सेतुबंध पूर्व परीक्षा
इयत्ता – सहावी
विषय – समाज
विज्ञान
लिखित परीक्षा
1.तुमच्या कुटुंबातील वयस्कर लोकांना तुम्ही कशी मदत करता.
2.विभक्त व अविभक्त यापैकी कोणत्या कुटुंबात तुम्ही राहता?
3.एका निश्चित भूप्रदेशात राहत असलेल्या व त्यांच्यामध्ये आम्ही,आमचीच ही भावना असलेल्या लोकांच्या
समूहाला…… म्हणतात.
4.ग्रामीण लोकांना असणाऱ्या समस्या(खालीलपैकी बरोबर उत्तर निवडा)
अ)आरोग्य सुविधांची कमतरता ब)बेरोजगारी
क ) शिक्षणाच्या सुविधांची कमतरता. ड )
वरील सर्व
5.शहराच्या बाहेरून बाजूने रिंग रोडची व्यवस्था का केलेली असते?
6. शेतीचे विविध टप्पे योग्य क्रमानुसार लावा
अ.पाणी पाजणे आ.कापणी करणे इ . नांगरणी
करणे ई. पेरणी करणे
7.रासायनिक शेतीचा कोणतेही एक तोटा सांगा.
8.पावसावर आधारित शेती मध्ये पिकवली जाणारी प्रमुख पिके कोणती?
10. दिलेला नकाशा पाहून भारतातील कोणत्याही दोन बंदरांची नावे लिहा.
11. ……..याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात.
12.भारतामध्ये सामान्यपणे………. या महिन्यापासून हिवाळा सुरू होतो.
13.पानगळीच्या अरण्याना…… अरण्ये म्हणतात.
14.भारतात आढळणाऱ्या प्रमुख तीन पक्ष्यांची नावे लिहा.
15. भारतात आपण सारे एकाच देशाचे रहिवासी आहोत हे एकतेचे भावनेने एकत्र राहतो
त्यालाच आपण……. असे म्हणतो.
तोंडी परीक्षा
16. भारताचे अक्षांश आणि रेखांश विस्तार ओळखून सांगा. (शिक्षक विद्यार्थ्यांना
नकाशा किंवा ग्रुप दाखवून ओळखण्यास सांगतील.)
17. नकाशा किंवा ग्रुपच्या साहाय्याने भारताच्या शेजारील एका राष्ट्राचे स्थान
सांगा.
(शिक्षक विद्यार्थ्यांना नकाशा किंवा ग्रुप दाखवून ओळखण्यास सांगतील.)
18. कर्नाटकाच्या जवळील एका लहान राज्याचा नकाशा ओळखून सांगा.
19. आमचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
20. या क्षेत्रातील व्यक्तींची नावे सांगा.
(क्रीडा,कला,साहित्य,संगीत तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे फोटो
दाखवणे. उदा. सायना नेहवाल ,लता मंगेशकर, कुवेंपू)