पाठ 7 – कधी वाटते
कवी – प्रवीण दवणे
★ नवीन शब्दांचे अर्थ
स्वैर – स्वच्छंदी
फस्त – खाऊन संपविणे
शतरंग – शेकडो रंग
मुक्तपणे मोका – संधी
भर्जरी – भरजरी (जरीने भरलेला)
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.
१) कवीला हिरव्या वनराईतून कसे फिरावेसे वाटते ?
उत्तर – कवीला हिरव्या वनराईतून मुक्तपणे फिरावेसे वाटते.
२) माकड झाल्यावर कोणत्या गोष्टी करण्याचा मोका आपल्याला मिळतो?
उत्तर – माकड झाल्यावर उंच उंच झोके घेणे,पेरू खाणे,मित्राना छळणे या गोष्टी करण्याचा मोका आपल्याला मिळतो.
३) माकड झाले की सकाळी संध्याकाळी काय खाता येईल अशी तो कल्पना करतो ?
उत्तर – माकड झाले की सकाळी संध्याकाळी हिरवे पेरू खाता येईल अशी तो कल्पना करतो.
४) मुंगी झालो तर कोणती चैन करता येईल असे कवीस वाटते?
उत्तर – मुंगी झालो तर दुकानातील पेढे बर्फी खाण्याची चैन करता येईल असे कवीस वाटते.
५) हाती सापडली तर मुंगी काय करते?
उत्तर – हाती सापडली तर मुंगी चावते.
६) मोर केव्हा नाचतो ?
उत्तर – पाऊस पडू लागल्यावर मोर नाचतो.
७) मोर होऊन कसले देखावे पहावेत असे कवीला वाटते ?
उत्तर – मोर होऊन आकाशातील शतरंगाचे देखावे पहावेत असे कवीला वाटते.
ब) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.
१) माकड व्हावे असे कवीला का वाटते ?
उत्तर – कारण माकड झाल्यावर उंच उंच झोके घेणे, मित्राना छळणे, सकाळी संध्याकाळी हिरवे पेरू खाणे या गोष्टी करण्याचा मोका आपल्याला मिळतो. म्हणून माकड व्हावे असे कवीला वाटते.
२) मुंगी होऊन त्याला काय करायचे आहे?
उत्तर – मुंगी होऊन दुकानात जायचे आहे आणि भरणीतील पेढे,बर्फी फस्त करायचे आहेत.
३) मोर झालो तर आपल्याला कसे वागता येईल?
उत्तर – मोर झालो तर पावसाच्या धारा झेलत भर्जरी रंगीत पिसारा फुलवून नाचीन आणि आकाशातील शतरंगाचे देखावे पाहता येईल.
४) जर तू हत्ती झालास तर काय करशील?
उत्तर –
क) अनेक वचन लिही.
झोका – झोके
मोका – मोके
पेढा – पेढे
चावा – चावे
पिसारा – पिसारे
देखावा – देखावे
इ) कवितेच्या ओळी पूर्ण करा.
1) होऊन हुप् हुप् माकड
घ्यावा उंच झोका
मित्रांना मग छळण्याचा
येईल हाती मोका
2) कधी
होऊनी मोर भर्जरी
फुलवीन रंग पिसारा
खुशाल नाचीन अंगणांतुनी
झेलीन पाऊसधारा
ई) कवितेचा दिलेला भावार्थ वाचून त्याला अनुसरून
असलेल्या वरील कवितेतील ओळी लिही.
१) मला कधीकधी वाटते की आपले नेहमीचे रूप नाहीसे व्हावे आणि
हिरव्या वनराईतून मुक्तपणे हिंडावे.
उत्तर –
२) मला कधी कधी वाटते की दुकानात जाऊन भरणीतील पेढे बर्फी
खावे व मी जर कोणाच्या हाती सापडलो तर त्याला चावावे.
उत्तर –