Swachhata Pakhwada 2024 ‘स्वच्छता पंधरवडा’

Swachhata Pakhwada is an initiative launched by the Government of India in April 2016 under the Swachh Bharat Mission. The primary objective of this campaign is to promote cleanliness and sanitation across various sectors of society by engaging central government ministries, departments, and the general public1.

Key Features:

  1. Fortnightly Focus: Swachhata Pakhwada is observed for a fortnight, with each participating ministry or department taking turns to lead the cleanliness drive during their assigned period1.
  2. Community Involvement: The campaign encourages mass participation, involving millions of children, community members, and government officials
  3. Diverse Activities: Activities include cleanliness drives, awareness campaigns, essay and slogan writing competitions, painting contests, and more, all aimed at promoting hygiene and sanitation
  4. Educational Initiatives: Schools play a significant role by organizing events such as Swachhata Shapath (cleanliness pledge), meetings with School Management Committees (SMCs) and Parent-Teacher Associations (PTAs), and inspections of water and sanitary facilities

Swachhata Pakhwada has become a successful mass movement, significantly contributing to the cleanliness and hygiene of India. It continues to inspire communities to maintain and improve their sanitation practices.

सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग व केंद्रशासित प्रशासन यांच्या समन्वयाने सन 2016 पासून प्रत्येक  वर्षी स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहे. दरवर्षी या विभागाचा स्वच्छता पंधरवडा लाखो मुले आणि समाजातील सदस्यां व्यतिरिक्त कार्यकर्ते यांचा समावेश असलेली एक जनतेची यशस्वी चळवळ बनली आहे व तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या द्वारे, स्वच्छतेबाबत केलेल्या उत्तम कार्याचा गुणगौरव करण्यात येत आहे.

कॅबिनेट सचिवालय, भारत सरकार आणि जलशक्ती मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग (DDWS) यांनी प्रसारित केलेल्या वर्ष 2023 च्या स्वच्छता पंधरवडा दिनदर्शिकेनुसार भारतासाठी स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. 1 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर, 2024 या कालावधीत करावयाची आहे. 

लक्षवेधी सहभागासाठी योग्य पध्दतीने स्वच्छता पंधरवडा साजरा करुन विद्यार्थी, शिक्षक व समाज यांचा सक्रीय सहभाग  घेवून साफसफाई, स्वच्छता व आरोग्य आणि शाळेतील इतर संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी शाळा/संस्था यांनी करण्याकरीता सूचित करण्यात आले आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक आणि कर्मचारी वैयक्तिकरित्या आपली शाळा,समाज आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी,स्वच्छता प्रचार आणि जनजागृतीसाठी सामाजिक घोषवाक्यांचा वापर करावा.शपथ घेणारे शिक्षक,विद्यार्थ्यांची यांचा फोटो, व्हिडिओ,स्वच्छता जागरूकता संदेश,बॅनर इत्यादी अपलोड करणे.

  • स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित सांगण्यासाठी SMCs/SMDCs/PTAs ची सभा आयोजित करणे.
  • विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि जेवणापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुण्याचे महत्त्व,मॉपचा वापर  आणि सामाजिक अंतराचे महत्त्व याविषयी प्रबोधन करणे.
  • पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत आणि घरात स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • स्वच्छता सुविधांची अंमलबजावणी (हात धुण्याची सुविधा,दैनंदिन स्वच्छता आणि शौचालयासाठी पाण्याचा वापर,  कचरा व्यवस्थापन इ.) स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून योग्य वापर करणे.
  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि स्वच्छ पाणी, जंतुनाशक,सफाई कर्मचारी इत्यादींची तरतूद.
  • जलसंवर्धन – पावसाचे पाणी गोळा करून पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्याचे अभियान..
  • स्वयंपाकघर, वर्गखोल्या,पंखे, दरवाजे,खिडक्या यांची स्वच्छता
  • स्थानिक प्रतिनिधींच्या सहभागाने SMCs/PTAs आयोजित करून शाळेच्या आवारातील झुडपे साफ करणे आणि स्वच्छता उपक्रमात राबवणे.
  • शाळा संस्थांच्या आवारातील सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य,जुन्या फाइल्स, तुटलेले फर्निचर, निरुपयोगी उपकरणे,  निष्क्रिय वाहने इ नियमानुसार परिशीलन करून त्यांची विल्हेवाट  लावणे.
  • स्थानिक समुदायांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सर्व शिक्षक जवळपासच्या गावांना भेट देणे.
  • कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेण्याकडे विशेष लक्ष देणे.
  • जलस्रोतांचा अपव्यय थांबवण्यासाठी स्थानिक समाजामध्ये जलसंधारण आणि जलशक्ती अभियानाबाबत  जनजागृती  करणे.
  • प्रत्येक शाळेत शिक्षक दिन योग्य प्रकारे साजरा करणे,
  • स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे स्वच्छतेचा प्रचार करणे.
  • स्थानिक भागातील लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.

4.दिनांक : 06.09.2024 (शुक्रवार) हरित शाळा अभियान (ग्रीन स्कूल ड्राइव्ह)

  • जलसंवर्धन, एकेरी वापराचे प्लास्टिक काढून टाकणे आणि पर्यावरण संरक्षणाच्या इतर समस्यांवर विद्यार्थ्यांकडून काल्पनिक घोषणा,पोस्टर्स आणि भित्तीपत्रिका तयार करून घेणे आणि ते शाळेच्या प्रदर्शनात आणि गाव/शहराच्या भिंतींवर,शाळेच्या परिसरात प्रदर्शित करणे.
  • पाण्याच्या टंचाईचे परिणाम,नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज किमान एक लिटर  पाण्याची बचत करण्यास शिकवणे आणि घर आणि शाळेत पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्यास प्रोत्साहित  करून विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाची जाणीव निर्माण करणे.

5. दि.: 07.09.2024 आणि 08.09.2024 (शनिवार आणि रविवार) स्वच्छता सहभाग दिवस

  • जिल्हा/ब्लॉक क्लस्टरमधील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि चांगल्या व्यवस्थापनासाठी स्पर्धा आयोजित करणे.  निबंध, घोषवाक्य रचना,भाषण,प्रश्नमंजुषा,वादविवाद, शालेय परिसर आणि स्वच्छतागृह स्वच्छता यावर चर्चा,  चित्रकला,नाटक,कविता लेखन,मॉडेल मेकिंग इत्यादी स्पर्धा आयोजित करणे.

6. दिनांक 09/09/2024 व दिनांक 10/09/2024 (सोमवार व मंगळवार) हात धुणे दिन :-

  • दैनंदिन जीवनामध्ये हात धुण्याचे महत्त्व याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यात यावी..
  • विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी व जेवणानंतर योग्य प्रकारे हात धुण्याच्या पद्धती शिकविण्यात याव्या.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळेविरहित पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.
  • पाण्याच्या अपव्ययाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी.
  • हात धुणे स्टेशनपासून ते शालेय बगीचा या दरम्यानच्या पाण्याची व्यवस्था करावी.
  • मुलांना दुषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांबद्दल माहिती द्यावी. पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी करण्याबाबत माहिती द्यावी जेणेकरुन विद्यार्थी हात व पिण्याचे पाणी याबाबत सुरक्षितता राखतील.

7. दि. 11/09/2024 (बुधवार) वैयक्तिक स्वच्छता दिन :-  

  • विद्यार्थी / शिक्षक / कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत प्रेरणा देण्याकरिता दृकश्राव्य कार्यक्रमांचे आयोजन करावे.
  • नखे कापणे व स्वच्छता राखणे याबाबत विद्याथ्र्यांना योग्य पद्धती शिकविण्यास मदत करावी.
  • स्वच्छतेच्या सवयींचा संपूर्ण आरोग्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामाबाबत माहिती देण्यात यावी.विद्यार्थ्यांना  स्वच्छतागृह आणि पिण्याचे पाणी या सूविधा योग्य वापरण्याबाबत मार्गदर्शन करावे…
  • विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात दिवसातून दोन वेळा दात घासण्याचे व स्वच्छ करण्याचे महत्व पटवून द्यावे.

8. दि. 12/09/2024 (गुरुवार) शाळा स्वच्छता प्रदर्शन दिन :-

  • शाळेमध्ये स्वच्छतेवर आधारित छायाचित्रे, चित्रकला, कार्टून्स, घोषवाक्ये इ. Online / Offline प्रदर्शित करावीत.
  • सदरच्या प्रदर्शनाचे दस्तऐवज तयार करणे.
  • स्थानिक पुनर्वापरयोग्य कच्च्या मालाचा वापर करून कचराव्यवस्थापनासाठी शिल्पकलेचा उपयोग करावा जसे की स्थानिकांच्या कौशल्यांचा उपयोग करून त्यांच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कचरापेटी तयार करावी.

9. दि. 13/09/2024 ते 14/09/2024 (शुक्रवार व शनिवार) स्वच्छता कृती दिन :-

  • शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती मार्फत विद्यार्थी,पालक आणि स्थानिक लोकांमध्ये जाणीव जागृती व स्वच्छता कृती आराखडा तयार करण्यात यावा.
  • शाळेमध्ये स्वच्छता पंधरवडा विषयक आयोजित कृतींच्याबाबत चर्चा करण्याकरिता आणि शाळेव्दारे स्वच्छता विषयक नवीन कृतींचे आयोजन करण्याकरिता बालसंसद किंवा बालसभा बोलविण्यात यावी.
  • स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध नवीन उपक्रम समाविष्ट केले जाऊ शकतात.
  • याबद्दलच्या शिफारसी देण्याकरीता नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहित करावे तसेच आपल्या शिफारसी राज्याच्या व केंद्राच्या शिक्षण विभागाकडे पाठवाव्यात.

10. दि. -15/09/2024 (रविवार) पारितोषिक वितरण दिन :-

  • स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, निबंधलेखन, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना पारितोषिक वितरण करण्यात यावे
  • स्वच्छता पंधरवडा दरम्यान सर्व शाळा / शैक्षणिक संस्थांनी आयोजित केलेल्या कृतींमधील सर्वोत्तम कृतीची निवड करून जिल्हा / राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावी, संबंधित कृती राज्य / राष्ट्र स्तरावरील वेबसाईटवर  अपलोड करण्यात यावे.

DOWNLOAD CIRCULAR – CLICK HERE

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *