6th SCIENCE Question Answers 7. Measurement of speed and distance 7 – गती आणि अंतराचे मापन

इयत्ता – सहावी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

7. Measurement of speed and distance

सारांश

• एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाच्या विविध साधनाचा उपयोग केला जातो.

• प्राचीन काळात लोक पायाची लांबी, वित, बोटाची रुंदी इत्यार्दीचा उपयोग मापनाच्या एककाच्या रूपात करत होते. यामुळे गोंधळ होत होते यामुळेच एक समान मापन प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

• आता आम्ही एककांची आंतरराष्ट्रीय एकक मापन पध्दती (SI Unit) चा उपयोग करतो. या पध्दतीला सर्व जगाभरातून मान्यता मिळाली आहे.

• SI एककांमध्ये लांबीचे एकक मीटर आहे.

• सरळ रेषेच्या दिशेने होण्याऱ्या गतीला सरळ रेषीय गती असे म्हणतात.

• वर्तुळाकार गतीमध्ये एखादा वस्तूची गती या प्रकारे होते की त्या वस्तूच्या एका निश्चित बिंद्यासूनचे अंतर समान राहते.

• जी गती एका निश्चित वेळेच्या अंतराने पुन्हा पुन्हा होते त्या गतीला आवर्तीय गती असे म्हणतात.

पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय

1. हवा, पाणी आणि जमिनिवर उपयोगात आणल्या जाणाऱ्या दळणवळणाच्या साधनांची प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा.
उत्तर:
हवा: विमान, हेलिकॉप्टर

पाणी: जहाज, होडी

जमीन: बस, कार

2. रिकाम्या जागा भरा

i) एका मीटर मध्ये 100cm असतात.

ii) पाच किलोमीटर मध्ये 5000 m असतात.


iii) झोपाळयावर बसलेल्या एका मुलाची आवर्तीय गती असते.


iv) शिलाई मशिनच्या सुईची आवर्तीय गती असते


v) सायकलच्या चाकाची वर्तुळाकार गती असते.

3. पाऊलाचा उपयोग लांबीच्या प्रमाणीत एककाच्या रूपात का केला जात नाही?
उत्तर:
पाऊल हे प्रमाणित एकक नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या पावलाची लांबी वेगळी असते. उदाहरणार्थ, 30 सेंमीची मोजपट्टी नेहमी तितकीच राहते, पण पावलांची लांबी बदलत राहते. म्हणून पावलांवर आधारित मापन अचूक नसते.

4.खालील लांबीना त्यांच्या चढत्या परिमाणामध्ये लिहा
1 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 मीटर, 1 किलोमीटर
उत्तर: 1 मिलीमीटर < 1 सेंटीमीटर < 1 मीटर < 1 किलोमीटर

5. एका व्यक्तीची उंची 1.65m. आहे. त्याची उंची cm आणि mm मध्ये व्यक्त करा.
उत्तर:
व्यक्तीची उंची 1.65m.
cm मध्ये उंची –
1 मीटर = 100 सेंमी
1.65 मीटर = 1.65 × 100 = 165 cm

1 m = 1000 mm
1.65 m = 1.65 × 1000 = 1650 mm

6. राधाचे घर आणि तिच्या शाळेमधील अंतर 3250cm आहे. हा अंतर किलोमीटर मध्ये व्यक्त करा.
उत्तर –

राधाचे घर आणि तिच्या शाळेमधील अंतर 3250 cm आहे.
1000 m = 1 km
तर 3250 m = ?

3250 m ÷ 1000 = 3.25 km

7. एका स्वेटर विणणाऱ्याच्या सुईची लांबी मोजताना मोजपट्टीवरील जर एका टोकाकडील नोंद 3.0cm व दुसऱ्या टोकाकडील नोंद 33.1cm आहे तर सुईची लांबी किती ?
उत्तर:

सुईची लांबी = दुसऱ्या टोकाकडील नोंद – पहिल्या टोकाकडील नोंद
सुईची लांबी = 33.1 सेंमी – 3.0 सेंमी
= 30.1 सेंमी

8. एका सायकलची गती आणि छताचा पंख्याच्या गतीतील समानता आणि असमानता लिहा.
उत्तर:

समानता: सायकलचे चाके आणि पंखा दोन्ही वर्तुळाकार गतीने फिरतात.

असमानता: सायकलचे चाके फिरल्याने ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, तर पंखा जागेवरच फिरतो.

9. तुम्ही अंतर मापनासाठी एका लवचिक रबरासारख्या वस्तुपासून बनलेली मोजफितीचा वापर का करत नाही? जर तुम्ही एका अंतराचे मापन करताना लवचिक अशा मोजफितीचा वापर केला तर तुम्हाला तुमचे माप दुसऱ्यांना सांगताना ज्या समस्या येतात त्यातील काही समस्या लिहा.
उत्तर:
रबरासारख्या लवचिक मोजफितीला ताणल्यास किंवा सैल सोडल्यास मापन अचूक राहत नाही. त्यामुळे ती इतरांना मापन सांगताना अडचणी येऊ शकतात. जर मोजफित जोरात ताणली तर माप कमी येते, आणि सैल सोडल्यास माप जास्त येते.

10. आवर्तीय गतीची दोन उदाहरणे लिहा.
उत्तर:
1. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण

2. लंबकाची गती

Share with your best friend :)