6th SS 13.Sultans of Delhi दिल्लीचे सुलतान

 इयत्ता – सहावी

 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

 

अभ्यासक्रम – 2023 सुधारित 

स्वाध्याय 

प्रकरण 13 – दिल्लीचे सुलतान

 

अभ्यास

 

महत्वाच्या सनावळ्या –

कालगणना (सा. श. )

 

सिंध प्रांतावर अरबांचे आक्रमण -: 712

 

महंमद गझनीच्या स्वाऱ्या -:  1000-1026

 

तराईचे युद्ध (महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील) -: 1191-1192

 

दिल्लीच्या सुलतानांची कारकीर्द -: 1206-1526

 

कुतुबुद्दीन ऐबक-:  1206-1210

 

रजिया सुलताना-:  1236 1240

 

अल्लाउद्दीन खिलजी-:  1296-1316

 

महंमद बिन तुघलक-:  1325-1351

 

पानिपतची लढाई आणि मोगल साम्राज्याचा उदय -: 1526
 

 

गटात चर्चा करून उत्तरे लिहा :

 

1. महंमद गझनीच्या स्वाऱ्याचे परिणाम लिहा.
उत्तर – महंमद गझनीने भारतावर  17 वेळा स्वाऱ्या करून मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिर यासारख्या धार्मिक स्थळे उध्वस्त केली.भारतातील समृद्ध शहरे आणि श्रीमंत मंदिरे लुटली गेली व नष्ट झाली हे महमद गझनीच्या स्वाऱ्यांचे  परिणाम होते.

2. महंमद घोरीची कामगिरी लिहा.

उत्तर – 

    महंमद घोरीच्या कामगिरीमध्ये भारतातील सिंध आणि पंजाब प्रांत सुरक्षित करणे समावेश होतो. त्याने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याला ठार मारले व  दिल्ली जिंकली.त्याने जिंकलेले प्रदेश आपल्या सेनापती कुतुबुद्दीन ऐबककडे स्वाधीन केले. कुतुबुद्दीन दिल्लीचा सुलतान म्हणून राज्य करू लागला.

3. कुतुबुद्दीन ऐबकाची कामगिरी लिहा.

उत्तर –

    कुतुबुद्दीन ऐबक हा सुरुवातीला महंमद घोरीचा गुलाम होता.त्यामुळे त्यांना ‘गुलाम वंश’ म्हणतात.त्याने शत्रूला जिंकून तुर्कांचे राज्य बळकट केले.आपल्याला मिळालेल्या विजयाची आठवण म्हणून दिल्ली येथील मेहरोली मध्ये कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात केली. सुलतान इल्तुमिशनच्या
काळात तो पूर्ण झाला.

4. अल्लाउद्दीन खिलजीने राज्यकारभारात केलेले विविध प्रयोग कोणते ? त्यांचे परिणाम सांगा.

उत्तर –

    अल्लाउद्दीन खलजीने आपल्या राजवटीत अनेक धोरणे आणली. त्यांनी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या किमती नियंत्रित केल्या,दिल्लीत
दारू आणि जुगार खेळण्यावर बंदी घातली आणि या कृती करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली.संपूर्ण भारत जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणावा अशी अल्लाउद्दीन यांची महत्वकांक्षा होती आणि ती साध्य करण्यासाठी लष्करी ताकदीचा वापर केला.त्याच्या लष्करी मोहिमांमुळे उत्तर भारतावर ताबा मिळविला.आपला गुलाम मलिक कपूर याला पाठवून दक्षिण भातातातील अनेक राज्ये त्यांच्या राजधान्या व अनेक देवालये लुटून भरपूर धनसंपत्ती गोळा केली.

5. महंमद बिन तुघलकाने केलेले राज्यकारभारातील प्रयोग असफल का झाले ?

उत्तर – 

    तुघलक घराण्यामध्ये महम्मद बिन तुघलक हा प्रमुख सुलतान होऊन गेला.त्याने आपली राजधानी दिल्ली ऐवजी भारताच्या मध्यभागी असलेल्या देवगिरी येथे केल्यास ते आपल्या साम्राज्याचे मध्यवर्ती ठिकाण होईल असा विचार करून राजधानी दिल्लीहून देवगिरीला स्थलांतरीत केली.  महम्मद तुघलकने चांदीच्या नाणे ऐवजी तांब्याची तेवढ्याच तांब्याची नाणी चलनात आणली.परंतु तांब्याची नाणी छापण्याचा अधिकार फक्त सरकारलाच असेल अशी राजाज्ञा केली नाही.त्यामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला इत्यादी महम्मद बिन तुघलकने केलेले प्रयोग होय.या धोरणांमुळे असंतोष आणि बंडखोरी माजली.

6. दिल्लीच्या सुलतानाच्या काळातील राज्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती कशी होती ?

उत्तर – दिल्ली सुलतानांच्या राजवटीत,जमीन महसुलाचा बोजा शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पडला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापक बंद केले.विणकाम हा एक प्रमुख व्यवसाय होता आणि शहरात बांधकाम व्यवसाय मोठ्या परमाणात चालत असे त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत अस.गुलामगिरी प्रचलित होती, सुलतान भारतीयांना गुलाम बनवून बाजारात विकत होते.

7. दिल्लीच्या सुलतानांनी वास्तुशिल्पकला व साहित्याला दिलेले योगदान कोणते ?

उत्तर – दिल्ली सुलतानांनी वास्तुशिल्प आणि साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले. दिल्ली सुलतानांच्या काळातील प्रमुख वास्तुशिल्प म्हणजे प्रसिद्ध कुतुबमिनार (71 मी.उंच),अलाई दरवाजा हे सुंदर द्वार,कव्वत-उल-इस्लाम मशीद आणि सिरी किल्ला हे होत.

साहित्याच्या दृष्टीने उर्दू भाषेचा विकास झाला आणि अमीर खुस्त्रो अमीर हसन यांसारख्या कवींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.हा संगीतकार  होता.जयशी कवीने ‘पद्मावत’ हे सुफी काव्य लिहिले.रामानंद,कबीर,रोहिदास,मीरा हे या काळातील संत होते.

संत रोहिदास 

 

संत मीराबाई

 

अधिक माहितीसाठी व सरावासाठी प्रश्न-:

1. तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने कोणाचा पराभव केला?

उत्तर – तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला.

2. कुतुबमिनार कोणी निर्माण केला?

उत्तर – कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबक यांनी निर्माण केला.

3. दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला कोण?

उत्तर – दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला रजिया सुलतान होय.

4. दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाऊद्दीन खिलजीचा सेनापती कोण?

उत्तर – दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कपूर होय.

5. महंमद बिन तुघलकाने राजधानी कोठून कोठे स्थलांतरित केली?

उत्तर – महंमद बिन तुघलकने राजधानी दिल्लीहून दौलताबाद (देवगिरी) येथे स्थलांतरित केली.

 

 

 

 

 

Share your love

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *