इयत्ता – आठवी
विषय – मराठी
12. वाट चुकल्याचा आनंद
लेखक – ना. सी. फडके
लेखक परिचय :
पूर्ण नाव – प्रा. नारायण सीताराम फडके (1894-1978)
ना. सी. फडकेना लेखक, प्राध्यापक, कथा, लघुनिबंध, चरित्र, आत्मचरित्र, नाटक या सर्व क्षेत्रात लीलया संचार करणारे म्हणून ओळखले जाते. लेखन कार्य –
कादंबऱ्या – आल्ला हो अकबर, कुलाब्याची दांडी, दौलत, निरंजन, अखेरचे बंड अशा 84 कादंबऱ्या;
लघुनिबंध – गुजगोष्टी, नव्या गुजगोष्टी हे
लघुनिबंध संग्रह
त्यांना लघुनिबंधाचे प्रवर्तक असे म्हटले जाते. रत्नागिरी येथे भरलेल्या अ.भा.म.सा. सम्मेलनाचे ने अध्यक्ष होते.
नवीन शब्दार्थ –
मळलेली – रुळलेली
गर्द – दाट
हिंगण बेट – खुरटी काटेरी वनस्पतींची झुडुपे
माथा – डोंगर टोकावरील सपाट जागा
खडक -पाषाण,पसरट दगड
तरंगणे – आकाशात फिरणे
अकृत्रिम – नैसर्गिक
विसावा – विश्रांती
क्षितिज – जेथे आकाश जमिनीला टेकले सारखे भासते ती जागा.
इंद्रधनुष्य – सूर्य असताना पाऊस पडल्यावर आकाशात दिसणारे
सप्तरंगी कमान.
अकस्मात – अचानक
आदमास – अंदाज
अपूर्व – पूर्वी न पाहिलेले
रंगछटा – विविध रंगांचे दर्शन
प्र1. खालील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडा.
1. लेखक बाजारात का गेले होते?
अ. भाजी आणण्यास
ब. कागद आणण्यास
क. गाव पाहण्यास
ड. फिरण्यासाठी
उत्तर – ब. कागद आणण्यास
2. लेखक मित्राच्या घरी कशासाठी गेले होते?
अ. चहासाठी
ब. भेटण्यास
क. पुस्तक आणण्यासाठी
ड. लग्न ठरविण्यासाठी
उत्तर – अ. चहासाठी
3. लेखकांनी घरच्या मंडळींना काय कबूल केले होते?
अ. सिनेमाला जाण्याचे
ब. मंदिराला जाण्याचे
क. फिरायला जाण्याचे
ड. नाटकाला जाण्याचे
उत्तर – क. फिरायला जाण्याचे
4.’वाट चुकल्याचा आनंद‘ या पाठाचे
मूल्य कोणते आहे?
अ. लघुनिबंध
ब. व्यक्तीमहात्म्य
क. निसर्गप्रेम
ड. प्रामाणिकपणा
उत्तर – क. निसर्गप्रेम
प्र 2. खालील
प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. ना.सी. फडके यांचे पूर्ण नाव काय?
उत्तर – नारायण सीताराम फडके हे त्यांचे पूर्ण नाव होय.
2. वाट चुकल्याचा आनंद हा पाठ कोणत्या पुस्तकातून निवडला आहे?
उत्तर – वाट चुकल्याचा आनंद हा पाठ गुजगोष्टी या पुस्तकातून निवडला आहे.
3. लेखक कोठे राहावयास गेले होते?
उत्तर – लेखक महाबळेश्वरला राहावयास गेले होते.
प्र 3. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा.
1. लेखक दचकून केव्हा उठले?
उत्तर – महाबळेश्वरला लेखक एका मित्राच्या घरी चहासाठी गेले.घरच्या मंडळींना चार वाजता फिरायला नेण्याचे त्यांनी कबूल केले होते.पण गप्पांच्या ओघात साडेचार वाजल्याचे ऐकताच दचकून उठले.
2. लेखक उजव्या हाताकडील झाडीत का घुसले?
उत्तर – मित्राच्या घरापासून बंगला बराच लांब होता.रस्ता वळणाचा व चढ-उताराचा होता.त्या मार्गाने गेल्यास वेळ होईल या विचाराने जंगलात घुसून बंगल्याच्या दिशेने गेल्यास आपला वेळ वाचेल म्हणून लेखक उजव्या हाताकडील झाडीत घुसले.
प्र4. संदर्भासह स्पष्टीकरण करा –
1. साडेचार वाजल्याच कुणी सहज म्हटलं…
संदर्भ – वरील वाक्य ना.सी.फडके लिखित ‘वाट चुकल्याचा आनंद‘ या पाठातील आहे.
स्पष्टीकरण- हे वाक्य मित्राच्या घरातील लोकांनी म्हटले असून जेंव्हा लेखकाला गप्पांच्या ओघात वेळेचे भान न राहता गप्पा मारत बसले होते तेंव्हा म्हटले.
2. पुन्हा केव्हातरी वाट चुकावी अशी माझी इच्छा आहे.
संदर्भ – वरील वाक्य ना.सी.फडके लिखित ‘वाट चुकल्याचा आनंद‘ या पाठातील आहे.
स्पष्टीकरण –जंगलात वाट चुकल्यामुळे महाबळेश्वरचा न पाहिलेला भाग काळे ढग,अचानक आलेला पाऊस नंतर आलेले ऊन व त्यानंतरचे सुंदर असे सृष्टीचे अकृत्रिम मनोहर दृश्य पहावयास मिळाले.त्यावेळी लेखकाने वरील वाक्य म्हटले आहे.
प्र 5. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.
1. लेखकाने कोणती निसर्गशोभा पाहिली ?
उत्तर – वाट चुकल्यामुळे लेखकाला महाबळेश्वरच्या डोंगराचे कधी न पाहिलेले भाग पाहिले.एका नदीच्या टोकावरील कड्यावर तो बसला होता.आकाशात प्रचंड ढग काळे विमाना प्रमाणे तरंगत होते. तोच वाऱ्याचे झोत उठले व पाऊस सुरू झाला.शत्रूवर अचानक छापा घालून पुढे निघून जाणाऱ्या सैन्याप्रमाणे गायब झाले.पुन्हा आकाशात प्रचंड कमान आपल्या कडे सरकत येत आहे अशी निसर्गशोभा लेखकाने पाहिली.
2. क्षितिजावर इंद्रधनुष्य केव्हा प्रकट झाले ?
उत्तर – लेखक ज्या कड्यावर थांबले होते.तेथे काळे काळे प्रचंड ढग माथ्यावर येऊन तरंगू लागले होते. वाऱ्याच्या झोतामुळे त्या ढगातून पाण्याचे थेंब पडले होते.जलधारांची दाटी व्हायला लागली होती.शत्रूवर अचानक छापा करून पुढे निघून जाणाऱ्या सैन्यांच्या त्याप्रमाणे भराभरा निघून चालले होते.आकाशाचा निळा रंग पुन्हा प्रकट झाला होता.नंतर दहा पंधरा मिनिटांनी सूर्यप्रकाशही पुन्हा पहिल्या थाटाने जिकडेतिकडे भरला आणि अखेर पूर्व क्षितिजावर प्रचंड इंद्रधनुष्य प्रकट झाला.
प्र6. खालील प्रश्नांची उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.
1. आकाशात ढंग आल्यानंतरच्या दृष्याचे वर्णन करा.
उत्तर – आकाशात काळे काळे ढग हवेत तरंगू लागले होते जणू ते मोठमोठी काळ्या काळ्या रंगाची कुठली तरी विमाने तिथे येऊन हवेत क्षणभर विसावा घेत होती.वाऱ्याचे वाकडे तिकडे झोत हवेत उठले अन् ढगातून पाण्याचे थेंब पडू लागले.जलधारांची दाटी विरळ विरळ व्हायला लागली होती. शत्रूवर अचानक छापा घालून पुढे निघून जाणाऱ्या सैन्याच्या थव्याप्रमाणे ढग भराभरा निघून चालले होते. आकाशाचा निळा रंग पुन्हा प्रकट व्हायला लागला होता.
भाषाभ्यास :
पुढील ओळीतील अलंकार ओळखा व व्याख्या लिहा.
1. जणू मोठमोठी काळ्या काळ्या रंगाची कुठली तरी विमाने येऊन हवेत क्षणभर विसावा घेत होती.
उत्तर – उत्प्रेक्षा अलंकार
व्याख्या – उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
2. शत्रूवर अचानक छापा घालून पुढे निघून जाणाऱ्या सैन्याच्या थव्याप्रमाणे ढग भरभरा निघून चालले होते.
उत्तर – उपमा अलंकार
व्याख्या – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.