ATHAVI MARATHI 2. DIVYA DRUSHTI




 

2. दिव्य दृष्टी               लेखिका – डॉ. विजया वाड



डॉ. विजया विजय वाड ( 1945 )

शिक्षण बी.एस.सी., बी.एड., एम.ए., पी.एच.डी.

बाल साहित्याची आवड, नाटके रंगभूमीवर आणण्याची आवड, मराठी विश्वकोष मुख्य संपादक, मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड ही त्यांची कन्या होय.

नाटकांची नांवे – चिंगु चिंगम टिंकु टिंकम,दोन मित्र, मिनी मंगळावर.

 दिव्य दृष्टीहा पाठ “किशोर दिवाळी अंक – 2010″ मधून घेतला आहे.

(मूल्य-जिद्द)

 

शब्दार्थ आणि टीपा :

पळस्पेकोकणातील एक गाव

चौपाटीसमुद्राजवळील मोकळी जागा

देवाघरी जाणेमरण पावणे

जीवाची मुंबई करणेमौज मजा करणे, चैन करणे

शहाळेअतिशय गोड पाणी असलेला कोवळा नारळ.

हळहळणेदुःख करणे.

आवाळूशरीरावर आलेली चरबीची गाठ

जासूजगुप्त बातमी काढणारा.

धायमोकलून रडणे
– मोठ्याने रडणे

अंतःचक्षूआतील डोळे, मनाचे डोळे

अंधशाळाअंध विद्यार्थ्यांना शिकविले जाते ती शाळा.

म्हातारीचा बूटमुंबईच्या नेहरू पार्कमधील बुटाच्या आकाराची इमारत

 




 

 प्र1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. गौरीला न्यायला कोण कोण येणार होते ?

उत्तर – दादा,आई,बाबा गौरीला न्यायला येणार होते.

2. गौरी व इतर मंडळी जीवाची मुंबईकरायला कशाने गेले?

उत्तर – मुंबई दर्शन बसने गौरी व इतर मंडळी जीवाची मुंबईकरायला गेले.

3. शिवांगीने गौरीच्या आईला कोणत्या नावाने हाक मारली ?

उत्तर – शिवांगीने गौरीच्या आईला ‘गौरीची आई’ म्हणत हाक मारली

4. चोराने काय चोरले ?

उत्तर – चोराने सोन्याच्या बांगड्या चोरल्या.

5. शहाळेपाणीवाल्याने कोणता सल्ला दिला ?

उत्तर – शहाळेपाणीवाल्याने पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.

6. शिवांगीने कोणत्या वासावरून चोर ओळखला ?

उत्तर – शिवांगीने मोगऱ्याच्या अत्तराच्या वासावरून चोर ओळखला.




 

प्र2. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. गौरीला पळस्पेला काय काय खायला मिळणार होते ?

उत्तर – गौरीला पळस्पेला भाजी पोळी,गुळाचे घारगे,कैऱ्या,बर्फाचे गोळे  इत्यादी पदार्थ खायला मिळणार होते.

2. गौरी जीवाची मुंबई कशी करणार आहे ?

उत्तर –  गौरी आई,बाबा,दादा व शिवांगी सोबत मुंबई दर्शनच्या बसने जीवाची मुंबई दर्शन करणार आहेत.

3. गौरीची आई धायमोकलून का रडू लागली?

उत्तर – चोराने गौरीच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या म्हणून गौरीची आई धायमोकलून रडत होती.

4. आईला बांगड्या कोणी व केव्हा घेतल्या होत्या ?

उत्तर – तीस एप्रिलला वाढदिवसादिवशी गौरीच्या बाबांनी गौरीच्या आईला बांगड्या घेतल्या होत्या.

प्र5. संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1.
आज मात्र शिवांगीसह आपण सगळेच जिवाची मुंबई करू !”

संदर्भ – वरील वाक्य लेखिका डॉ.विजया वाड  यांच्या ‘दिव्य दृष्टी’  या पाठातील आहे.

स्पष्टीकरण – हे वाक्य गौरीच्या दादाने सर्वाना उद्देशून म्हटले आहे.  

2. “मला गुप्तहेर व्हायचं आहे गौरीची आई!

संदर्भ – वरील वाक्य लेखिका डॉ.विजया वाड  यांच्या ‘दिव्य दृष्टी’  या पाठातील आहे.

स्पष्टीकरण – वरील वाक्य शिवांगीने गौरीच्या आईला उद्देशून म्हटले आहे.

3.
पण तू पाहू शकत नाहीस “

संदर्भ – वरील वाक्य लेखिका डॉ.विजया वाड  यांच्या ‘दिव्य दृष्टी’  या पाठातील आहे.

स्पष्टीकरण – हे वाक्य काकूंनी शिवांगीला उद्देशून म्हटले आहे.

4. “जाने दो काका! अभी पहले पुलीस कंप्लेट लिखवावो”

संदर्भ – वरील वाक्य लेखिका डॉ.विजया वाड  यांच्या ‘दिव्य दृष्टी’  या पाठातील आहे.

स्पष्टीकरण – हे वाक्य शहाळपाणीवाल्याने गौरीच्या बाबांना उद्देशून म्हटले आहे.

5. “तुमची हौस होते पण आमचा जीव जातो.

संदर्भ – वरील वाक्य लेखिका डॉ.विजया वाड  यांच्या ‘दिव्य दृष्टी’  या पाठातील आहे.

स्पष्टीकरण –हे वाक्य गौरीच्या बाबांनी गौरीच्या आईला उद्देशून म्हटले आहे.

6. “कमालकी लड़की है ये!”

संदर्भ – वरील वाक्य लेखिका डॉ.विजया वाड  यांच्या ‘दिव्य दृष्टी’  या पाठातील आहे.

स्पष्टीकरण – हे वाक्य राणेसाहेबांनी शिवांगीला उद्देशून म्हटले आहे.

 




 

प्र6. खाली
दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर दिलेल्या जागेत लिहा.

1. गौरीच्या गावाचे नाव काय ?

अ. मुंबई

ब. पळसवणे

क.
पळस्पे

ड. पाळींद्रे

2. गौरीबरोबर कोण रहात होते ?

अ. शिवांगी

ब. शिवानी

क. शुभांगी

ड. सुहानी

3. शिवांगीची आई कोठे गेली होती ?

अ. माहेरी

ब. देवाघरी

क. सासरी

ड. मावशीच्या
घरी

4. शिवांगीला किती गुण मिळाले होते ?

अ.92%

ब. 85%

क. 90%

ड.95%

5.राणेसाहेबांनी सर्वांना काय दिले ?

अ. चहा-बिस्किट

ब. चहा पाव

क. पेढे – लाडू

ड. कॉफी –
बिस्कीट

6. बाबा मळ्यातून काय आणतात ?

अ. काकडी

ब.कैऱ्या

क. फणस

ड. जांभळे

7. शिवांगीला काय व्हायचं होते ?

अ. पोलीस

ब. वकील

क. गुप्तहेर

ड. डॉक्टर

भाषाभ्यास :

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा –

1.
जिवाची मुंबई करणे – चैन करणे

आम्ही सहलीला गेल्यावर जीवाची मुंबई केली.

2.
धायमोकलून रडणे – मोठ्याने रडणे

खेळताना पाय दुखावल्यावर सुजित धायमोकलून रडत होता.

3.
हळहळणे – दु:ख करणे

शाळेतील गरीब विद्यार्थ्यावर सर्वजन हळहळत होते.

4.
देवा घरी जाणे – मरण पावणे

पाच वर्षापूर्वी त्याची आई देवाघरी गेली.

 

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा..

 





 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *