सेतुबंध परीक्षा
विषय– परिसर अध्ययन
पायाभूत सामर्थ्याची यादी
1) आकार आहार निवासस्थान यांच्या आधारे सभोवतालच्या परिसरातील वनस्पती, प्राणी, पक्षी ओळखणे.
2) पक्ष्यांचा आवाज, आहाराची पद्धत आणि निवासाचे स्थान यातील विविधता ओळखणे.
3) साम्य आणि फरकाच्या आधारे वस्तू, प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे वर्गीकरण करणे.
4) पाण्याचे महत्व, पाण्याचे स्त्रोत आणि पाणी संग्रह करण्याच्या योग्य पद्धती समजणे.
5) अनुवंशिक नातेसंबंध लक्षात घेऊन तीन पिढ्यांचा वंशवृक्ष तयार करणे(आजोबा, मुले, नातवंडे).
6) साम्य, फरक आणि अनुवंशिकगुणांच्या आधारे कुटुंबातील सदस्यांचे संबंध लक्षात घेणे.
7) विविध प्रकारच्या घरांच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्यांची यादी करणे.
8) घराच्या स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन त्या कार्यात स्वतः सहभागी होणे.
9)
वाहतुकीची विविध साधने, जवळच्या आणि दूरच्या प्रवासासाठी वापरली जाणारी वाहने समजून घेणे.
10) संपर्काची विविध साधने ओळखून संक्षिप्त परिचय देणे.
11) आहाराच्या पद्धती आणि आहाराचे स्त्रोत ओळखणे.
12) स्थानिक परिसरातील उपलब्ध आहाराचे पदार्थ ओळखणे.
13) अन्न पदार्थ बनविण्यासाठी वापरली जाणारी भांडी आणि घरामध्ये वापरले जाणारे इंधन यांची यादी करणे.
14) मातीपासून विविध प्रकारची भांडी आणि वस्तू बनविण्याचा प्रयत्न करणे.
15) अन्नधान्य संग्रहाच्या पद्धतीमध्ये काळानुसार
झालेले बदल यांचे विवरण करणे.
16) विविध संकेत,अभिनय आणि पत्रव्यवहाराद्वारे भाषा व्यक्त करणे.
17) आंतरांगण आणि बाह्यांगण खेळांचे वर्गिकरण करणे.
18) मानवी शरीराच्या विविध भागांना ओळखून त्यांचे कार्य समजून घेणे.
19) वनस्पती प्राणी पक्षी यांच्या विषयी संवेदनशील वर्तन ठेवणे .
20)राष्ट्रीय आणि पारंपरिक सणांविषयी नैतिक मूल्यांचे जतन करणे.