नवीन शब्दांचे अर्थ
बाळबोध – साधे
चतुर – हुशार
घडसुनी – प्रयत्न करून / पुन्हा पुन्हा लिहिणे, घटवणे
वोतले – ओतले
मसीचे – शाईचे
वळी – ओळी
नेमस्त- नेमून दिव्याप्रमाणे
अर्कुली – उकार
अ.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) अक्षर सुंदर कसे
असावे?
उत्तर – अक्षर साधे व खूप
प्रयत्नांनी सुंदर झालेले असावे.
2) चतूर केव्हा समाधान पावतील ?
उत्तर: बाळबोध, सुंदर अक्षर पाहताच चतूर समाधान पावतील.
(3) काना, मात्रा, वेलांटी संबंधी समर्थ काय सांगतात ?
उत्तर: काना, मात्रा, वेलांटी संबंधी सांगताना समर्थ म्हणतात काना, मात्रा, वेलांटी
हे सर्व नीट असावे.
4) ओळी लितिाना कोणती काळजी घ्यावी ?
उत्तरः ओळी लिहिताना दोन ओळी एकमेकांना स्पर्श करू नयेत तसेच मात्रा व उकार एकमेकांत मिसळू नयेत.
5) जपून लिहिण्याचा संदेश कोणाला दिला आहे ?
उत्तर : ज्यांनी नुकतच लिहायला शिकण्यास सुरुवात केली आहे
त्यांनी जपून लिहावे असा संदेश दिला आहे.