5th EVS 3. The SOCIETY समाज

कर्नाटक राज्य अभ्यासक्रम

माध्यम – मराठी

विषय – परिसर अध्ययन

इयत्ता – पाचवी

समाज म्हणजे काय?

एका निश्चित प्रदेशामध्ये रहात असलेल्या लोकांच्या समूहाला समाज असे म्हणतात.

समाजाची वैशिष्ट्ये कोणती ?

▶समाजात लोक समूहाने राहतात.
▶समाजातील सदस्य एकमेकांवर अवलंबून असतात.
▶समाजात अनेक कुटूंब राहतात.
▶समाजात लोक एकमेकांना मदत करतात.

imageedit 1 2067037052
image 6

इथे एका ग्रामीण समाजाचे चित्र दिले आहे.या चित्रामध्ये अनेक कामे तू पाहू शकतोस.यातील कृषी कामे आणि कृषीएत्तर कामे कोणती ते लिही.

image 7
शेतीकामकृषीत्तर कामे (इतर काम)
शेतकरी नांगरत आहे.
भात कापणी
धान्य वारा देणे.
भात बडवणे.
लागवड टाकणे.
कुंभार काम
बुट्टी काम
लोहार काम
मासेमारी
सुतारकाम

कृती : शेतकऱ्यांना कृषी कामासाठी लागणाऱ्या साधनांची यादी कर, आम्ही ते कोठून मिळवू शकतो खाली दिलेल्या जागेत लिही.

साधने कोणापासून मिळतात
नांगर सुतार
टिकावलोहार
खुरपे लोहार
खोरेलोहार / सुतार

2. खेडेगावातील लोकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
उत्तर –खेडेगावातील लोकांना स्वच्छता,आरोग्य,नोकऱ्या आणि शिक्षणाशी संबंधित समस्या आहेत.
रेल्वे,विमान यासारख्या सुविधा उपलब्ध नसतात.

3. ग्राम विकासासाठी सरकारने हाती घेतलेल्या योजनांपैकी एका योजनेबद्दल लिही.
उत्तर – खेड्यातील सुशिक्षित तरुणांना स्वतःचे लघुउद्योग उभारण्यासाठी सरकारने रोजगार हमी योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना हाती घेतल्या आहेत.

खाली एका महानगराचे चित्र दिले आहे. या चित्रामध्ये तुला काय काय दिसते? त्याची यादी कर व खाली दिलेल्या जागेत लिही.

image 8

उत्तर – इमारती, कंपन्या,कारखाने,वाहने, लोकांची गर्दी,रस्ता इत्यादी.

1. तू शहरात गेलास तर काय-काय पाहशील ?
उत्तर – इमारती,कंपन्या,कारखाने,वाहने,रस्ते,बाजार, कचऱ्याचे ढीग, मोठ मोठे होर्डींग इत्यादी.

3. जर तू शहरात राहत असशील तर तुला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ?

▶पर्यावरण प्रदूषण
▶कचऱ्याचे ढीग
▶लोकांची गर्दी
▶झोपडपट्ट्या
▶वाहतुकीच्या समस्या

4. शहरांच्या वाढीमुळे परिसराला होणाऱ्या धोक्यांचे विवरण कर.

▶ पाणी प्रदूषण
▶ कचऱ्याची विल्हेवाट
▶ दूषित हवा
▶ अति उष्णता
▶ कमी वृक्षारोपण

चित्राचे निरीक्षण कर.यातील कोणते घटक तू राहत असलेल्या परिसरापेक्षा भिन्न आहेत.खाली दिलेल्या जागेत लिही.

उत्तर – लहान झोपडीसारखे घर,दगडी हत्याचे,जंगल,वेगळी वेशभूषा, शिकारीसाठी व संरक्षणासाठी धनुष्य बाण,जेवण करण्यासाठी चूल,आजूबाजूला जंगल इत्यादी.

image 9
image 10
image 11

तू याआधीच अनेक व्यवसाय / कामाबद्दल समजून घेतले आहेस. तुला माहीत आहे का आपण घेत असलेल्या आहारासाठी कित्येक लोक आपल्याला मदत करतात. खाली दिलेल्या तक्त्याचे निरीक्षण कर. यातून तू काय शिकलास ते लिही.

उत्तर – आपण सेवन करत असलेला आहार मिळण्यासाठी, कापड निर्मिती राहत असलेले घर तयार करण्यासाठी कित्येक लोक श्रम करत आहेत.त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यवसाय कामाकडे आदराने पहावे व त्यांचा आदर करावा.

समुद्रातील पाण्यापासून तयार होणारे मीठ आम्हाला कसे मिळते? ते मिळविण्यासाठी कोणकोणत्या व्यक्ती काम करतात. याबद्दल तक्ता तयार कर. (शिक्षकांची मदत घे)

उत्तर – समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते.यासाठी समुद्राचे पाणी काही उथळ तलावांमध्ये गोळा केले जाते.बाष्पीभवनाने पाणी काढून टाकले जाते. त्यानंतर तळाशी द्रव मीठ गोळा होते.8 ते 10 दिवसांनी हे पाणी कोरडे होते व ते मशिनच्या मदतीने ते धुवून शुद्ध मीठ मिळवले जाते. मीठ तयार करण्याच्या जागेला मिठागर असे म्हणतात.

इथे काही कलाकारांची चित्रे दिलेली आहेत. हे कोण आहेत? त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळविले आहे? ते लिही.

image 12

खालील चित्राचे निरीक्षण कर.चित्रातील ठिकाणाचे विवरण कर.

उत्तर – वरील चित्रात एक गाव दिसत आहे.त्या गावात महापूर आलेला आहे आणि पाण्यात सर्व गाव बुडाले आहे.गावातील लोक आपले साहित्य,जनावरे घेऊन सुरक्षित जागी जात आहेत.

image 13

वरील चित्रात एक गाव दिसत आहे.त्या गावात महापूर आलेला आहे आणि पाण्यात सर्व गाव बुडाले आहे.गावातील लोक आपले साहित्य,जनावरे घेऊन सुरक्षित जागी जात आहेत.

या कुटुंबाला कोणत्या प्रकारची मदत मिळत आहे. खालील चित्राच्या सहाय्याने विवरण कर.

image 14

▶बेघर कुटुंबाला आर्थिक मदत
▶बेघर कुटुंबाला आहार पुरवठा
▶बेघर कुटुंबासाठी नवीन घराचे बांधकाम

यामधून तू काय समजून घेतलास ते लिही.
उत्तर – महापूर आल्यानंतर समाजातील लोक,डॉक्टर लोकांना मदत करतात.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न (1) समाज कशाला म्हणतात ?

उत्तर__ एका निश्चित प्रदेशांमध्ये रहात असलेल्या लोकांच्या समूहाला समाज म्हणतात

प्रश्न (2)  समाजाचे प्रकार कोणते ?

उत्तर__ 1. ग्रामीण समाज 

            2. शहरी समाज 

            3. आदिवासी समाज हे समाजाचे तीन प्रकार होत.

प्रश्न ( 3) समाजाची वैशिष्ट्ये सांगा ?

उत्तर 1) लोक एकत्र राहतात 

2 )  लोक सहकार्याने राहतात 

3 ) समाजात एकमेकाला मदत करतात 

4)एकमेकांच्या कार्यात मदत करतात

प्रश्न (4) ग्रामीण समाजात कोणते व्यवसाय करतात ?

उत्तर __ ग्रामीण समाजात सुतार ,लोहार,चांभार,कुंभार,सोनार,विणकाम , बुट्ट्या तयार करणार इत्यादी प्रकारचे व्यवसाय करतात

प्रश्न ( 5) ग्रामीण भागातील समस्या कोणत्या ?

उत्तर आरोग्य, स्वच्छता समस्या ,शिक्षण समस्या ,उद्योग समस्या,व्यवसाय , पाणी समस्या आरोग्य समस्याइत्यादी प्रकारच्या समस्या आढळतात

प्रश्न (6) ग्राम विकासासाठी सरकारने कोणत्या योजना आखल्या आहेत ?

उत्तर 1) जवाहर ग्राम समृद्धी योजना 

2) सर्व शिक्षण अभियान 

3) निर्मल ग्राम योजना 

4) भाग्यलक्ष्मी योजना

 5)आश्रय योजना इत्यादी योजना आखल्या आहेत.

 प्रश्न (7) शहरात गेल्यावर तू काय पाहशील ?

उत्तर__मी कारखाने उद्योगधंदे ,मोठमोठी दुकाने ,कॉलेज ,हॉटेल ,इमारती ,वेगळ्या प्रकारची वाहने, लोक दवाखाने , बाग , स्मारके, पुतळे इत्यादी पाहीन

प्रश्न (8) शहरांमधील समस्या कोणत्या

उत्तर _ वाहतूक,प्रदूषण,टाकाऊकचरा ,झोपडपट्ट्या,जलप्रदूषण ,भिकारी ,गटारी ,शिक्षण इत्यादी समस्या पहावयास मिळतात

प्रश्न (9) आदिवासी समाज कशाला म्हणतात ? 

उत्तर_  दाट अरण्य जंगल अथवा डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)