1. कार्कोट राजवंशातील सर्वात प्रभावशाली राजा कोण होता ?
उत्तर-ललितादित्य हा कार्कोट राजवंशातील सर्वात प्रभावशाली राजा होता.
2. रजपूतांचे गुणधर्म कोणते ?
उत्तर-राजपूत त्यांच्या शौर्यासाठी,साहसी भावनेसाठी आणि दुर्बल, अनाथ, स्त्रिया आणि गायींचे संरक्षण करणे हा आपला धर्म आहे असे समजत. पतीच्या निधनानंतर अपमानित होऊन जगण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे समजून सामूहिक आत्मा समर्पणाची जोहार पद्धत त्यांनी स्वीकारली होती.
3. रजपूतांच्या तीन प्रसिद्ध वास्तुशिल्पाची नावे सांगा. ती कोठे आहेत ?
उत्तर-राजपूत युगातील तीन प्रसिद्ध वास्तू आहेत:
a. खजुराहो (मध्य प्रदेश) येथील खंडेराया महादेवाचे मंदिर
b.दिलवारा मंदिर, माउंट अबू (राजस्थान)
c.सूर्य मंदिर, कोणार्क (ओडिशा)
4. ‘पृथ्वीराजरासो‘ आणि ‘गीत गोविंद‘ हे कोणी लिहिले ?
उत्तर – ‘पृथ्वीराजरासो‘ आणि ‘गीत गोविंद‘ हे अनुक्रमे चांद बर्दाई आणि जयदेव यांनी लिहिले.
5. ‘पृथ्वीराज चौहान‘ यांच्या विषयी टिपा लिहा.
उत्तर-पृथ्वीराज चौहान हा एक प्रसिद्ध राजपूत राजा होता.तो त्याच्या शौर्य आणि धैर्यासाठी ओळखला जात असे.मुहम्मद घोरीविरुद्धच्या लढाईसाठी ओळखला जातो.
6. बप्पारावळ कोण होता ?
उत्तर -खोमन्ना हा राजपूतामध्ये गुहिल वंशाचा एक पराक्रमी राजा होता.अरबांच्या आक्रमणापासून आपल्या राज्याचे संरक्षण करून खोमन्नाने ‘बप्पारावळ‘ ही पदवी धारण केली.
7. राणा संग्रामसिंहावर टिपा लिहा.
उत्तर -राणा संग्रामसिंह यांना राणासंग म्हणूनही ओळखले जाते.राणा संग्रामसिंह हा एक वीर राजपूत राजा होता.तो 100 लढाया करणारा शूरवीर राजा होता.त्यांने दिल्लीच्या सुलतानांविरुद्ध अनेक लढाया केल्या.
8. रजपूतांच्या सामाजिक स्थितीवर टिपा लिहा.
उत्तर -रजपूत काळात समाजात व्यवसायानुसार वेगवेगळी वर्ग व्यवस्था होती.महिलांना समाजात आदराचे स्थान होते.स्त्रिया साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला, आणि कलाकुसरीच्या कार्यात निपूण होत्या. रजपूत राजे हे पूण्यक्षेत्रामध्ये स्नान करणे हे पवित्र समजत असत.
9. अहोम राजघराण्याचा प्रसिद्ध राजा कोण होता ?
उत्तर -अहोम वंशाचा प्रमुख शासक सुकापा होता तोच या राजवंशाचा संस्थापक होता.