1. इयत्ता – दहावी
विषय – विज्ञान
घटक – 1
रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे – :
आपण काय
शिकला आहात ?
■ एक पूर्ण रासायनिक समिकरण जे अभिक्रियाकारके, उत्पादीते आणि त्यांच्या भौतिक अवस्था चिन्हाच्या स्वरुपात
दर्शविते.
■ रासायनिक समीकरणाला संतुलीत केले जाते ज्यामुळे अभिक्रियाकारके उत्पादीते
यांच्या दोन्ही बाजूंच्या अणूंची संख्या समान होईल. समीकरणे नेहमी संतुलीत असली पाहीजेत.
■ संयोग अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थ यांचा संयोग
होऊन एकच नविन पदार्थ तयार होतो.
■ अपघटन अभिक्रिया ही संयोग अभिक्रियेच्या विरुद्ध आहे. अपघटन अभिक्रियेमध्ये
एका पदार्थाचे विघटन होऊन दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थाची निर्मिती होते.
■ ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्पादीतांच्या निर्मितीबरोबर उष्णता
मुक्त होते त्याला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात.
■ ज्या रासायनिक
अभिक्रियेमध्ये उष्णता उर्जा शोषून घेतली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया
असे म्हणतात.
■ जेव्हा संयुगातील
एक मुलद्रव्य दुसऱ्या मुलद्रव्यामुळे विस्थापीत केले जाते तेव्हा विस्थापन ‘अभिक्रिया होते.
■ दोन विभिन्न
अणू किंवा अणूंचा गट (आयन्स) यांची जेव्हा अदलाबदल होते त्यालाच दुहेरी
विस्थापन
अभिक्रिया असे म्हणतात.
■ अवक्षेप अभिक्रिया
अविद्राव्य क्षारांची निर्मिती करतात.
■ रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थाच्या ऑक्सिजन किंवा हायड्रोजन घेणे
किंवा देणे यांचा समावेश होतो. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन मिळविणे आणि हायड्रोजन गमाविणे
अपण म्हणजे ऑक्सिजन गमाविणे आणि हायड्रोजन मिळविणे होय.
बेरीयम क्लोराईड +ऑल्युमिनीयम सल्फेट बेरीयम सल्फेट +ऑल्युमिनीयम सल्फेट