6. चिंगी महिन्याची झाली नाही तोच
लेखक – दिवाकर
लेखक परिचय –
पूर्ण नाव – शंकर काशीनाथ गर्गे (1889-1931)
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत आणणारे हे पहिले रविकिरण मंडळाचे सदस्य होत.
चिंगी महिन्याची झाली नाही तोच ही नाट्यछटा ‘दिवाकरांच्या नाट्यछटा या पुस्तकातून निवडली आहे. या नाट्यछटेत बोलणारे पात्र एकच ते म्हणजे चिंगीची आई! चिंगी एक महिन्याची झाली नाही तोच ही आई मनोराज्य करीत आहे. ती चिंगीशी बोलते आहे म्हणण्यापेक्षा चिगीबद्दल मनाशी बोलते आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल.
पाठाचे मूल्य-वात्सल्य
शब्दार्थ आणि टीपा
चिंगी – लहान मुलीला
लाडाने बोलाविण्याचे नाव
सरी – तारेत गुंफलेला
सोन्याचा दागिना
बिंदल्या – लहान बाळाच्या हातातला
पाटलीसारखा सोन्याचा दागिना
वाळे – पायात
घालण्याचा चांदीचा दागिना
साखळ्या – लहान
बाळाच्या पायात घालायचा दागिना
परकर पोलके मुलींचा पोषाख पेहराव
छोनी – बोबड्या बोलीतील सोनी
सोने – लाडाने लहान मुलीला बोलावणे
नक्षत्र – तारका (चांदणी)
चित्रासारखा – सुंदर देखणा
थाट – रुबाब, ऐट, डौल
ठुकमत – नखऱ्याने चालणे
लगीन – विवाह
हुंडा – वरदक्षिणा
चौघडा – सनईच्या साथीला वाजवले जाणारे चर्म वाद्य
बेंडबाज्या – वाद्यांचा समूह
नळे चंद्रज्योती, झाडे – शोभेच्या
(उडवायच्या) दारूचे प्रकार
लकलकाट – शोभेच्या दारूचा प्रकाश
दैव – नशीब
कारटी – लहान मुलं, मुली
जंजाळ – कटकट, त्रास
गालगुच्चा – प्रेमाने गालाला घेतलेला चिमटा
स्वाध्याय
प्र 1. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा
1. चिंगी रंगाने कशी आहे?
उत्तर – चिंगी रंगाने काळी आहे.
2. चिंगी कसली बुकं वाचील ?
उत्तर- चिंगी मोठी बुकं वाचील
3. चिंगीची आई किती हुंडा देणार आहे?
उत्तर – चिंगीची आई हजार रुपये हुंडा देणार आहे.
4. मोठी दैवाची कोण आहे?
उत्तर – चिंगी मोठी दैवाची आहे.
5. कोणाचा जंजाळ नको आहे?
उत्तर – मुलींचा जंजाळ नको आहे.
प्र 2. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा
1. चिंगीची आई चिंगीला कोणते
दागिने करायचे असे म्हणते ?
उत्तर – चिंगीची आई चिंगीला सरी,
बिंदल्या, वाळे, साखळ्या व इतर सगळे दागिने करायचे असे म्हणते.
2. चिंगीला कसा नवरा मिळणार आहे?
उत्तर – चिंगीला नक्षत्रासारखा अगदी सुंदर देखणा नवरा मिळणार आहे.
3. चिंगीच्या लग्नाची वरात कशी निघणार आहे?
उत्तर – चिंगीच्या लग्नाची वरात ताशे,वाजंत्री,बेंडबाज्या वाजत निघणार आहे.तसेच वरातीत नळे चंद्रज्योती यांचा लकलकाट होणार आहे.
4. चिंगीला मुलेच व्हावीत असे चिंगीच्या आईला का वाटते?
उत्तर – कारण मुली म्हणजे नुसता त्रास आहे असे चिंगीच्या आईला वाटते म्हणून चिंगीला मुलेच व्हावीत असे तिला वाटते.
5. चिंगी रडू का लागते?
उत्तर – चिंगीची आई चिंगीशी खूप बोलत होती पण चिंगी कांहीच बोलत नव्हती म्हणून चिंगीची आई तिचा गालगुच्चा घेते.त्यामुळे चिंगी रडू लागते.
प्र3. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी चार ते पाच वाक्यात लिहा.
1. चिंगीची आई चिंगीचे लग्न कशाप्रकारे करणार आहे ?
उत्तर – चिंगीची आई चिंगीचे लग्न थाटात करणार आहे.चिंगीसाठी नक्षत्रासारखा अगदी सुंदर देखणा नवरा शोधणार आहे.त्याला लग्नात हजार रुपये हुंडा देणार आहे.तसेच चिंगीच्या लग्नाची वरात ताशे,वाजंत्री,बेंडबाज्या वाजत काढणार आहे.शिवाय वरातीत नळे चंद्रज्योती यांचा लकलकाट करणार आहे.
2. चिंगीचा संसार कसा व्हावा असे तिच्या आईला वाटते ?
उत्तर – चिंगीने आपला संसार सुखात करावा असे तिच्या आईला वाटते.चिंगीने आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवावे असे तिला सांगत आहे.तसेच चिंगीचे पहिले बाळंतपण तिच्या आईच्या घरी व्हावे व मुलींची खूप कटकट असते म्हणून चिंगीला फक्त मुलगेच व्हावेत असे चिंगीच्या आईला वाटते.शिवाय चिंगीच्या घरी घोडे,गाडी,कपडे,लत्ते कशाचीही कमी पडू नये असेही वाटते.
प्र 6. खालील विधानांना प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत योग्य उत्तर निवडून लिहा.
1. चिंगी रंगाने कशी आहे?
अ. सावळी
ब. गोरी
क. काळी
ड. केतकी
2.शंकर काशिनाथ गर्गे यांचे
टोपणनाव कोणते?
अ. माधवानुज
ब. केशवकुमार
क. दिवाकर
ड. बालकवी
3. चिंगीची आई चिंगीच्या लग्नात
किती हुंडा देणार आहे?
अ. हजार
ब. लाख
क.शंभर
ड. शंभर
4. चिंगीला कशासारखा नवरा मिळणार
आहे ?
अ. राजपुत्र
अ. नाट्यछटा
क. पाचशे
क. नक्षत्र
5. चिंगी महिन्याची झाली नाही तोच या पाठाचा साहित्यप्रकार कोणता आहे?
अ. नाट्यछटा
ब. नाटक
क. एकांकिका
ड.प्रहसन
1. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1. दैवाची असणे – नशीबवान असणे
सोनूच्या श्रीमंती पाहून वाटे की,ती मोठी दैवाची आहे.
ii. मुठीत ठेवणे – ताब्यात ठेवणे
आमचे वर्गशिक्षक सर्व विद्यार्थ्याना मुठीत ठेवतात.
2. खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
माझ्या छबीला नक्षत्रासारखा अगदी चित्रासारखा नवरा मिळेल
उत्तर – उपमा अलंकार
(दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.)