7th Science Question Answers 8.Reproduction of plants | वनस्पतींचे पुनरुत्पादन

इयत्ता – सातवी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

घटकातील कांही महत्वाचे मुद्दे -;

❇️ सर्व सजीव पुनरुत्पादन करतात.आपल्यासारख्याच जिवांची निर्मिती करतात.

❇️ वनस्पती दोन प्रकारे पुनरुत्पादन करतात.अलैंगिक आणि लैंगिक

❇️ अलैंगिक पुनरुत्पादनाच्या अनेक पध्दती आहेत. शाकीय वंशवृध्दी. विखंडन अंकुरण आणि बीजुक निर्मिती

❇️ लैंगिक पुनरुत्पादनामध्ये स्त्री-युग्मके आणि – युग्मके यांचा संयोग होतो.

❇️ शाकीय वंशवृध्दी वनस्पतीच्या विविध नवीन वनस्पती तयार होते. भागापासून होते. खोड, मुळे, पाने यांच्यापासून

❇️ फुल हा वनस्पतीचा पुनरुत्पादन करावयाचा भाग आहे.

❇️ फुले स्त्री केसर किंवा पुं-केसर यांच्यासह एकलिंगी असू शकतात.

❇️ उभयलिंगी फुलांमध्ये स्त्री-केसर आणि पुं-केसर दोन्ही असतात.

❇️ पुबिजे परागकणामध्ये असतात.तर स्त्रीबीजे बिजांडामध्ये असतात.

❇️ एका फुलातील परागकणांचे परागकोषापासून त्याच फुलातील किंजल्कापर्यंत वहन होणे किंवा दुसऱ्या फुलातील किंजल्कापर्यंत वहन होणे यालाच परागीभवन असे म्हणतात.

1. रिकाम्या जागा भरा.

(a) झाडाच्या शाकीय भागापासून नवीन वनस्पतीची उत्पत्ती होणे यालाच शाकीय पुनरुत्पादन म्हणतात.

(b) फुलामध्ये जर पुकेसर अथवा स्त्रीकेसर यापैकी एक पुनरुत्पादन घटक असेल तर त्या फुलाला एक लिंगी फुल म्हणतात.

(c) एका फुलातील परागकोषापासून किंजल्कापर्यंत किंवा दुसऱ्या फुलातील किंजल्कापर्यंत परागकणांचे वहन म्हणजेच परागीभवन होय.

(d) स्त्रीयुग्मके आणि पुयुग्मके यांच्या संयोगाला फलन म्हणतात.

(e) वारा, पाणी आणि प्राणी याद्वारे बीज विखुरले जातात.

2.अलैंगिक पुनरुत्पादनाचे विविध प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर –  बियाशिवाय नवीन झाडं तयार करणं म्हणजे अलैंगिक पुनरुत्पादन. याचे प्रकार असे आहेत: 

1. शाकीय वंशवृद्धी: 

   जेव्हा झाडाची मुळे, पाने, खोड किंवा कोंब यांपासून नवीन झाड तयार होते, त्याला शाकीय वंशवृद्धी म्हणतात. 

   उदा: गुलाब, ऊस, बटाटा 

2. अंकुरण: 

   यीस्टमध्ये हा प्रकार दिसतो. मुख्य पेशीपासून एक छोटा अंकूर तयार होतो आणि तो वेगळा होऊन नवीन यीस्ट पेशी बनवतो. 

3. विखंडण: 

   शेवाळासारख्या वनस्पतींमध्ये झाडाचे तुकडे वेगळे होऊन, प्रत्येक तुकडा नवीन झाडासारखा वाढतो. याला विखंडण म्हणतात. 

4. बीजूक निर्मिती: 

   बुरशी बीजुकांपासून वाढते. बीजुक हे हवेतून पसरत असतात. 

3. लैंगिक पुनरुत्पादन म्हणजे काय ते स्पष्टीकरण करुन लिहा.

उत्तर –   स्त्री आणि पुंयुग्मकांचा संगम होऊन जेव्हा फलित अंडं तयार होतं, त्याला लैंगिक पुनरुत्पादन म्हणतात. 

4. अलैंगिक आणि लैंगिक पुनरुत्पादनामधील मुख्य फरक लिहा.

उत्तर –  अलैंगिक आणि लैंगिक पुनरुत्पादनातील फरक: 

अलैंगिक पुनरुत्पादनलैंगिक पुनरुत्पादन
1.बियाशिवाय नवीन झाडं तयार होतात.1.बीजांपासून नवीन झाडं तयार होतात.
2.एक पालकच पुरेसा असतो.2.स्त्री आणि पुयुग्मक दोघांची गरज असते.
3.शाकीय वंशवृद्धी, अंकुरण, विखंडण यामार्फत होते.3.स्वतंत्र लिंग पेशींची आवश्यकता असते.

5.फुलाचे पुनरुत्पादन घटक दाखविणारी आकृती काढा.

image 9

6.स्वयं परागीभवन आणि पर परागीभवन यामधील फरक सांगा.

उत्तर –  स्वयं परागीभवन आणि पर परागीभवनातील फरक: 

स्वयं परागीभवनपर परागीभवन
1. परागकण त्याच फुलावर पोहोचतो.1. परागकण दुसऱ्या फुलावर पोहोचतो.
2. कोणत्याही माध्यमाची गरज नसते.2. वारा, पाणी किंवा कीटक मदत करतात.
3. उभयलिंगी फुलांमध्ये होते.3. एकलिंगी फुलांमध्ये होते.

7.फुलामध्ये फलन प्रक्रिया कशी घडते त्याचे वर्णन करा.

उत्तर – परागकोषात असलेले परागकण पुऱ्युग्मक तयार करतात. स्त्री-केसरात किंजल्क, किंजल आणि बीजकोष असतो. बीजकोषात असलेल्या बिजांडांमध्ये स्त्रीयुग्मक तयार होतो. परागीभवनात पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक मिळून युग्मनज (फलित अंडं) तयार होतं. 

8. बीज विखुरण्याच्या विविध प्रकारांचे वर्णन करा.

उत्तर –  बीज विखुरण्याचे प्रकार: 

1. वारा: 

   हलकी बिया किंवा केसाळ बिया वाऱ्यामुळे लांब जातात. 

   उदा: मॅपल, सूर्यफूल 

2. पाणी: 

   पाण्यावर तरंगणाऱ्या बिया वाहून जातात. 

   उदा: नारळ 

3. प्राणी: 

   काटेरी बिया प्राण्यांच्या केसात अडकून लांब जातात. 

   उदा: दुतंडी, रानभेंडी 

4. फळे फुटणे: 

   काही फळं फुटून बिया दूरवर फेकल्या जातात. 

   उदा: एरंड 

9. स्तंभ -1 मधील गोष्टींचे स्तंभ -II मधील उदाहरणांशी जोड्या जुळवा.

स्तंभ – 1                  स्तंभ – II

(a) कोंब         (i) मॅपल

(b) डोळा        (ii) स्पायरोगायरा

(c) विखंडन     (iii) यीस्ट

(d) पर           (iv) ब्रेड

(e) बुरशी        (v) बटाटा

                     (vi) गुलाब

उत्तरः

(a) कोंब                  (iii) यीस्ट


(b) डोळा                 (v) बटाटा


(c) विखंडन             (ii) स्पायरोगायरा


(d) पर                     (i) मॅपल


(e) बुरशी                 (iv) ब्रेड

10.अचूक पर्याय ओळखून (√) करा.

(a) वनस्पतीचा पुनरुत्पादनाचा अवयव हा आहे.

(i) पान
(ii) खोड
(iii) मूळ
(iv) फूल (√)

(b) स्त्री युग्मके आणि पुं युग्मके यांच्या मीलनाच्या प्रक्रियेला असे म्हणतात.

(i) फलन (√)

(ii) परागीभवन

(iii) पुनरुत्पादन

(iv) बीजोत्पत्ती

(c) बीजकोष परिपक्व होऊन हे तयार होते.

(i) बीज

(ii) पु केसर

(iii) स्त्री केसर

(iv) फळ (√)

(d) बीजुक निर्माण करणारी वनस्पती ही आहे.

(i) गुलाब

(ii) बुरशी  (√)

(iii) बटाटा

(iv) आलं

(e) ब्रायोफायलम यापासून पुनरुत्पादन करू शकतात.

(i) खोड

(ii) पाने (√)

(iii) मुळे

(iv) फुले


Share with your best friend :)