Assessment – March 2024 MARATHI MEDIUM ANSWER KEY 5th EVS मुल्यांकन परीक्षा 2024

 

Assessment – March 2024
Class: 5
Subject: Environmental Studies 
Medium: Marathi
Marks: 40
Time: 2 Hours
imageedit 8 2574905783


कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5वी, 8वी व 9वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन 2 या मुल्यांकन परीक्षेची उत्तर पत्रिका नुकतीच परीक्षा मंडळाकडून प्रकाशित झाली आहे. त्यातील कन्नड उत्तर पत्रिकेचे भाषांतर करून खालील मराठी उत्तर पत्रिका देत आहोत.

 

परीक्षा – मुल्यांकन परीक्षा 2024

इयत्ता – 5वी

विषय – परिसर अध्ययन

माध्यम – मराठी

 

गुण – 40
 

1. खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार पर्याय दिलेले आहेत. अति योग्य उत्तर निवडा आणि त्याच्या संकेताक्षरासह लिहा. (12×1=12)

1. खालीलपैकी जो पदार्थ संप्लवन क्रियेतून जातो तो हा आहे.

A) कापूर

B) हवा

C) माती

D) पाणी

उत्तर – A) कापूर

2. लिंबाच्या रसामध्ये आढळणारा मुख्य पोषक घटक हा आहे.

A) प्रथिने

B) कर्बोदके

C) जीवनसत्व

D) चरबी

उत्तर – C) जीवनसत्व

3. खालीलपैकी सर्वात तेजस्वी ग्रह हा आहे.

A) गुरु

B) बुध

C) शनि

D) शुक्र

उत्तर – D) शुक्र

4. रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण हे आहे.

A) लोखंडी पेटी

B) बल्ब

C) विद्युत घट

D) पंखा

उत्तर – C) विद्युत घट

5. कर्नाटकातील महत्त्वाचा नृत्य प्रकार हा आहे.

A) भरतनाट्यम

B) यक्षगान

C) कथकली

D) कुचीपुडी

उत्तर – B) यक्षगान

6. यापैकी द्रव मूलद्रव्य/घटक हे आहे.

B) पाणी

A) लोह

C) दूध

D) पारा

उत्तर – D) पारा

7. धरणात साठविलेल्या पाण्यात खालीलपैकी ही ऊर्जा असते.

A) स्थितीज ऊर्जा

B) यांत्रिक ऊर्जा

D) विद्युत ऊर्जा

C) गतिज ऊर्जा

उत्तर – A) स्थितीज ऊर्जा

8. हे वनस्पती स्रोत “दुष्काळाचे मित्र” म्हणून ओळखले जातात.

A) बाजरी

B) केळी

C) पालक

D) भात

उत्तर – A) बाजरी

9. पाण्याचे रेणू सूत्र H₂O आहे. या संयुगातील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे गुणोत्तर हे आहे.

A) 2:0

B) 2:1

C) 1:2

D) 1:0

उत्तर – B) 2:1

10. खालीलपैकी कोणते ग्रामीण भागातील घरांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करते.

A) बहुमजली इमारतीमधील आग दुर्घटना.

B) कचऱ्यापासून खत तयार करण्याची यंत्रणा (पद्धत).

C) भूमीगत सांडपाण्याची बंदिस्त पद्धत.

D) रस्त्यांची व्यवस्था वाहनांच्या वाहतुकीसाठी योग्य नाही.

उत्तर – D) रस्त्यांची व्यवस्था वाहनांच्या वाहतुकीसाठी योग्य नाही.

11. जेव्हा एकाच आकाराचे नाचण्याच्या पिठाचा गोळा आणि लोखंडी गोळा फेक मोजले जातात, तेव्हा त्यांच्या वजनात फरक होता. खालीलपैकी योग्य विधान हे आहे.

A) नाचण्याच्या पिठाच्या गोळ्याचे वजन कमी, घनता जास्त असते.

B) गोळा फेकचे वजन आणि घनता अधिक असते.

C) नाचण्याच्या पिठाच्या गोळ्याचे वजन जास्त, घनता कमी असते.

D) गोळा फेकचे वजन जास्त, घनता कमी असते

उत्तर – B) गोळा फेकचे वजन आणि घनता अधिक असते.

12. आपण खाल्लेले अन्न ठरविणारे विधान खाली दिले आहेत. तर खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

A) अन्न व्यवस्था ही आपण राहत असलेल्या प्रदेशात उपलब्ध असलेल्या अन्न सामग्रीवर आधारीत असते.

B) अन्न व्यवस्था ही त्या प्रदेशाच्या हवामानावर आधारीत असते.

C) आपण सर्व ऋतूंमध्ये एकाच प्रकारचे अन्न खातो.

D) अन्न व्यवस्था विशिष्ट कुटुंबाच्या परंपरेच्या आधारावर आहे..

उत्तर – C) आपण सर्व ऋतूंमध्ये एकाच प्रकारचे अन्न खातो.

II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (10×2=20)
13.
मूलद्रव्ये म्हणजे काय? ऑक्सीजनची संज्ञा लिहा.
उत्तर – एकाच प्रकारच्या सूक्ष्म कणांचा समूहास मूलद्रव्ये म्हणतात.
ऑक्सीजनची संज्ञा ‘O’
14. आपले राष्ट्रीय चिन्ह कोणते ? त्याचे एक वैशिष्ट्य लिहा.
उत्तर – चार सिंहांचे मुख असलेली मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे.
→ हे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील स्तंभावरून घेण्यात आलेले आहे.
→ हे चिन्ह आपण चलनी नाणी आणि नोटावर पहातो.
→ चक्र,घोडा आणि बैल यांची चित्रे आहेत.
→ यावर सत्यमेव जयते लिहिलेले आहे.
(योग्य वैशिष्ट्याला एक गुण देणे.)

 

15. बेट आणि द्वीपकल्प यांच्यातील फरक लिहा.
उत्तर- वेढलेल्या जमिनीच्या तुकड्याला बेट म्हणतात.
तिन्ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूला जमीन असलेल्या प्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात.

16. खालील वस्तूंचे त्यांच्या पदार्थाच्या अवस्थेवर आधारीत वर्गीकरण करा. लाकडाचा तुकडा, पाणी, हवा, साखर पावडर
उत्तर –

 

घनद्रववायु
लाकडाचा तुकडापाणीहवा
साखर पावडर  
   
 

17. मानवी आरोग्यावर जंक फूड खाण्याचे कोणतेही 2 अपायकारक परिणाम (दुष्परीणाम) लिहा.
उत्तर – 
→ लोक लवकर आजारी पडतात.
→ सकस आहाराऐवजी स्वादिष्ट अन्नाचे सेवन जास्त केल्याने शरीराला अपायकारक रसायने शरीरात जातात.
→ शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते.
→ मसालेदार अन्न,जंक फूड यांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
→ (एका मुद्यासाठी 1 गुण याप्रमाणे कोणत्याही 2 मुद्द्यासाठी 2 गुण (इतर जवळचे उत्तर असल्यास त्याचा विचार करणे.)
18. बेंगळुरूसारख्या मेट्रो शहरांमध्ये वैयक्तिक घरांपेक्षा लोक अपार्टमेंटला पसंती देत आहेत. त्याची कोणतीही दोन योग्य कारणेलिहा.
उत्तर – कारण तेथे कुटुंबासाठी आवश्यक सर्व सुविधा असतात.
→उत्तम रस्ते,वाहतूक व्यवस्था, विद्युत व्यवस्था,पाण्याची सोय, कचरा निर्मूलन या सर्व सुविधा असतात.
→समुदाय भवन,दुकाने ,पार्किंग व्यवस्था,गटारीची व्यवस्था, दवाखाना,शाळा इत्यादी आवश्यक सार्वजनिक सुविधा असतात.

19. पृथ्वीवरील सौर ऊर्जेच्या मुख्य स्रोतावर कार्य करणाऱ्या कोणत्याही चार उपकरणांची नांवे लिहा.
उत्तर – सौर कुकर,सौर जलतापक,सौर दिवा,सौर इन्वर्टर,सौर गणक यंत्र, सौर घड्याळ, सौर पथदिप, सौर ट्रॅफिक सिग्नल, → सौर स्टोव्ह,
(एक उपकरणास अर्धा गुण)

20. इंधनाचा नैसर्गिक स्रोत म्हणून वापर करताना कोणते सावधगिरीचे उपाय केले जाऊ शकतात ?
उत्तर -इंधनाचा जपून वापर करून पर्यावरणाचे रक्षण करणे.
*पारंपारिक इंधनाऐवजी सौर ऊर्जेचा अधिक वापर करणे.
(प्रत्येक घटकासाठी 1 गुण)

21. एक धातूचे नाणे, एक लोखंडी खिळा, लोणी आणि लाकडी डस्टर पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवले आहेत. तर पाण्याततरंगणाऱ्या वस्तू आणि पाण्यात बुडणाऱ्या वस्तू यामध्ये वर्गिकरण करा.
उत्तर –

पाण्यात तरंगणाऱ्या वस्तूपाण्यात बुडणाऱ्या वस्तू
लोणीधातूचे नाणे
लाकडी डस्टरएक लोखंडी खिळा
  

(बरोबर योग्य उत्तराला 1/2 गुण  1/2 * 4 = 2 )

22. पठाराचे कोणतेही दोन फायदे लिहा.
उत्तर –
→ पठारांमध्ये भरपूर खनिज संपत्ती असते.
→येथे वाहणाऱ्या नद्या पिकांच्या वाढीस मदत करतात.
→ येथील धबधबे जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त असतात.
→ शेती, पशुसंवर्धन आणि उद्योग इत्यादी साठी हा प्रदेश उपयुक्त असतो.

III. खालील प्रश्नांची उत्तरे द्या (2×4=8)
23.
कल्पना करा की तुमच्या गावात तलाव स्वच्छतेचा कार्यक्रम चालू आहे. तलावाची स्वच्छता न केल्यास होणारे कोणतेही 4परिणाम लिहा.
उत्तर –
1. जलप्रदूषण होते.
2. पिण्याचे पाणी विषारी होते.
3. दैनंदिन वापरासाठी पाणी वापरता येत नाही.
4. जलचर प्राणी मरतात.
5. जलचर वनस्पती मरतात.
6. अनेक सांसर्गिक रोग होतात.
(कोणतेही 4, 1 मुद्द्यासाठी एक गुण)

24. सौर मंडळाची आकृती काढा. खाली दिलेल्या क्लुप्त्यांचा वापर करून ग्रह चिन्हांकित करा. 4
25. सर्वात मोठा ग्रह
26. आपण राहतो तो ग्रह
27. लाल ग्रह
उत्तर –

 

imageedit 6 7815074448


 

 

वरील नमुना पत्रिकेची pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


उत्तर पत्रिका(मराठी माध्यम)
 


उत्तर पत्रिका(कन्नड माध्यम)

 

 

 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *