पाठ – १०
रेल गाडी
कवी – कुसुमाग्रज
नवीन शब्दांचे अर्थ
झपाट्याने – वेगाने
मंदावणे – कमी होणे
पहाड – डोंगर
धिटाई – धाडस
रेलतळ – रेल्वे स्टेशन
शीळ – शिटी
बोगदा – डोंगर पोखरुन तयार केलेला रस्ता
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. डोंगराचा घाट आल्यानंतर काय होते?
उत्तर – डोंगराचा घाट आल्यानंतर रेलगाडीचा वेग मंदावतो.
२. शीळ कुठे घुमते?
उत्तर – शीळ डोंगरात घुमते.
३. दऱ्यांमध्ये काय दिसते ?
उत्तर – दऱ्यांमध्ये जंगलाची हिरवळ दिसते.
४. गाडीने केव्हा थांबायला हवे असे कवितेतील मुलगा/मुलगी म्हणते?
उत्तर – सिग्नलचा लाल दिवा लागल्यावर गाडीने थांबायला हवे असे कवितेतील मुलगा/मुलगी म्हणते.
५. गाडीतून उतरताना कसे उतरावे?
उत्तर – गाडीतून उतरताना सावकाश उतरावे. घाई करू नये.
आ. (काळोख, वाट, पहाड, हळू, वन)
वरील कंसात दिलेल्या शब्दातून शोधून समानार्थी शब्द लिही.
१. जंगल – वन
२. मंद – हळू
३. अंधार – काळोख
४. रस्ता – वाट
५. डोंगर – पहाड
इ. खाली एकात एक असे दोन चौकोन दिले आहेत. आतील चौकोनातील शब्द व त्याच्या बाहेरील चौकोनातील शब्द यापासून जोडशब्द तयार करून लिही.
जसे – रेलतळ
खेडीपाडी
शेतीवाडी
रानेवने
गाठभेट
घरदार
ई. खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर.
१. झपाट्याने मागे जाती
रानेवने खेडीपाडी
2. सरे बोगद्याची वाट
गाडी उजेडात येई
३.सिग्नलचा लाल दिवा
हवे इथे थांबायला!
४. सावकाश उतरावे
नका करू घाई फार
उ.
नमुन्याप्रमाणे लिही.
उदा. डोंगर – डोंगरावर
१. घर – घरावर
२. झाड – झाडावर
३. शेत – शेतावर
४. फळ – फळावर
५. दार – दारावर
ऊ. तू कोणत्या वाहनातून प्रवास करतोस त्यांची नावे लिही.
उत्तर – मी मोटारगाडी,बस,रेल्वे,विमान, ट्रक, टँपो,मोटारसायकल,बैलगाडी इत्यादी वाहनानी प्रवास करतो.
ऐ. वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांची चित्रे व नावे यांच्या जोड्या जुळव.