‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी‘
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते.असे म्हटल्या जाते, की ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी‘ आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवनहे खर्या अर्थाने जीवनच नाही. सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक सक्षात देवता आहे. “आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई.आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, “इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे ‘प्रसादपट‘ हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.
खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती कष्ट उपसत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला द्यावा.
आईने केलेली ज्वारीची भाकरी खाण्यात केवळ आनंद असतो ? स्वर्गातील अमृतही तिच्यापुढे तुच्छ, आईने मारलेली हाक किती प्रेमाने ओथंबलेली असते, किती गोडवा असतो तीचात. मुरब्बी गायकांच्या गाण्यातहि इतका गोडवा नसतो. आईने मायेने पाठीवरून फिरवलेला हात, त्याची सर-सर कशालाच येणार नाही. जेवण झाल्यावर हात धुवून तो आईच्या पदराला पुसण्यात किती आनंद असतो. एक न दोन आईची प्रत्येक गोष्ट पृथ्वीमोलाची असते.
आईच्या सहवासातच हे सर्व सुख मिळते. म्हणून ज्याला आई नाही ज्याला मातृसुख नाही तो खरोखर दूरदयवी आहे. एखादा जगातील सर्व संपतीचा मालक असून त्याला आई नसेल तर तो कमनशिबीच असेल, मात्र एखाद्या गरीब मजूर असूनही ज्याला आई आहे तो श्रीमंत आहे. कारण “मातृ प्रेमाच्या सुखाचे धन हेय सर्व श्रेष्ठ धन” आहे ते ज्याला आहे तोच खरा धनवान. नाहीतर तो महान श्रेष्ठ असला तरी तो आईविना भिकारीच.
खरेच प्रत्येकाने आपल्या मातेच्या शिकवणुकीचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, लहानपणापासून आईचा विरह ज्याच्या वाट्याला आला असेल, त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी‘