अति पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची दृष्टीकोनातून बेळगावी जिल्ह्यातील बेळगावी, खानापूर, बैलहोंगल,कित्तूर, चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील सर्व सरकारी,सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक,उच्च माध्यमिक शाळाना आणि बेळगावी, खानापूर, बैलहोंगल आणि कित्तूर तालुक्यातील पदवीपूर्व कॉलेजना दि. 25.07.2024 ते 26.07.2024 दोन दिवसाची सुट्टीची घोषणा काल मा. जिल्हाधिकाऱ्यानी केली होती.
त्याचप्रमाणे हुक्केरी,गोकाक,मुडलगी,रायबाग तालुक्यात पावसाच्या जास्त प्रमाणामुळे घटप्रभा,हिरण्यकेशी नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे.तसेच सगळीकडे पाण्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.
यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 34(एम) नुसार बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी,गोकाक,मुडलगी,रायबाग तालुक्यातील सर्व सरकारी,अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक,उच्च माध्यमिक शाळाना शुक्रवार दिनांक 26.07.2024 रोजी सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
उपनिर्देशक,सार्वजनिक शिक्षण विभाग बेळगाव/चिक्कोडी तसेच उपनिर्देशक महिला व बालकल्याण विभाग बेळगाव यांनी हा आदेश काटेकोरपणे अंमलात आणावा व येत्या काही दिवसांत या सुट्टीच्या कालावधी भरून काढण्याचे नियोजन करावे.