इयत्ता – सातवी
विषय – मराठी
१३. संतवाणी
कवी/ संत परिचय –
संत ज्ञानेश्वर –
पूर्ण नाव – ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्म – 1275 साली पैठण येथे झाला.
मूत्यू –1296 मध्ये आळंदी येथे वयाच्या
२१ व्या वर्षी जिवंत समाधी घेतली.
v मराठीतील श्रेष्ठ संतकवी म्हणून ज्ञानेश्वरांना ओळखले जाते.
ग्रंथसंपदा – ‘भावार्थ
दीपिका‘ (ज्ञानेश्वरी), ‘अनुभवामृत (
अमृतानुभव)‘, ‘चांगदेव पासष्टी‘
भागवत धर्माच्या झेंडयाखाली सर्व जाती जमातीच्या लोकाना त्यांनी एकत्र आणले.
संत तुकाराम-
पूर्ण नाव – तुकाराम बोल्होबा मोरे
(आंबिले)
जन्म – 1608 साली देहू येथे
झाला.
मूत्यू –1650 मध्ये देहू येथे श्री विठ्ठलाने त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे
मानले जाते.
साहित्य रचना – तुकारामाची गाथा (सुमारे साडे
चार हजारहून अधिक अभंग)
सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवन व्यवहारातील उदाहरणे,दृष्टांत
देऊन लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी सुमारे साडेचार हजारांहून अधिक अभंग लिहिले
आहेत. त्यांच्या काव्यपंक्ती आजही म्हणींप्रमाणे सर्वसामान्यांच्या जिभेवर खेळतात.
नित्य व्यवहारात जागोजागी वापरल्या जातात.
संत रामदास-
पूर्ण नाव – नारायण सूर्याजी ठोसर
जन्म – 1608 साली जांब या
गावी झाला.
मूत्यू –1681 साली मरण पावले.
साहित्य रचना –दासबोध, करुणाष्टके, अभंग,
मनाचे श्लोक,स्त्रोत्रे इत्यादी.
संत रामदास स्वामींची भाषा ठसठशीत, नेमकी,
सुलभ व सुबोध आहे त्यांचे अनेक श्लोक बोधदायी आहेत.संत रामदास स्वामी हे संत तुकारामांच्या काळातील
एक संत होते.
शब्दार्थ :
पाठीराखा – सोबती
कांता – बायको
कल्पतरु -स्वर्गातील एक झाड जे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. (ही कविकल्पना
आहे.)
कंथा – झोळी
वाचाळ – सतत बडबडणारा
सेवन करणे – खाणे
लेखा – हिशेब
सिध्दी – साध्य
वाणी – बोलणे
सोयरी – नातलग
बोलावे – वदावे
नीच – नित्य
क्रीडा – खेळ
देह – शरीर
फुकाचे – फुकट,मोफत
तरणे – वाचणे बचाव होणे
जनी – लोकांमध्ये
त्वांची – तूच
लेश – कणभर
दास – सेवक
धारिष्ट – धैर्य
वृक्षवल्ली – झाडे,वेली
निववावे -शांत करावे
स्वाध्याय
अ. खालील
प्रश्नांची उत्तरे लिही.
1. आपला पाठीराखा
कोण आहे ?
उत्तर – सदगुरू हाच आपला
पाठीराखा आहे.
2. राणीला भीक का
मागावी लागत नाही ?
उत्तर – कारण राजमहालात राणीला जे हवे ते सर्व काही मनासारखे
मिळत असते त्यामुळे राणीला भीक
मागावी लागत नाही.
3. आपण कोठे बसलो
तर आपल्या इच्छा पूर्ण होतात ?
उत्तर – आपण कल्पवृक्षाखाली
बसलो तर आपल्या इच्छा पूर्ण होतात.
4. पक्षी कसे गात
आहेत ?
उत्तर – पक्षी सुस्वरात गात आहेत.
5. तुकारामांनी
आपल्या देहाचे भोजन कोणते म्हटले आहे ?
उत्तर – तुकारामांनी हरिकथेला आपल्या देहाचे भोजन
म्हटले आहे.
6. आपल्या ठिकाणी
गर्व केव्हा निर्माण होतो?
उत्तर – जर आपण विनाकारण बोलत राहिलो तर आपल्या ठिकाणी
गर्व निर्माण होतो.
7. स्वतः नेहमी
कसे बोलावे ?
उत्तर – स्वतः नेहमी नम्रपणे बोलावे.
8. जगात सुखी
कोणीही नाही असे संत रामदास का म्हणत आहेत?
उत्तर – कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणते ना
कोणते दुःख आहे,चिंता आहे म्हणून जगात सर्वात सुखी कोणीही नाही असे संत
रामदास म्हणत आहेत.
आ. समानार्थी
शब्द लिही.
मित्र – सखा,
झाड – तरु, वृक्ष,
वारा – पवन,
वाणी – बोलणे
बायको – पत्नी, कांता
शरीर – तनु, काया
सेवक – नोकर
काम – कार्य
इ. विरुद्धार्थी
शब्द लिही.
मधुर X कडू
सुस्वर X गोंगाट
सुख X दुःख
सुसंवाद X विसंवाद
सज्जन X दुर्जन
गुण X दोष
कीर्ती X अपकिर्ती
सत्य X असत्य
सगुण X निर्गुण
ई. खालील
वाकप्रचारांच्या अर्थाच्या जोड्या जुळव.
अ ब
उत्तर – तरुण जाणे बचाव होणे
संवाद साधणे बोलणे
उ. अर्थातील फरक
स्पष्ट करा.
1. पाव –
पाव – प्रसन्न हो
पाव – बेकरीतील खाद्य
पदार्थ
2.वास
वास – राहणे
वास – सुवास,गंध
3. वाणी –
वाणी – बोलणे
वाणी – किराणा मालाचा
व्यापारी
4. अंग –
अंग- शरीर
अंग – भाग,बाजू
5. अंतर –
अंतर – मन
अंतर – दोन ठिकाणातील लांबी किंवा अंतर
चार ते पांच
वाक्यात उत्तरे लिही.
1. आपण सद्गुरू
का केला पाहिजे ?
उत्तर – कारण सद्गुरू आपल्याला वाट दाखवतात योग्य वेळी
मार्गदर्शन करतात.आपल्या अडचणीच्या वेळी मदत करतात.मनातील इच्छित पूर्ण करण्याचे
सामर्थ्य सदगुरुच्या ठिकाणी असते.आपल्या बरोबर सदगुरू असल्यास आपल्याला कोणाच्याही
पाठिंब्याची गरज नसते.जीवनात गुरुचे स्थान अनन्य साधारण आहे.म्हणून आपण सदगुरू
केला पाहिजे असे ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात.
2. वन, पशुपक्षी यांचे संरक्षण का करावे ?
उत्तर – वन,पशु पक्षी हे आपले सगेसोयरे आहेत.वनामुळेच
हवा शुद्ध राहते,पाऊस पडतो.तर पशुपक्ष्यांच्या सुस्वराने मन आनांडीत होते.वातावरणातील
प्रदूषण कमी होऊन हवा शुद्ध होण्यासाठी वन, पशुपक्षी
यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात.
3. माणसाचे जीवन
व्यर्थ केव्हा होते ?
उत्तर – जर
एखादा मनुष्य काहीही न करता उगाच उपदेश करत असेल,काहीही कार्य न करता उगाच बढाया
मारत असेल तर अशावेळी माणसाचे जीवन व्यर्थ होते.म्हणून आधी कार्य करावे व गरजेच्या
वेळीच बोलावे तरच माणसाचे जीवन व्यर्थ जात नाही.
4. सेवक केव्हा
धन्य होतो?
उत्तर – जो बोलतो तसा चालतो, आणि
जगातील हे वेगवेगळे देव प्रत्यक्षपणे वेगवेगळे नसून एकच आहेत हे ज्याला माहिती आहे
तो धन्य आहे. ईश्वराला सगुण रुपात भजताना प्रत्यक्ष ईश्वर निर्गुण निराकार आहे हे जो
जाणतो तो सर्वोत्तमाचा (ईश्वराचा) सेवक धन्य होतो. ‘न‘
चा वापर करून शब्द तयार कर व शब्दाचे अर्थ लिही.
ए. ‘न’ चा वापर करून शब्द तयार करा व अर्थ लिहा.
कवन – गीत
नकद – रोख
वदन – चेहरा
पवन – वारा
दमन –
पतन – खाली टाकणे
मदन –
ऐ. खालील
काव्यातल्या ओळींचा अर्थ स्पष्ट कर.
1. कल्पतरु तळवटी
जो कोणी बैसला | काय वाणी त्याला सांगिजोजी ||
उत्तर – कल्पतरुच्या खाली बसलेल्या
माणसाला आपल्या मनातील इच्छा बोलावया लागत नाहीत.त्याच्या मनात ज्या इच्छा उत्पन्न
होतात त्या आपोआप पूर्ण होतात.
2. मना श्रेष्ठ
धारिष्ट जीवीं धरावे | मना बोलणे नीच सोशीत जावे ||
उत्तर – कोणी आपल्याला अपशब्द बोलले तर ते सोसण्यासाठी
आपले मन धीट असले पाहिजे .कोणीही कांहीही बोलले तरी आपण न रागवता सहन करावे.
ओ. ‘गुरुचे महत्त्व‘ स्वतःच्या शब्दात लिही.
कोण दाखवील वाट
जीवनाचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट
गुरुविण कोण दाखवील वाट
अशा शब्दात गुरूंचे महत्व सांगितले
जाते.कारण गुरु हा आपला एक असा मार्गदर्शक असतो.जो स्वतः चंदनाप्रमाणे झिजून
दुसऱ्यांना ज्ञान रुपी सुगंध देतो.गुरु हा फणसाच्या गोड गऱ्याप्रमाणे असतो.ज्या
शब्दाची निर्मिती गुरूने केली त्या शब्दात त्याची महती माझ्या साध्या शब्दात कैद
करणे अशक्य आहे.म्हणूनच सौरमंडळातील सर्वात मोठ्या ग्रहाचे नाव गुरु आहे.म्हणून
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अनन्य साधारण आहे.
औ.गाळलेल्या जागा
भरा.
1. सद्गुरू सारखा पाठीराखा नाही.
2. पक्षी सुस्वर राग आळवीत होते.
3. आपल्या शरीराला हरीकथचे भोजन असावे.
4. कृतीहीन बोलणे व्यर्थ आहे.
5. नेहमी नम्रपणे बोलावे.
अं. कवितेतील
सुविचाराची यादी कर..
1. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
2. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे.
3. वृक्षवल्ली हे आमचे सगेसोयरे आहेत.
4. कृतीहीन बोलणे व्यर्थ आहे.
5. नेहमी नम्रपणे बोलावे.