सेतुबंध साफल्य परीक्षा
इयत्ता – सहावी
विषय – समाज
विज्ञान
लिखित परीक्षा
1. कुटुंबामुळे आपल्याला
होणारे दोन फायदे सांगा.
2. अविभक्त कुटुंबामध्ये
कमीत कमी किती पिढ्या एकत्र राहतात?
3. तुमच्या सभोवतालच्या
परिसरात एकत्र गट करून राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.
4. खालील चित्रातील
व्यक्तींची नावे सांगा.
5. खालील पर्यायातील
शहरांमध्ये आढळणारी समस्या कोणती?
अ) कच्चे रस्ते ब)
कचऱ्याचे ढीग क) शाळेची कमतरता
6. आपल्या जिल्ह्यात
शिकवले जाणारे विशेष पीक कोणते?
7. रासायनिक शेतीचा फायदा
लिहा.
8. पाणीपुरवठा वर आधारित
शेतीचे स्त्रोत कोणते?
9. ग्रामीण प्रदेशातील
वस्तीच्या दोन समस्या सांगा.
10. भारतातील हिमालय पर्वत श्रेणी …..पर्यंत पसरलेली आहे.(चित्र पाहून
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.)
अ) कर्नाटक पासून
महाराष्ट्र पर्यंत हिमालय पर्वत श्रेणी पसरलेली आहे.
आ) काश्मीर पासून मेघालय
पर्यंत हिमालय पर्वत श्रेणी पसरलेली आहे.
इ) गुजरात पासून ओरिसा
पर्यंत हिमालय पर्वत श्रेणी पसरलेली आहे.
11. खालीलपैकी उत्तर
भारतातील नद्या कोणत्या? कावेरी,गंगा, कृष्णा,ब्रह्मपुत्रा,सिंधू
12. भारतामध्ये पावसाळा
कोणत्या महिन्यात सुरू होतो?
13. गिरची अरण्ये
………राज्या मध्ये आढळून येतात.
14. भारतामध्ये आढळणाऱ्या
तीन जंगली प्राण्यांची नावे लिहा.
15. भावैक्यता म्हणजे काय?
तोंडी परीक्षा
16. जगाच्या नकाशात
भारताचे स्थान दाखवा. (शिक्षक विद्यार्थ्यांना जगाचा राजकीय नकाशा दाखवून भारताचे
स्थान ओळखण्यास मदत करतील.)
17. नकाशा पाहून भारताच्या
दक्षिणेस असणारा देश ओळखा.
(शिक्षक विद्यार्थ्यांना
नकाशा दाखवतील.)
18. भारताच्या नकाशात
पुडुचेरी दाखवा. (शिक्षक विद्यार्थ्यांना नकाशा दाखवून ओळखण्यास मदत करतील.)
19. तिरंगा ध्वजात
असलेले चक्र कशाचे प्रतीक आहे?
20. या चित्रातील
व्यक्तींची नावे ओळखा.
(क्रीडा,कला,साहित्य,संगीत तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे फोटो
दाखवणे. उदा. सायना नेहवाल ,लता मंगेशकर, कुवेंपू)