विरुद्धार्थी शब्द


विरुद्धार्थी शब्द  



 


एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ विरुद्धार्थी शब्द ‘ होय.  


विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x )  चिन्ह देतात.

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) ताईचे दप्तर जुने झाले होते, म्हणून आईने तिला वाढदिवसाला नवे दप्तर भेट दिले.

२) आत्ताच ऊन होते आणि लगेच सावली झाली.

१) ‘ जुने ‘ या शब्दाच्या अर्थाच्या
विरुद्ध अर्थाचा शब्द
‘ नवे ‘ हा आहे.

२) ‘ ऊन ‘ या  शब्दाच्या अर्थाच्या
विरुद्ध अर्थाचा शब्द
‘ सावली ‘ हा आहे.

विरुद्ध याचा अर्थ नेमका उलट अर्थ होय.

१) जुने x नवे 

२) ऊन x  सावली 




Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now