वाक्याचे प्रकार मराठी




वाक्य :

प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे
अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर
, ती अर्थपूर्ण शब्दाची
रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता
वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे
असते. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे महत्वपूर्ण भाग मानले जातात.

 

    वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार – 

    1. केवळ वाक्य

    ज्या
    वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास
     केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.

    उदा.

    • राम आंबा
      खातो.
    • संदीप
      क्रिकेट खेळतो.

    2.
    संयुक्त वाक्य

    जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केव वाक्ये ही प्रधान
    सूचक उभयान्व
    यी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

    (प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय उदा. आणि,व,शिवाय,अथवा,किंवा,की,पण,परंतु,परी,म्हणून,सबब)

    उदा.

    • विजा चमकू
      लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
    • देह जावो अथवा
      राहो.
      .

    3. मिश्र वाक्य

    जेव्हा
    वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्व
    यी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

    (गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय उदा. कारण,यास्तव,जर-तर,म्हणजे इत्यादी)

    उदा.

    • नोकरी
      मिळावी म्हणून तो शहरात गेला.
    • तो शहरात
      गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली.
    • जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल.

     









    Share with your best friend :)