उपक्रम – 100 दिवस वाचन अभियान
कालावधी – 4 नोव्हेंबर 2024 पासून 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत 100 दिवस (14 आठवडे)
आठवडा क्रमांक – 3 घ्यावयाचे उपक्रम व कृती
100 दिवस वाचन अभियान ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण ती सर्जनशीलता, गंभीर विचारसरणी, शब्दसंग्रह तसेच तोंडी आणि लिखित स्वरूपात व्यक्त करण्याची क्षमता विकसित करते. हे मुलांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी आणि वास्तविक जीवनातील परिस्थितीशी संबंधित होण्यास मदत करते.
बालवाटिका ते इयत्ता आठवीपर्यंतची मुले या मोहिमेचा भाग असतील. 4 नोव्हेंबर 2024 पासून 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत 100 दिवस (14 आठवडे) वाचन अभियान चालवले जाईल.मुले, शिक्षक, पालक, समुदाय, शैक्षणिक प्रशासक इत्यादींसह राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील सर्व भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करणे हे वाचन अभियानाचे उद्दिष्ट आहे. 100 दिवसांची मोहीम 14 आठवडे सुरू राहणार आहे आणि प्रत्येक गटात दर आठवड्याला एक क्रियाकलाप शिकणे मजेदार आणि आयुष्यभर शिकण्याचा आनंद देण्यासाठी रचण्यात आलेले आहेत.
आठवडा क्र. – 3 उपक्रम व कृती
गट – बालवाटीका ते दुसरी
उपक्रम व कृती | आवश्यक संसाधने |
उपक्रम – हावभावयुक्त कविता विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीच्या किंवा शिक्षकांनी सुचविलेल्या कवींच्या कविता वाचण्यास सांगणे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने कविताच्या आधारे नाटिका, नृत्य बसविणे. | वाचन साहित्य किंवा काही कवितांची पुस्तके. |
आठवडा क्र. – 3 उपक्रम व कृती
गट – 3री ते 5वी
उपक्रम व कृती | आवश्यक संसाधने |
उपक्रम – बैंड द एंड-(कथानकाचा शेवट वळविणे) • शिक्षक महिन्याच्या थीमनुसार (Theme) निवडलेलीकथा वाचतात (त्याला नैतिक महत्त्व असणे आवश्यक आहे) आणि विद्यार्थ्यांना कथेचा शेवट बदलण्यास सांगतो. • प्रमुख नायक म्हणून त्यांनी दिलेल्या परिस्थितीत कसे वागले असते हे सांगतात. | कथा पुस्तके |
आठवडा क्र. – 3 उपक्रम व कृती
गट – 6 वी ते 7/8 वी
उपक्रम व कृती | आवश्यक संसाधने |
उपक्रम – कविता वाचन विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या आवडीच्याकिंवा शिक्षकांनी शिफारस केलेल्या किंवा कुटुंबाने शिफारस केलेल्या कवींच्याकविता वाचण्यास सांगणे. | कविता, पुस्तक किंवा कवितांसह वाचन साहित्य |