सेतुबंध परीक्षा
विषय– मराठी
पायाभूत सामर्थ्याची यादी
1) कथा कविता इत्यादी आवडीने ऐकून समजून घेऊन प्रतिक्रिया व्यक्त करणे.
2) अपरीचीत संदर्भ संवाद चर्चा ऐकून समजून घेणे.
3) इतरांच्या हस्ताक्षरातील मजकूर वाचून समजून घेणे.
4) परिचित संदर्भातील घडणाऱ्या घटना कृती परिसरातील विविध अनुभव याविषयी विचार मांडणे आणि प्रश्न विचारणे.
5) कथा–कविता इत्यादी योग्य उच्चार, हावभाव, लय,चाल आणि अभिनयासहित सांगणे.
6) सूचना फलकावरील सूचना वाचून समजून घेणे.
7) कथा कविता अथवा इतर विषय वाचून स्वतःचे विचार व्यक्त करणे.
8) नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन संदर्भानुसार अर्थ निश्चित करणे.
9) वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिक अथवा इतर विषयाचे वाचन करून समजून घेणे.
10) अपरिचित शब्दांचे श्रुतलेखन करणे. सुमारे 3000 शब्दांचा अर्थ ग्रहण करणे.
11) दिलेल्या शब्दाचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनविणे.
12) विविध प्रकारच्या कथा, कवितेमधील भाषिक लक्षणे (उदा. नवीन शब्द, लयबद्ध शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचने, नाम पद, सर्वनाम, विरामचिन्हे )ओळखून अर्थ समजून घेणे.
13) शब्दातील हृस्वदीर्घ,कानामात्रा लक्षात घेऊन स्वलेखन करणे.
14) लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा (प्रश्नार्थक चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम) वापर करणे.
15) ऐकलेल्या कथा, कविता स्वतःच्या वाक्यात रचणे.
16) कथा कविता आणि इतर विषय वाचून त्याचा सारांश समजून घेणे.
17) विषय वाचून कोण? कधी? कुठे ?काय ?अशा सरळ प्रश्नांची उत्तरे देणे.
18) ऐकलेल्या कथा, म्हणी ,कोडी समजून घेऊन लपलेले अर्थ शोधणे व त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे.
19) लेखनामध्ये पर्यायी शब्द वाक्याची रचना व स्वरूप ठरवून लिहिणे.
20) सूचना समजून घेऊन साध्या कृती करणे.