पाठ तिसरा ब्रिटिश सत्तेचा परिणाम
Ø भूमहसूल व्यवस्था
1. कायम जमिनदारी पद्धत – 1793
2. रयतवारी पद्धत – 1820
3. महलवारी पद्धत – 1833
अभ्यास
I खालील प्रश्नांची एक वाक्यात उत्तरे लिहा.
1) कायम जमीनदारी पद्धत कोणी अंमलात आणली?
उत्तर – कायम
जमिनदारी पद्धत जनरल कॉर्नवालीस याने अमलात आणली.
2) रयतवारी पद्धत म्हणजे काय ?
उत्तर – सरकारी
आणि शेतकरी यांच्या मधला थेट संबंध हीच रयतवारी पद्धत होय.
3) 1813 च्या चार्टर कायद्यान्वये भारतीय शिक्षणासाठी
किती रक्कम राखीव ठेवण्यात आली ?
उत्तर – 1813यांच्या चार्टर कायद्यान्वये भारतीय शिक्षणासाठी एक लाख
रक्कम राखीव ठेवण्यात आली.
4) भारतात रेग्यूलेटींग कायदा कोणी व केव्हा अंमलात आणला?
उत्तर – भारतात
रेग्युलेटिंग कायदा वॉरन हेस्टींगज यांनी 1773 साली अंमलात आणला.
5) 1857 मध्ये स्थापन झालेली विश्वविद्यालये कोणती?
उत्तर – 1857 मध्ये स्थापन झालेली विश्वविघालये खालीलप्रमाणे –
१)
मुंबई विश्वविद्यालय
२)
मद्रास विश्वविघालय इ.
6) रयतवारी पद्धत कोणी अंमलात आणली?
उत्तर – रयतवारी पद्धत थॉमस मन्रो
याने 1820 मध्ये लागू केले.
प्र. २ जोड्या जुळवा
१) वॉरन हेस्टीगंज – महसूल वसुली लिलाव पद्धत
२) कॉर्नवॉलीस – कायम जमिनदारी पद्धत
३) थॉमस मनसे – रयतवारी पद्धत
४) विलियम वेंटीग – इंग्लिश शिक्षण निधी
५) दादाभाई नौरोजी – संपत्ती विक्री पद्धत
गटात चर्चा करा.
१) भारतातील प्रमुख शासन सुधारणा लिहा.
उत्तर – 1. रेग्युलेटिंग अॅक्ट
2.ईस्ट
इंडिया कायदा
3.मोर्लेमिंटो
सुधारणा
4.माँटेग्यु चेम्सफोर्ड
सुधारणा
5.1935 चा कायदा इ.
२) कायम जमिनदारी पद्धतीचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला?
उत्तर – कायम
जमिनदारी पद्धतीचा शेतकऱ्यांवर परिणाम खालील प्रमाणे झाला –
1) कर मिळवण्याच्या उद्देशाने जमीनदार शेतकऱ्यावर दबाव आणत असत.
2) काही कारणास्तव पीक मिळाले
नाही तर शेतकऱ्याला कर भरावाच लागेल.
3) शेतकऱ्यावर व्यापारी पिके पिकवण्यासाठी बळजबरी करण्यात
आल्यामुळे शेतकरी पुन्हा अधिक गरीब झाले.
4) एकंदरीत कायम जमिनदारी पद्धतीमुळे शेतकरी संकट ग्रस्त झाले.
5) या कारणामुळे शेत मजुरांची संख्या जास्त प्रमाणात
वाढू लागली.
३)पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा परिणाम लिहा.
उत्तर – पाश्चात
शिक्षण पद्धतीचा परिणाम खालील प्रमाणे–
1) परंपरागत चालत आलेली शिक्षण पद्धती क्रमाक्रमाने ऱ्हास
होत गेली.
2) विविध भाषिक भारतीय इंग्लिश भाषेमध्ये परस्पर संवादसाधू
लागले.
3) लोकांच्या मध्ये राष्ट्रीय भावना वाढू लागली.
4) बौद्धिक विचार हळूहळू भारतीय समाजात आल्यामुळे दुरगामी
परिणाम होण्यासाठी मदत झाली.
5) भारतीय साहित्यावर गंभीर परिणाम होऊन नवसाहित्याच्या
चळवळीवर या शिक्षण पद्धतीचा प्रभाव पडला.
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.. – CLICK HERE