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा.
1) भाऊ रागवणार नाही हे दाखविण्यास बहिणीने कोणकोणती
उदाहरणे दिली आहेत?
उत्तर – भाऊ रागावणार नाही हे दाखविण्यास बहिणीने म्हटले कि चंद्र जसा शीतल चांदणे देतो,सोने कधीही कुजत नाही.आकाशात रंग कधीच बदलत नाही.अगदी
तसेच गुण माया आपल्या भावांमध्ये आहेत.ही उदाहरणे दिली आहेत.
प्र4. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) पाठच्या बहिणीवरी । भाऊ कसा रूसेल
संदर्भ – वरील ओळ भाऊराया लोकगीतातील आहे.
स्पष्टीकरण या लोकगीतात बहिण भाऊबीजेच्या दिवशी आतुरतेने भावाची वाट पाहत आहे तू लवकर येत नाही तेव्हा तिच्या
मनात वरील विचार व्यक्त झाले आहेत.
प्र5. रिकाम्या जागा भरा.
1) येई धावत धावत|भाऊराया
2) पाठच्या बहिणीवर ।भाऊ कसा हो
3) रंग का बदलेल आकाशाचा
प्र6. खालील प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.
1) या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर – लहानपणी भांडणांमध्ये बहिणीने भावाचा चावा घेतला म्हणून दादाला राग आला. भातुकलीच्या खेळात आणि खाल्ले म्हणून रागावले तेच त्याने मनात झाले हे सर्व अपराध पोटात घालून धावत धावत भावाला ये म्हणत आहे.पाठच्या बहिणीवर भाऊ कसा काय रागावेल असे तिला वाटले.चंद्र आग का ओतेल? काही केल्या पाठची बहीण भाऊ का संतापेल? तो आपली कस्तुरी का सोडेल? कधी सोने कुजत नाही काही केल्या तिच्या बहिणीवर भाऊ का रागवेल.तो रंग का बदलेल.असा या लोकगीताचा त्याचा सारांश आहे.
प्र. 7. जोड्या जुळवा.
अ ब
1) भातुकली दाणे खाल्ले
2) कस्तुरी सुवास
3) बाळपणी चावा घेतला
4) चंद्र आग ओकणार नाही
5) सोने कुजणार नाही