प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन,प्रास्ताविक,निमंत्रण पत्रिका Sutrasanchalan,Prastavik Republic Day

प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण आहे.26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली व भारत देश प्रजासत्ताक देश बनला

 प्रजासत्ताक दिन मराठी भाषण संग्रह -: 

┈┉━❀SmartGuruji❀━┉┈
सूत्रसंचालन
प्रास्ताविक
निमंत्रण पत्रिका
 कार्यक्रम पत्रिका
प्रास्तविक
आभार प्रदर्शन
भाषण संग्रह
प्रश्नमंजुषा

      प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण आहे.26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली व भारत देश प्रजासत्ताक देश बनला.म्हणून हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी देशात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते.अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकावून. मिठाई वाटून हा सण साजरा केला जातो.शाळा,महाविद्यालयात या दिवशी देशभक्ती गीत,भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात व भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न केलेल्या,स्वतःची आहुती दिलेल्या देशभक्तांचे स्मरण केले जाते.भाषणांमध्ये देशाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा, विकासाचा आणि आधुनिक आव्हानांचा उल्लेख केला जातो.या भाषणांमधून लोकांना देशाच्या प्रगतीसाठी जागृत करण्याचा आणि राष्ट्रभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला जातो.

    आमचा भारत हे एक मोठा लोकशाही देश आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे.हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.भारत प्रजेचा झाला.म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन असेही म्हटले जाते.

वतन हमारा ऐसा,कोई ना छोड़ पाये,

रिश्ता हमारा ऐसा,कोई न तोड़ पाये,

दिल एक है,जान एक है हमारी,

हिन्दुस्तान हमारा है,यह शान हैं हमारी।

Happy Republic Day

   शाळेतील व विविध कार्यालयातील प्रजासत्ताक दिन निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक निमंत्रण सूत्रसंचालन,प्रास्ताविक,निमंत्रण पत्रिका,कार्यक्रम पत्रिका,घोषवाक्ये,आभार प्रदर्शन इत्यादी pdf स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.






















































































































Share with your best friend :)