ग्रंथ हेच गुरु. गुरुब्रह्मा, गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्र्वरा अशी गुरूची महती आहे. गुरुशिवाय कुठलेही ज्ञान प्राप्त होत नाही म्हणूनच संत कवी ने म्हंटले आहे कि गुरुविना कौन बतावे वाट बडा विकट हे यम घाट. असे म्हणतात की मनुष्य लहानपण पासून ते म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. ह्या काळात जे-जे त्याला विद्या देणारे भेटतील ते व्यक्ती त्याचे गुरूच असतील. म्हणूनच दत्तात्रेय महाराज म्हणतात की ” जो जो जायचा घेईल गुण तो तो मी गुरु केला जाण. ” आता या प्रत्येक वेळी ज्ञान देणारे मानवी गुरूच असतील असे नाही. शिवाय मानवी गुरुची यांना त्या नात्याने काही तरी सेवा करावीच लागते. पण असा कोणताही त्रास न होता ज्ञान देणारे गुरु म्हणजे ग्रंथ आहे. या गुरुकडून विद्या मिळवताना कोणतीही सेवा करावी लागत नाही. मग त्यात आम्हाला लागणारा सर्वप्रकारच ज्ञान उपलब्ध करून ठेवलेले आहे. आजच्या आधुनिक युगात तर ग्रंथांची भरपूर रेलचेल आहे. तेव्हा कोणतेही ज्ञान तुम्ही या ग्रंथामधून मिळवू शकतात, मात्र ग्रंथाची निवड करणे हेही एक महत्वाचे अंक विसरता कामा नये. या ग्रंथरुपी गुरूच्या आधारे आपण अगदी अध्यात्म ज्ञानापासून ते रानागानाची नीती व व्यावहारिक तंत्र इत्यादी सर्व प्रकारचे ज्ञान आपल्यांना ग्रंथामध्ये बग्याला मिळते. ग्रंथामधून भूतकाळाच्या गोष्टी तुम्हीही अनुभवू शकतात तर वर्तमान, भविष्यकाळाची स्वप्ने आपण ह्या ग्रंथामधून बघू शकतात. ग्रंथांना काळ वेळ, जाती धर्म यांचे बंधन नाही आपण कधी यांच्याकडून ज्ञान घेऊ शकतात. असे हेच ज्ञानदान करणारे आमचे धर्मग्रंथ आहेत आणि तेच आमचे गुरु आहेत व हेच ग्रंथ आपल्या संस्कृतीचे खरे वारसदार आहेत आणि म्हणूनच ग्रंथ हे माझे पहिले गुरु आहेत.