8th SS ONLINE TEST 6.Thoughts of Jainism and Buddhism जैन आणि बौद्ध धर्माचे विचार

इयत्ता – आठवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीच्या समाज विज्ञान या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये प्राचीन भारताची संस्कृती आणि सिंधू-सरस्वती व वेदकालीन संस्कृती या पाठातील लक्षात ठेवायचे आवश्यक मुद्दे व पाठावर आधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.

कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील 8वीच्या समाज विज्ञान विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE

ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.

NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT

या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

1. जैन आणि बौद्ध धर्माचा उदय – भारतातील दोन प्रमुख धर्म, जैन आणि बौद्ध धर्म, 6 व्या शतकात गंगा नदीच्या खोऱ्यात उदयाला आले. महावीर आणि बुद्धांनी शांती, अहिंसा आणि सहनशीलता यांचा उपदेश दिला.

2. भारतीय समाजाची वर्णव्यवस्था – त्या काळात समाजाची विभागणी चार वर्णांमध्ये होती: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यामुळे समाजात ताण-तणाव निर्माण झाले.

3. जैन धर्माची शिकवण – जैन धर्मात 24 तीर्थंकर असून, महावीरांनी पाच तत्वांचा (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य) उपदेश केला.

4. बुद्ध धर्माचे विचार – बुद्धाने चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्गाचा उपदेश दिला. त्यांच्या शिकवणीमुळे लोकांनी आशा आणि तृष्णा सोडून जीवनात संतोष मिळवला.

5. नव्या धर्माचे अनुयायी – व्यापारी, कारागीर आणि सामान्य लोक बुद्धाच्या शिकवणीमुळे प्रभावित झाले.

6. बौद्ध धर्माचा प्रसार – बौद्ध धर्माचा प्रसार मलाया, बर्मा, थायलंड, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये झाला.


Share with your best friend :)