अर्थशास्त्र पाठ 1. अर्थशास्त्राचा परिचय
स्वाध्याय
1) ग्राहक कोणाला म्हणतात?
उत्तर – जे लोक वस्तूंचा व सेवांचा उपभोग घेतात त्यांना ग्राहक असे म्हणतात.
2) अर्थशास्त्राची व्याख्या सांगा.
उत्तर – मानवाच्या अमर्याद गरजा भागविण्यासाठी दुर्मिळ व मर्यादित असणाऱ्या साधनसंपत्तीची निवड कशी करावी या बद्दलचे परीक्षण करणारे समाज विज्ञान म्हणजेच अर्थशास्त्र होईल.
3) आर्थिक उपक्रम कशाला म्हणतात?
उत्तर – पैसा संपत्ती मिळवण्यासाठी व आपल्या गरजा भागविण्यास आपण जे विविध उपक्रम करतो त्यांनाच आर्थिक उपक्रम म्हणतात.
4) आर्थिक उपक्रमाचे चार प्रकार कोणते?
उत्तर – 1.उत्पादन, 2.उपभोग 3.विनिमय व 4.वितरण हे चार प्रकार होत.
5) सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतात?
उत्तर – कुटुंब व व्यापारी संस्था इत्यादींच्या कडून साधनसंपत्तीचा वापर करण्याचा व निर्णय घेण्यास संबंधीचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय.
6) मूलभूत आर्थिक समस्या कोणत्या?
उत्तर – कशाचे उत्पादन करावे?,कसे उत्पादन करावे?,कोणासाठी उत्पादन करावे? ह्या तीन समस्या होत.
रिकाम्या
जागा भरा.
1) सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान घटकांचा अभ्यास होय.
2) अर्थशास्त्र म्हणजे समग्र व विशाल घटकांचा अभ्यास होय.
3) अर्थशास्त्राचा पितामह अॅडम स्मिथ होय.
4) आयकॉस व नोमोस या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र हा शब्द बनला आहे.
खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा.
1. आर्थिक उपक्रम कोण कोणते ?
उत्तर – . पैसे आणि संपत्ती मिळविण्यासाठी व आपल्या गरजा भागविण्यास आपण जे विविध उपक्रम करतो, त्यांनाच ‘आर्थिक उपक्रम‘ असे म्हणतात. हे आर्थिक उपक्रम चार प्रकारात विभागले जातात.
i. उत्पादन उत्पादन उपक्रम म्हणजे ज्यातून वस्तु आणि सेवा उत्पादित केल्या जातात उदा. शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, जंगलविकास, निरनिराळे उद्योग धंदे, वाहतूक, दळणवळण इ.
ii. उपभोग उपभोगासाठी वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेतले जाते. मनुष्य
गरजा – भागविण्यासाठी वस्तु व सेवा खरेदी करतो. यालाच ‘उपभोग उपक्रम‘ म्हणतात.
iii. विनिमय – उत्पादक ग्राहकांसाठी वस्तुंचे उत्पादन करतो. या उत्पादित वस्तु ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी बाजारामध्ये व्यवस्था असते. या व्यवस्थेत वाहतूक, वस्तुंचा संग्रह करणे, खरेदी विक्री यांचा समावेश होतो.
iv. वितरण वस्तुंच्या उत्पादनानंतर उत्पन्नाचे वितरण निरनिराळ्या घटकांपर्यंत (जमीन, – मजूर, भांडवल आणि संघटना) होणे गरजेचे असते. या पद्धतीत मिळविलेले उत्पन्न सर्व लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवावे यासाठी पावले उचलावी लागतात.
2. आपण अर्थशाचा अभ्यास का करतो?
उत्तर – अर्थशास्त्राचा अभ्यास करणे हे व्यक्तिसाठी तसेच समाजाकरिता फार महत्त्वाचे आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे.
* अमर्यादित गरजांच्या तुलनेत साधनसंपत्तीच्या कमतरतांचे परीक्षण करणे.
* साधन संपत्तीच्या वापराला प्राधान्यक्रम देऊन जास्त महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या असा प्राधान्यक्रम ठरविणे.
* साधनसंपत्तीच्या वापरामध्ये काटकसर (बचत) करून त्यांचा वापर अधिक दक्षतेने करण्याचे मार्ग शोधणे.
* सर्व व्यक्तिती आपल्या कुटुंबाच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे.
* देशातील सामाजिक व आर्थिक समस्या म्हणजेच गरिबी, बेकारी, चलन फुगवटा इ. समस्या समजून घेणे व त्या निवारण्यासाठी उपाय शोधणे.
* देशाचा अपेक्षित विकास व प्रगती साध्य करण्यासाठी उत्तम धोरणे व उपाय सुचवून ते अंमलात आणण्यासाठी चांगले मार्ग शोधणे.
3. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्रातील फरक कोणते ते लिहा.
उत्तर – सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्रातील फरक खालीलप्रमाणे –
सूक्ष्म अर्थशास्त्र | स्थूल अर्थशास्त्र |
1. सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यवस्थेतील एक घटकाचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. | 1.स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. |
2. अत्यंत बारकाईने केलेला अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. | 2.समग्र घटकांचा अभ्यास केलेला अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र |
3. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था,वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. | 3. स्थूल अर्थशास्त्रात स्थूल कर वसुली,जनकल्याण,सार्वजनिक सुधारणा,राष्ट्रीय उत्पन्न इत्यादींचा |
4. मूलभूत आर्थिक समस्या कोणत्या –
उत्तर – नैसर्गिक साधनसंपत्तीच्या कमतरतेमुळे अर्थशास्त्रात अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या आपल्याला योग्य पर्याय निवडण्यास भाग पाडतात. या समस्या मूलभूत आर्थिक समस्या खालीलप्रमाणे –
1. कशाचे उत्पादन करावे ? –
2. कसे उत्पादन करावे? –
3.. कोणासाठी उत्पादन करावे?
5. सरकार कोणकोणते प्रमुख आर्थिक निर्णय घेते?
उत्तर – सरकार उत्पादन,उपभोग,विनिमय, करवसुली, सार्वजनिक सुधारणा जनकल्याण उपक्रमावरील खर्च, चलन फुगवट्यावरील नियंत्रण इत्यादी बाबतीत सरकार निर्णय घेते.