इयत्ता – पाचवी
विषय – माय मराठी
नमुना प्रश्नोत्तरे
18. ज्योत
(कविता)
नवीन शब्दांचे अर्थ
झगमगाट – चकचकीत
लखलख – तेजस्वी प्रकाश
दिवटी – लहान मशाल
बिजली – वीज
सकल – सर्व
मिणमिणते – मंद
प्रकाश देते
देह – शरीर
ठावे – माहित
जन – लोक
उजळो – प्रकाशमय होवो
मज – मला, माझ्यासाठी
इवली – लहान
स्वाध्याय
अ. खालील प्रश्नांची
उत्तरे लिही.
1. दिवटी कोणाची आवडती होती?
उत्तर –दिवटी शेतकऱ्यांची आवडती होती.
2. समई कोठे लावतात ?
उत्तर –समई देवापुढे लावतात.
3. या कवितेत काचेचा महाल कोणास म्हटले आहे?
उत्तर –या कवितेत कंदिलास काचेचा महाल म्हटले आहे.
4. वरात कोणावाचून अडते?
उत्तर –वरात बत्तीवाचून अडते.
5. दिव्याची ज्योत कोणता संदेश देते ?
उत्तर –स्वतः जळून जगाला प्रकाश द्यावा असा दिव्याची ज्योत
संदेश देते.
आ. खालील उदाहरणाप्रमाणे कवितेतील पाच लयबध्द शब्द लिही.
उदा. पणती – मिणमिणती
1. बाहेर – धूर
2. म्हणती – ज्योती
3. नवे – बरवे
4. बिजली – लखलखती
5. मिळो – उजळो
इ. गाळलेल्या जागी
कवितेतील योग्य शब्द लिही.
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा
सकलाला
कसलेही मज रुप मिळो
देह जळो अन् जग उजळो
।।6।।
उ. ज्योत या
कवितेतील वर्णन केलेल्या प्रकाशदीपांचे वर्णन टप्याटप्प्याने 8 ते 10 ओळीत लिही.
प्रकाश देणारे मानवनिर्मित उपकरण म्हणजे प्रकाशदीप.प्रकाश दीप सर्वांना
प्रकाश देण्याचे कार्य करतो. मंदिर,देव्हारे, घर इत्यादी ठिकाणी प्रकाश दीप वापरला जातो. प्रकाश दीप स्वतः जळतो,स्वतः अंधारात राहतो पण सर्वांना उजेड देतो, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो.हे महत्व ओळखूनच सायंकाळच्या वेळी
दिवा लागल्यावर दिव्यास नमस्कार करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात सणाच्या दिवशी
प्रकाश दिपांना महत्वाचे स्थान असते. दिवाळीत प्रकाश दीप लावून सर्वत्र रोषणाई
केली जाते.