Mula Devagharachi Fula.



    

मुलं देवाघरची फुलं..!!

AVvXsEgD B8nShhJhuf4E57SZmsuI2rmNa4z7Hxi44xmAmALuH0huerLXJ6MtUVHmemyl 2WFEwUS5VPdC4kRtyRlso5nL u6DZjNF4xgd3tVnaE7xN0OOAJsb5PkRrwKEA WBthA80OcSOCfuo2n64Jql90Wq8xhtIGRBG9n VnASvCjB35oezqyUlyCKJjzQ=w200 h200
अनमोल सहकार्य – श्री. गिरीष दारुंटे सर,मनमाड. नाशिक 

        पंडीजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता.मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरूंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ” मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे”, याबाबत ते आग्रही असत.

मुला-फुलांबाबतचा जिव्हाळा नेहरुंच्या रोमारोमात भिनलेला होता. एक दा तर होळीच्या दिवशी त्यांच्या निवासस् थानी शाळकरी मुलं आली आहेत, हे कळताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून ते मुलांवर रंग उधळण्यासाठी मुलांच्या दिशेने धावले. मुठीमुठीने त्यांनी मुलांवर गुलाल उधळला. परंतु आपल्यावर गुलाल उधळण्यास मुले संकोच करीत असल्याच पंडितजींना जाणवलं. मी तुम्हांला मोठा वाटतो का ? असे असेल तर मी खाली बसतो आणि सांगा बघू आता, कुठे आहे मी मोठा? झालो की नाही आता लहान! अगदी तुमच्या एवढा! आता चला उडवा माझ्यावर गुलाल! आपलं वय विसरुन, आपलं मोठेपण विसरुन ते लहान मुलांमध्ये लहान होत असत. जणू अगदी बाल नेहरुच! मुलांना ते देवा घरची फुलं’ अशी उपमा देत असतं. म्हणूनच मुलं पंडितजींना आदरानं चाचा नेहरु म्हणत असतं.

14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जयंती दिन खऱ्या अर्थाने ‘बालदिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.


वरील भाषणाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा… CLICK HERE 


Pdf व संकलन : गिरीष दारुंटे सर, मनमाड

Share with your best friend :)