BRIDGE COURSE PRE-TEST CLASS-4 इयत्ता चौथी सेतुबंध पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विषय -मराठी


इयत्ताचौथी   
                

सेतुबंध पूर्व परीक्षा                                   

विषयमराठी







तोंडी परीक्षा

1)तुला माहित असलेली एखादी गोष्ट किंवा कविता सांगा. (प्रत्येक विद्यार्थ्याकडून म्हणून घेणे.)

2)तुझ्या आवडत्या पात्रानुसार शिक्षकांशी
संभाषण
कर.
(
उदा.डॉक्टररोगी, दुकानदारग्राहक)

3)तुझ्या मित्राने लिहिलेला निबंध वाच. (दुसऱ्याच्या हस्ताक्षरातील
मजकूर
वाचून
घेणे.)

4) तुझ्या गावात भरणाऱ्या यात्रेविषयी तीन चार ओळी माहिती सांग.(एखादा विषय देऊन बोलण्यास सांगणे.)

5) तुझ्या माहितीतील एखादे गीत अभिनयासह गीत गा.

 

प्रायोगिक
परीक्षा

6) चित्र पाहून फलकावरील सूचनांशी योग्य जोडी लावणे.(चित्रपट्ट्या तयार करून योग्य संदर्भ दर्शविणे.)

उदा.1)
रांगेत
चालावे
. 

2)झाडे लावा झाडे वाढवा.

3) पुढे गतिरोधक आहे, सांभाळुन चाला .

4)आहार वाया घालवू नये.

5)झाडे तोडू नका.

7) गोष्ट पूर्ण करा . (एखादी माहितीतील गोष्टीची सुरुवात सांगून गोष्ट पूर्ण सांगण्यास सांगणेएक कावळा होता. त्याला खूप तहान लागली होती .तो पाणी शोधत शोधत एका घराजवळ आला. तिथे त्याला———————————-

8) कर्डावरील अक्षरे पाहून अर्थपूर्ण शब्द बनवा.(अक्षर पट्ट्या दाखवून कृती करून घेणे.)








9) कोष्टकातील शब्दांचा योग्य क्रमाने वापर करून अर्थपूर्ण वाक्य बनवा.


तो

शाळेला

जाते

ती

घरी

जातात

आजोबा

मंदिराला

जातो

 

10)ऐकलेल्या परिच्छेदाचे श्रुतलेखन करा.

(एखादा परिच्छेद तोंडी सांगून श्रुतलेखन करून घेणे.)

 

लेखी
परीक्षा

11) ‘मदतया शब्दाचा वाक्यात उपयोग करून लिहा.

12) अर्थानुसार गटात जुळणारा शब्द वेगळा करून लिही.

अचल,गिरी,पर्वत,नदी,डोंगर

13) खालील अक्षरे योग्य क्रमाने जोडून अर्थपूर्ण शब्द बनव. आणि या शब्दाचा वाक्यात उपयोग करून लिही.(अक्षरांचा क्रम बदलून शब्द देणे)

उदा.

पा

फु

रु

 

गा

वे

हि

 

14) योग्य विरामचिन्हांचा वापर करून लिही.

उदा.
तुला
कोणता
पक्षी
आवडतो

15)’माझी शाळायाविषयी तीन ते चार वाक्यात माहिती लिही.

16) खालील कवितेतील लयबद्ध शब्दांच्या जोड्या ओळखून लिहा.

     
येरे
येरे
पावसा

     
तुला
देतो
पैसा

     
पैसा
झाला
खोटा

     
पाऊस
आला
मोठा

17) खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे
लिहा.

         
23
जानेवारी
1897
हा
दिवस
भारतमातेच्या  एका पराक्रमी पुत्राचा जन्मदिवस. यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. यांच्या आईचे नाव प्रभादेवी वडिलांचे नाव जानकीनाथ होय. नेताजी सुभाष चंद्र बोस हे या थोर नेत्याचे नाव.

प्रश्न1)
नेताजी
सुभाष
चंद्र
बोस
यांचा
जन्म
कधी
झाला?

प्रश्न
2)
नेताजींच्या
आई
वडिलांचे
नाव
काय?

18) खालील कोड्याचे उत्तर ओळखून लिही.

इवलीशी शेपूट सुपाएवढे कान

खांबासारखे
पाय
माझे
नाक
लांब
लांब

सांगा
मी
कोण?

19) नमुन्याप्रमाणे समानार्थी शब्दांचा गट लिही.

नमुन
वन
जंगल,
कानन,
विपिन

       
फुल

20) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरून पुढील वाक्य पूर्ण करा.

      
राधा
खूप
कष्टाळू
आहे.
ती
———–
नाही
.

 




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *