TISARI 7. PINJARYATIL SUNDAR PAKSHI

7. पिंजऱ्यातील सुंदर पक्षी

665

 

नवीन शब्दांचे अर्थ –

प्राणी संग्रहालय – जेथे वेगवेगळे प्राणी ठेवतात असे ठिकाण

दंग होणे – गुंग होणे.

मौज लुटणे – मजा करणे

विविधरंगी – वेगवेगळ्या रंगाचे

डोळा लागणे – झोप लागणे

मनसोक्त-  मन भरून

हार पत्करणे -पराभव मान्य करणे.

अभ्यास

अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.

१.रंजना कोठे गेली होती ?

उत्तर – रंजना प्राणी संग्रहालयात गेली होती

२. रंजनाला काय वाटू लागले?

उत्तर – आपणही घरी रंगीत पक्षी पाळावे असे रंजनाला वाटू लागले.

३.रंजनाने बाबांकडे काय मागितले?

उत्तर – रंजनाने बाबांकडे रंगीत पक्षी मागितले.

४. पिंजऱ्यांतील पक्षी कसे होते?

उत्तर – पिंजऱ्यांतील पक्षी रंगीबेरंगी व छोटे छोटे होते.

५. रंजनाला किती दिवस विश्रांती घ्यावी लागली?

उत्तर – रंजनाला वीस दिवस विश्रांती घ्यावी लागली.

६. रंजनाला कोणाची आठवण येऊ लागली ?

उत्तर – रंजनाला शाळेची,मैत्रिणींची आठवण येऊ लागली.

आ.खालील प्रश्नांची दोन वाक्यात उत्तरे लिही.

१. बाबांनी रंजनाला काय समजावले ?

उत्तर – रंजनाने बाबांकडे आपणही घरी रंगीत पक्षी पाळूया असा हट्ट धरला होता.तेंव्हा “अशा पक्ष्यांना छोट्या पिंजऱ्यात कोंडून ठेवू नये. त्यांना मोकळ्या वातावरणात उंच उंच उडू द्यावं.” असे बाबांनी रंजनाला समजावले.

२. स्वप्नात पक्ष्याने सांगितलेले दोन विचार लिही.

उत्तर –स्वप्नात पक्ष्याने सांगितले की,तुम्ही रडता तेव्हा तुमचे आई-वडील तुमचे डोळे तरी पुसतात. पण माझे डोळे कोण पुसणार?, पिंजऱ्यात बसून बाहेर मनसोक्त उडणारे पक्षी पाहताना मला माझ्या आईवडिलांची, मित्रमैत्रिणींची सारखी आठवण येते.

३. रंजनाने बाबांची क्षमा केव्हा मागितली ?

उत्तर – जेंव्हा पक्षाने रंजनाच्या स्वप्नात येऊन आपले विचार सांगितले तेंव्हा तिने सर्व पक्षांना पिंजऱ्यातून मुक्त केले व बाबांची क्षमा मागीतली आणि पुन्हा असे कधी करणार नाही असे वाचन दिले.

इ. तू पाहिलेल्या पक्ष्यांची यादी कर.

उत्तर –

ई. तुझा आवडता पक्षी’यावर माहिती लिही.

माझा आवडता पक्षी –  मोर

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला खूप सुंदर पिसे असतात. पहिल्या पावसाच्या सरीत मोर आपला पिसारा फुलवून नाचतो. खूप लोकांना हे दृश्य पाहायला आवडते. मोराला शेतकऱ्यांचा मित्र सुद्धा म्हटले जाते. तो शेतीची नासाडी करणारे साप,उंदीर,बेडूक यांना मारतो. मोराच्या बायकोला लांडोर म्हणतात, तिला मोरा सारखी पिसे नसतात. मोर इतर पक्षांसारखे जास्त उंच उडू शकत नाहीत पण ते खूप जलद पळतात.मला मोर खूप आवडतो.मला त्याला जंगलात पिसारा फुलवून नाचताना पाहायचे आहे.

ऊ. जोड्या जुळव.

                                    

गाय                                   गोठा

घोडा                                   तबेला

पक्षी                                   घरटे

वाघ                                    गुहा

हत्ती                                    जंगल

ए. खालील शब्दांच्या जोड्या जुळव.

१. खाणे                 6. पिणे

२. येणे                    ४. जाणे

३. रुसणे                ५. फुगणे

४. उठणे                  २. बसणे

५. बोलणे               १. चालणे

६. नाचणे                 ३. गाणे

 ऐ. नमुन्यात दिल्याप्रमाणे लिहा.

नमुना – पाण्यातून 

AVvXsEgVDMQsTtwdqeqMZphaS8cRvj5ZfnbuzO2HzOrOpUE0B0cbtmqCbS5dZcj



 

 

 

 

 

 

 

उन्हातून

आकाशातून

गाडीतून

पावसातून

बागेतून

घरातून

शाळेतून

जंगलातून

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ही प्रश्नांची उत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा..

 




 

Share with your best friend :)