इयत्ता – सातवी
विषय – मराठी
8. परोपकाराचे फळ
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1. चोरांचा धनी कोण होता ?
उत्तर : चोरांचा धनी भीमनायक होता.
2. वैद्याच्या पत्नीचे नाव काय होते ?
उत्तर : वैद्याच्या पत्नीचे नाव रत्ना होते.
3. वैद्याचे घर कोठे होते ?
उत्तर : वैद्याचे घर जंगलापलीकडील छोट्या खेड्यात होते.
4. अक्राळ विक्राळ माणसाने वैद्याना कोणती विनंती
केली ?
उत्तर : दया करा,अन् माझ्या मुलाला वाचवा‘ ही
विनंती अक्राळ विक्राळ माणसाने वैद्यांना केली.
5. गाठोड्यातून चोरांनी काय आणले होते ?
उत्तर : गाठोड्यातून चोरांनी वैद्याच्या घरातून चोरलेल्या
सर्व वस्तू आणल्या होत्या.
आ.खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे
लिही.
1. वैद्याची पत्नी वैद्यावर का रागावली होती ?
उत्तर : वैद्याची पत्नी गावाबाहेरच घर नको म्हणत असताना
वैद्यांनी ते घर घेतले होते.घर गावाबाहेर असल्यामुळे घरात चोरी झाली होती.चोरांनी
घरात एक पैसा,धान्याचा कणही ठेवला नव्हता.म्हणून वैद्याची पत्नी वैद्यावर रागावली
होती.
2.चोरांच्या बरोबर जाताना वैद्याच्या मनात कोणते
विचार आले ?
उत्तर: ‘हे लोक आपल्याला फसवणार तर नाहीत ना? नको
म्हटलं तरी पोलिसांनी आपल्या घरातील चोरीचा तपास चालूच ठेवला आहे.त्यामुळे यांचा
मला मारायचा तर विचार नाही ना?तस झालं तर रत्नाचं काय होणार? चोरांच्या
बरोबर जाताना वैद्याच्या मनात हे विचार येत होते.
3. चोरांचा अवतार कसा होता ?
उत्तर: चोर दिसायला काळे व धिप्पाड होते. डोक्यावर केस
वाढलेले व अस्ताव्यस्त होते.विजार घातलेली,अंगावर काळी घोंगडी घेतली होती.
4. चोरांच्या धन्याचे मनपरिवर्तन कसे झाले ?
उत्तर : ‘रक्षण करणं हे देवाच काम…मारणं हे राक्षसाचं काम‘ वैद्याने
सांगितलेले हे शब्द भीमनायकाच्या मनाला भिडले.त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. ‘मी रक्षण
करण्याचं कोणतंही काम केल नाही. देव मला कशी मदत करणार?’ हा
विचार मनात येऊन चोरांच्या धन्याचे मनपरिवर्तन झाले.
5. वैद्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर मंद हास्य का
उमलले ?
उत्तर: कारण वैद्यांच्या
उच्चारलेल्या शब्दांमुळे चोराचा नायक भीमनायकाचे मनपरिवर्तन झाले होते.त्यामुळे दुसऱ्याच
दिवशी भीमनायक स्वतः वैद्याच्या घरी चोरलेल्या वस्तू परत देण्यासाठी आला होता.भीमनायकाने
वैद्यांना नमस्कार करून माफी मागीतली व दया करून हे आपलं साहित्य घ्या.अशी विनंती
केली म्हणून वैद्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमलले.
खालील वाक्ये कोणी कोणाला म्हटली ते लिहा.
1. “काय डोंबल मिळणार समाजाकडून?”
उत्तर : हे वाक्य वैद्याच्या पत्नींने वैद्यांना उद्देशून
म्हटले आहे.
2. “आपल अंथरुण माझ्या मुलाच्या शेजारी आहे.
तेवढं मात्र आणलं नाही.”
उत्तर : हे वाक्य भीमनायकाने वैद्यांना उद्देशून म्हटले
आहे.
3. “आम्ही चोरी करायला आलो नाही, मालक, औषधासाठी आलोय.”
उत्तर : हे वाक्य भीमनायकाने पाठवलेल्या माणसांनी वैद्यांना
उद्देशून म्हटले आहे.
4. “आमच हे वैद्यकीय ज्ञान पैसा कमविण्यासाठी
नाही, समाजाच्या सेवेसाठी आहे.”
उत्तर : हे वाक्य वैद्यांनी त्यांच्या पत्नीला उद्देशून
म्हटले आहे.
खालील वाकप्रचारांचा अर्थ सांगा.
1. दाताच्या कण्या करणे –
एखादी गोष्ट खूप वेळा सांगणे
2. ददात असणे – कमतरता असणे
3. पाय थरथर कापणे – खूप
भिती वाटणे
4. अंगावर शहारे येणे – अतिशय
भिती वाटणे / रोमांचीत होणे
5. अंतःकरण भरून येणे – मनात भावना दाटून येणे
रिकाम्या जागा भर.
1. कृष्णपक्षातील चतुर्दशीची रात्र होती.
2. वैद्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर समाधानाचे मंद हास्य
उमलले.
3. रक्षण करणं हे देवाचं काम आहे.
4. वैद्यकीय ज्ञान हे समाजाच्या सेवेसाठी आहे.
ऊ. नमुन्यात दाखविल्याप्रमाणे खालील शब्दांना
प्रचलित उच्चारले जाणारे शब्द लिही.
1. मेज – टेबल
2. लेखणी – पेन
3. तसबीर – फोटो
4. भ्रमणध्वनी – मोबाईल
5. शस्त्रशल्य – विशारद सर्जन
6. अग्निस्थ विश्रामधाम – रेल्वे स्टेशन
7. दूरवाणी- रेडिओ
8. दूरदर्शन – टी.व्ही./ टेलिव्हिजन
9. दिनदर्शिका – कॅलेंडर