इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
11.प्राणी आणि वनस्पतीमधील वहनक्रिया
घटकातील कांही महत्वाचे मुद्दे –
❇️जास्तीत जास्त प्राण्यांच्या शरीरात वाहणारे रक्त त्यांच्या शरीरात असणाऱ्या विविध पेशींना ऑक्सिजन आणि अन्नाचा पुरवठा करते. शरीरातील टाकाऊ पदार्थ उत्सर्जक इंद्रियाकडे वाहून नेण्याचे कार्य देखील रक्त करते.
❇️अभिसरण व्यूहामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांचा समावेश आहे.
❇️मानवी शरीरामध्ये रोहिणी आणि निला यामधून रक्त वहात असते आणि हृदय एखाद्या पंपा सारखे कार्य करणारे इंद्रीय आहे.
❇️रक्तामध्ये प्लाझ्मा, लाल रक्तपेशी (RBC), पांढऱ्या रक्तपेशी (WBC) आणि रक्तबिंबिका असतात. हिमोग्लोबीन या लाल घटकांच्या अस्तित्वामुळे रक्त लाल दिसते.
❇️प्रौढ व्यक्तीच्या हृदयाची एक मिनिटामध्ये 70 ते 80 वेळा धडधड होते. याला हृदयाचे ठोके म्हणतात.
❇️ हृदयापासून शरीराच्या सर्व भागाकडे रक्त वाहून नेण्याचे कार्य रोहिणी करतात.
❇️ शरीराच्या सर्व भागाकडून रक्त परत हृदयाकडे वाहून नेण्याचे कार्य निला करतात.
❇️ शरीरातील टाकावू घटक शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला विसर्जन अथवा उत्सर्जन म्हणतात.
❇️ मानवाच्या उत्सर्जन इंद्रीयामध्ये मूत्रद्वार,मूत्रपिंडे, दोन मूत्रवाहक नलिका, मूत्राशय यांचा समावेश आहे.
❇️ घामाच्या स्वरुपात जाणाऱ्या पाण्यामधून क्षार आणि युरिया शरीराबाहेर टाकले जातात.
❇️ माश्यांनी उत्सर्जित केलेला अमोनियासारखा टाकाऊ पदार्थ पाण्यात विरघळतो.
❇️ पक्षी, कीटक आणि सरडा हे अर्ध-घन स्वरुपात युरिक आम्लाचे विसर्जन करतात.
❇️ वनस्पतींची मूळे मातीमधून पाणी आणि खनिज स्वरुपातील पोषक घटक शोषून घेतात.
❇️ पोषक घटक पाण्यासोबत वनस्पतींच्या सर्व भागापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या वाहक उतीना प्रकाष्ठ अथवा जलवाहिनी म्हणतात.
❇️ ज्या वाहक उती वनस्पतींच्या सर्व भागापर्यंत आहाराचा पुरवठा करतात त्यांना परिकाष्ठ अथवा रसवाहिनी म्हणतात.
❇️बाष्पोत्सर्जन क्रियेमध्ये पर्णरंध्रामधून वनस्पतीमधील पाण्याची जास्तीत जास्त वाफेच्या स्वरुपात हानी होते.
❇️ बाष्पोत्सर्जन क्रियेमध्ये एक प्रकारचा जोर निर्माण होतो ज्यामुळे वनस्पतीच्या मूळांनी शोषून घेतलेले पाणी खोड आणि पानापर्यंत पोहोचते.
स्वाध्याय
1. स्तंभ । मध्ये दिलेल्या रचनेचे स्तंभ II मध्ये दिलेल्या त्यांच्या कार्याशी जोड्या जुळवा.
स्तंभ – 1 स्तंभ – II
(i) पर्णरंध्र (a) पाण्याचे शोषण
(ii) प्रकाष्ठ (b) बाष्पोत्सर्जन
(iii) तंतूमुळे (c) अन्नाचे वहन
(iv) परिकाष्ठ (d) पाण्याचे वहन
(e) कार्बोहैड्रेटसचे विघटन
उत्तर -:
(i) पर्णरंध्र (b) बाष्पोत्सर्जन
(ii) प्रकाष्ठ (d) पाण्याचे वहन
(iii) तंतूमुळे (a) पाण्याचे शोषण
(iv) परिकाष्ठ (c) अन्नाचे वहन
2. मोकळ्या जागा भरा.
(i) हृदयापासून शरीराच्या सर्व भागापर्यंत रक्त पोहोचवण्याचे कार्य रोहिणी करतात.
(ii) हिमोग्लोबीनचे अस्तित्व लाल रक्त पेशीत असते.
(iii) रोहिणी आणि निला ह्या दोन्ही सूक्ष्मवाहिन्या (केशिका) यात एकत्र जुळतात.
(iv) हृदयाच्या तालबद्ध आकुंचन आणि प्रसरण क्रियेला हृदयाचे ठोके म्हणतात.
(v) मानवामध्ये तयार होणारा मुख्य टाकाऊ घटक युरिया होय.
(vi) पाणी आणि क्षार हे घामाचे मुख्य घटक होय.
(vii) मूत्रपिंडातून द्रवरुपात बाहेर टाकला जाणारा पदार्थ म्हणजे मूत्र.
(viii) बाष्पोत्सर्जन क्रियेमुळे एक प्रकारचा जोर निर्माण झाल्याने पाणी वनस्पतीच्या उंच भागापर्यंत पोहोचते.
3. योग्य पर्याय निवडा.
(a) वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन यामधून होते.
(i) प्रकाष्ठ
(ii) परिकाष्ठ
(iii) पर्णरंध्र
(iv) तंतूमूळ
उत्तर -: (i) प्रकाष्ठ
(b) मूळाद्वारे होणारे पाण्याचे शोषण वाढवू शकतो जर वनस्पतीला-
(i) सावलीत ठेवले
(ii) मंद प्रकाशात ठेवले
(iii) पंख्याखाली ठेवले
(iv) पॉलीथिनच्या पिशवीने झाकले
उत्तर -: (iii) पंख्याखाली ठेवले
4.वनस्पती अथवा प्राणी यांच्यात पदार्थांच्या वहनाची आवश्यकता का आहे? विवरण करा.
उत्तर -: वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. पानांमध्ये तयार झालेले अन्न तसेच मुळांद्वारे शोषलेले पाणी आणि क्षार वनस्पतीच्या सर्व भागांपर्यंत पोहोचण्यासाठी वहन आवश्यक असते. प्राण्यांमध्ये ऊर्जा आहारातून मिळते, आणि त्यांना श्वासोच्छ्वासासाठी ऑक्सिजनचीही गरज असते. ही ऊर्जा आणि ऑक्सिजन शरीरातील सर्व अवयवांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. शिवाय, प्राण्यांच्या शरीरात टाकाऊ पदार्थ तयार होतात, जे योग्य प्रकारे शरीराबाहेर काढले गेले पाहिजेत. त्यामुळे प्राणी आणि वनस्पतींमध्ये पदार्थांच्या वहनाची आवश्यकता असते.
5.रक्तामध्ये रक्तबिंबिका नसत्या तर काय झाले असते?
उत्तर -: जखम झाल्यास रक्त बाहेर येते, पण रक्तबिंबिकांमुळे रक्त गोठते आणि रक्तस्राव थांबतो. जर रक्तबिंबिका नसत्या, तर जखमेमुळे रक्त सतत वाहत राहिले असते, आणि रक्तस्राव थांबवणे कठीण झाले असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन व्यक्तीला अशक्तपणा आला असता, आणि जास्त रक्तस्रावामुळे जीवसुद्धा गमावण्याची शक्यता निर्माण झाली असती.
6.पर्णरंध्र म्हणजे काय? पर्णरंध्राची दोन कार्ये लिहा.
उत्तर -: वनस्पतीच्या पानांवर सूक्ष्म छिद्रे असतात, त्यांना पर्णरंध्र म्हणतात.
1. पर्णरंध्राद्वारे वनस्पतींमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते.
2. पर्णरंध्रावाटे वनस्पतींमधील अतिरिक्त पाणी बाष्पोत्सर्जनाच्या माध्यमातून बाहेर टाकले जाते.
7.बाष्पोत्सर्जन क्रिया वनस्पतीसाठी उपयुक्त आहे का? विवरण करा.
उत्तर -: होय, बाष्पोत्सर्जन क्रिया वनस्पतीसाठी उपयुक्त आहे.
1. या प्रक्रियेमुळे मुळांद्वारे शोषलेले पाणी झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते.
2. बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतीला योग्य तापमान राखण्यास मदत होते, ज्यामुळे ती उष्णतेपासून सुरक्षित राहते.
8.रक्ताचे घटक कोणते?
उत्तर -: प्लाझ्मा, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, आणि रक्तबिंबिका हे रक्ताचे घटक आहेत.
9.शरीराच्या सर्व भागांना रक्ताची गरज का आहे?
उत्तर -: प्रत्येक अवयवाला ऊर्जेसाठी अन्न व ऑक्सिजनची आवश्यकता असते, आणि हे दोन्ही घटक रक्ताद्वारे शरीरात पुरविले जातात. तसेच, शरीरातील टाकाऊ पदार्थ रक्तात मिसळले जातात आणि ते उत्सर्जन संस्थेकडे पोहोचवले जातात. त्यामुळे शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरवठा होणे अत्यावश्यक असते.
10.रक्त कशामुळे लाल दिसते?
उत्तर -: रक्तामध्ये लाल रक्तपेशी असतात. यामध्ये हेमोग्लोबीन नावाचा लाल रंगाचा घटक असतो. हेमोग्लोबीनच्या अस्तित्वामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो.
11.हृदयाच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तर -: हृदयाचे कप्पे स्नायूंपासून बनलेले असतात. हे स्नायू तालबद्धपणे आकुंचन-प्रसरण करतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके निर्माण होतात. हृदय शरीरात पंपासारखे कार्य करून रक्ताचा पुरवठा करते, ज्यामुळे शरीराच्या सर्व भागांना अन्न आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
12.टाकाऊ पदार्थांचे विसर्जन होणे का आवश्यक आहे?
उत्तर -: पेशींमध्ये होणाऱ्या क्रियांमुळे टाकाऊ पदार्थ तयार होतात, जे विषारी असतात. हे पदार्थ शरीरात साचले तर ते आरोग्यास घातक ठरू शकतात. त्यामुळे हे पदार्थ शरीराबाहेर काढणे अत्यावश्यक असते.
13.मानवी उत्सर्जन व्युहाची आकृती काढून त्याच्या भागांना नावे द्या.