इयत्ता तिसरी विषय – मराठी
2. नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रश्नोत्तरे
नवीन शब्दांचे अर्थ
सर्वस्व – सर्व काही
धैर्य – धाडस
बिचकणे – दचकणे
अर्पण करणे – देणे
दुष्ट – वाईट प्रवृत्तीचा
पक्ष – गट
निर्भय – न घाबरता
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर – सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 या दिवशी झाला.
२. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय अर्पण केले ?
उत्तर – त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण केले.
३. सुभाषचंद्र बोस कोणत्या शाळेत जात होते ?
उत्तर – सुभाषचंद्र बोस प्रोटेस्टंट युरोपियन शाळेत जात होते.
४. भारतीय मुले झाडाखाली का बसली होती ?
उत्तर – इंग्रजांची मुले खेळू देत नव्हती,मारत होती म्हणून भारतीय मुले झाडाखाली बसली होती.
५. वरील घटनेनंतर सारी भारतीय मुले कशी खेळू लागली?
उत्तर – वरील घटनेनंतर सारी भारतीय मुले निर्भयपणे रोज खेळू लागली.
आ. रिकाम्या जागा भरा.
१. सुभाषचंद्रांच्या आईचे नाव प्रभादेवी होय.
२. जानकीनाथ हे सुभाषचंद्रांचे वडील होय.
३. ओरिसा राज्यातील कटक येथे सुभाषचंद्रांचा जन्म झाला.
४. सुभाषचंद्रांचा जन्मदिवस 23 जानेवारी रोजी साजरा करतात.
इ. शब्दातील फरक शिक्षकांकडून जाणून घे.
1. दिन – दिवस
दीन – गरीब
2. सुत – पुत्र , मुलगा
सूत – धागा
3. खून – मारणे
खुण – चिन्ह
4. गृह – घर
ग्रह – अवकाशातील घटक (पृथ्वी)
ई. शिक्षकांच्या मदतीने नमुन्याप्रमाणे लिहा.
नमुना:- सुभाषचंद्र बोस – नेताजी
१. वल्लभ भाई पटेल – सरदार
२. जवाहरलाल नेहरु – पंडित
३. बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य
४. मोहनदास करमचंद गांधी – महात्मा
वरील प्रशोत्तरे PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा…