जागतिक बालमजूरी विरोधी दिन 12 जून
WORLD DAY AGAINST CHILD LABOUR 12TH JUNE
शाळेत जायच्या आधी
हातात अवजारे आली
इवलुशा मनाची
स्वप्ने अपुरी राहिली.
बागडण्याच्या वयात
मजुरीची बेडी बांधली गेली.
वर्षानूवर्षाचे चित्र बदलूया,
आपली जबाबदारी समजूया,
बालमजूरीच्या विखळ्यातून
चिमूरड्यांना मुक्त करुया…
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) 2002 मध्ये दरवर्षी 12 जून हा दिवस “जागतिक बालमजुरी विरोधी दिन” म्हणून घोषित केला होता त्यादिवसापासून जागतिक संघटनेचे सर्व भागीदार देश दरवर्षी 12 जून हा दिवस “जागतिक बालकामगार विरोधी” म्हणून साजरा करत आहेत.त्यानुसार राज्यात दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी,खासगी क्षेत्रातील कर्मचारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बालमजुरी, किशोरवयीन मजूर नको अशी शपथ राज्यभर व्यापक स्तरावर राबविण्याची गरज आहे.सदर पत्रात सर्व शासकीय विभाग/महामंडळे/मंडळे/प्राधिकरण/संस्था/संचालनालये/कार्यालये येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना 12 जून 2024 रोजी बालमजुरापासून किंवा किशोर कामगारापासून मजुरीची कामे करणार नाही अशी शपथ घेण्यास आवश्यक पावले उचलण्याची सूचना केली आहे.
या संदर्भात,या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना याद्वारे कळविण्यात येते की,शपथ घेऊन “जागतिक बालमजुरी विरोधी दिन” आयोजीत करण्यासाठी कार्यालयाच्या बुधवार दिनांक 12-06-2024 रोजी सकाळी 11.00 वा. आवारात उपस्थित राहावे.
जागतिक बालमजूरी विरोधी दिन
कर्नाटक सरकार
कामगार आयुक्तालय
मी सत्य आणि प्रामाणिकपणे शपथ घेतो की,मी जिथे राहतो आणि जिथे मी काम करतो त्या परिसरात जर बालमजूर आढळून आले तर त्यांना नेमणूक केलेले मालक आणि त्यांच्या पालकांना निदर्शनास आणून देईन आणि त्यांना शाळेत दाखल करेन.
बालमजूर आणि किशोरवयीन मजूरांच्या सहभागाने बनवलेले कोणतेही उत्पादन मी वापरणार नाही आणि बालमजूर व किशोरवयीन मजूर कामगारांकडून कोणतीही सेवा घेणार नाही.अशी मी आज जागतिक बालमजूर विरोधी दिनानिमित्त शपथ घेतो..
“ವಿಶ್ವ ಬಾಲಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ದಿನ-2024″
ಪ್ರಮಾಣ ವಚನ
ನಾನು ಸತ್ಯವಾಗಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಹಾಗೂ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುವುದೇನೆಂದರೆ, ನಾನು ವಾಸಿಸುವ ಸುತ್ತ ಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶ ಹಾಗೂ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬಾಲಕಾರ್ಮಿಕರು ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ ನೇಮಿಸಿಕೊಂಡ ಮಾಲೀಕರು ಹಾಗೂ ಪೋಷಕರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಿ ಮಗುವನ್ನು ಶಾಲೆಗೆ ಸೇರಿಸುತ್ತೇನೆ. ಬಾಲಕಾರ್ಮಿಕ ಹಾಗೂ ಕಿಶೋರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ತಯಾರಿಸಲ್ಪಟ್ಟ ಯಾವುದೇ ವಸ್ತುವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಬಾಲಕಾರ್ಮಿಕ ಹಾಗೂ ಕಿಶೋರ ಕಾರ್ಮಿಕರ ಸೇವೆಯನ್ನು ಪಡೆಯುವುದಿಲ್ಲವೆಂದು “ವಿಶ್ವ ಬಾಲಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ದಿನ”ವಾದ ಇಂದು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ.
अधिकृतआदेश