पाठ 6. सत्यकाम
अ. नवीन शब्दाथ
अनुमती – परवानगी, संमती
पोक्त – मोठा
दुर्गुण – वाईट गुण
सद्गुण – चांगले गुण
धैर्य – धाडस
शिदोरी – अन्नाचा साठा
चराचर – आवती भोवतीचा परिसर
दूर दृष्टी – पुढचा विचार
प्रफ्फुलित – टवटवीत
खजील – शरमणे, लाजणे
आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1.सत्यकाम हा कोणाचा मुलगा होता?
उत्तर – सत्यकाम हा जाबाली नावाच्या दासीचा मुलगा होता
2. गौतम ऋषीनी त्याच्यावर कोणते काम सोपविले होते?
उत्तर – गौतम ऋषीनी त्याच्यावर गाई चारण्याचे काम सोपविले होते.
3.सत्यकामाचा स्वभाव कसा होता?
उत्तर – सत्यकामाचा स्वभाव नम्र व कामसू होता.
4. सत्यकाम गायी राखताना काय करत असे ?
उत्तर – सत्यकाम गाई चारताना निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे बारीक सारीक गोष्टींचे निरीक्षण करत असे.
5. इतर शिष्य कोणत्या गोष्टीकडे अधिक लक्ष देत असत?
उत्तर – इतर शिष्य फक्त विद्याभ्यास व श्लोक पठण या गोष्टींकडे अधिक लक्ष देत असत.
इ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1. तू घरी करत असलेल्या कामांची यादी कर.
उत्तर – मी घरी दुकानातून बाजार आणणे,घर स्वच्छ ठेवणे,अभ्यास करणे,कपडे घडी घालणे इत्यादी कामे करतो.
2. तुला माहीत असलेल्या औषधी वनस्पती कोणत्या?
उत्तर – – तुळस,कोरफड,अडुळसा,कडूनिंब इत्यादी मला माहीत असलेल्या औषधी वनस्पती आहेत.
3.आंबटगोड फळांची नावे लिही.
उत्तर – अननस , संत्रे
4. पूर्ण गोड असलेली फळे कोणती?
उत्तर – चिक्कू,पपई,आंबा
5. पिवळ्या रंगाच्या फळांची नावे लिही.
उत्तर – पपई,केळी
6. हिरव्या रंगाच्या फळांची नावे लिही.
उत्तर – लिंबू,कैरी,सीताफळ
7. लाल रंगाची फळे कोणती?
उत्तर – अंजीर,डाळिंब
8. तुझ्या परसात असणाऱ्या झाडांची नावे लिही.
उत्तर –
ई. पाठाच्या आधारे जोड्या जुळव.
‘अ‘ ‘ब‘
1.झाडे स्वतः उन्हात राहून दुसऱ्यांना सावली देतात.
2.नदी जीवनात सतत पुढे जाण्याचा मार्ग शोधते.
3. डोंगर संकटासमोर धैर्याने उभा राहतो.
4. फुले आनंद, सुगंध देतात.
5.मुंगी सतत क्रियाशील, दूरदृष्टीपणा ठेवते.
उ. नमुन्याप्रमाणे जोडून येणारे शब्द शोधून लिही.
उदा. डोंगर-दऱ्या.
नदी – नाले
फुले – फळे
पशू – प्राणी
झाडे – झुडुपे
कृमी – कीटक
ऊन – पाऊस
ऊ. विरुद्धार्थी शब्द लिही.
प्राचीन x अर्वाचीन
कामसू x आळशी
ज्ञान X अज्ञान
विश्वास x अविश्वास
प्रश्न x उत्तर
उपकार x अपकार
शुद्ध x अशुद्ध
सुगंध x दुर्गंध
ए. उदाहरणाप्रमाणे लिही.
दुर्वांची – जुडी
फुलांची – माळ
द्राक्षांचा – घड , घोस
फुलांचा – गुच्छ
केळ्यांचा – घड , घोस
ऐ.खालील शब्दांचा वाक्यात उपयोग कर.
विद्याभ्यास – माझा भाऊ विद्याभ्यासासाठी अमेरिकेला गेला.
जबाबदारी – राहुलवर कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली.
निरीक्षण – सत्यकाम निसर्गातील सर्व घटनांचे निरीक्षण करत असे.
सहनशीलता – साधू संताकडे सहनशीलता हा गुण असतो.
धैर्य – शिवाजी महाराज धैर्याने लढले.