8th SS ONLINE TEST 2 – Bharat Varsha Geographical Features and History Prehistory of India भारत वर्ष भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि इतिहास पूर्वकाळ

Table of Contents

इयत्ता – आठवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीच्या समाज विज्ञान या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये प्राचीन भारताची संस्कृती आणि सिंधू-सरस्वती व वेदकालीन संस्कृती या पाठातील लक्षात ठेवायचे आवश्यक मुद्दे व पाठावर आधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.

कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील 8वीच्या समाज विज्ञान विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE

ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.

NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT

या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

  1. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये: भारत एक द्वीपकल्प असून आशिया खंडाचा दक्षिण भाग व्यापलेला आहे. त्याच्या शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार हे देश आहेत.

2. इतिहासपूर्व काळ: लेखनकलेच्या शोधापूर्वीचा काळ म्हणजे इतिहासपूर्व काळ. त्यावेळी माणूस शिकार आणि अन्न गोळा करण्यात व्यस्त होता.

3. पाषाणयुग: दगडी हत्यारे वापरण्याच्या काळाला पाषाणयुग म्हटले जाते. यात तीन कालखंड होते – प्राचीन अश्मयुग, मध्य अश्मयुग, नवीन अश्मयुग.

4. मानवाचा विकास: मानवाने पशुपालन आणि दुग्धोत्पादनाचा प्रारंभ केला, तसेच मच्छिमारी आणि शेती शिकला.

5. अग्निचा वापर: कर्नूलच्या गुहांमध्ये राखेचे अंश आढळल्याने मानवाला अग्नि वापरण्याचे ज्ञान होते, हे सिद्ध होते.

6. चित्रकला: पाषाणयुगातील गुहामध्ये अनेक चित्रे आढळतात, ज्यामध्ये जंगली प्राणी आणि शिकारीचे दृश्ये आहेत.

7. मध्य पाषाणयुगातील शस्त्रे: हाड-लाकडाच्या शस्त्रांना नाजूक दगडी शस्त्रांनी सुशोभित केले जात असे.


 

Results

#1. भारत एक ______ आहे.

#2. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?

#3. इतिहासपूर्व काळ म्हणजे ______.

#4. कर्नूलच्या गुहांमध्ये कोणते अवशेष आढळले?

#5. भारताचा पूर्व किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो?

#6. पाषाणयुगातील मानव कोणत्या साधनांचा वापर करत असे?

#7. माणसाने पशुपालनाचा प्रारंभ कधी केला?

#8. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला कोणते नाव आहे?

#9. इतिहासपूर्व काळातील मानवाने कोणत्या शस्त्रांचा वापर केला?

#10. भारतावर कोणत्या खिंडीतून आक्रमणे झाली?

#11. पुरातत्व संशोधक पाषाणयुगातील शस्त्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे करतात?

#12. नर्मदा नदीमुळे भारताचे कोणते विभाग बनले आहेत?

#13. पाषाणयुगात मानवाने कोणत्या प्रकारे अन्न मिळवले?

#14. मानवाने प्रथम कोणते धान्य पिकवले?

#15. इतिहासपूर्व काळातील दगडी हत्यारांची वापरासाठी बनवलेली ठिकाणे कोणत्या ठिकाणी सापडतात?

Previous
Finish

Share with your best friend :)