इयत्ता 5वी गणित SA-2 नमूना प्रश्नपत्रिका-1 (2025–2026)

Class – 5 गणित द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) नमूना प्रश्नपत्रिका – 1 Marks – 40

इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) नमूना प्रश्नपत्रिका – 1 येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रश्नपत्रिका अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, गणन कौशल्य, तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त आहे.

या नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रश्नांची रचना अशी करण्यात आली आहे की विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव करता येईल आणि परीक्षेत वेळेचे योग्य नियोजन करता येईल.

  • सोप्या ते अवघड पातळीवरील प्रश्नांचा समावेश
  • वस्तुनिष्ठ प्रश्न, रिकाम्या जागा भरा, उदाहरणे सोडवा
  • शब्दसमस्या व अनुप्रयोग आधारित प्रश्न
  • विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारे प्रश्न

ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रभावी सराव करण्यासाठी तसेच शिक्षकांना मूल्यमापनाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थ्यांनी निर्धारित गुणमर्यादा (Marks – 40) लक्षात घेऊन वेळेचे योग्य नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवावी.

सर्व प्रश्नपत्रिका Printable PDF Format मध्ये उपलब्ध आहेत. शिक्षक व विद्यार्थी आवश्यकतेनुसार PDF डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकतात.

* विशेष सूचना:
ही प्रश्नपत्रिका केवळ नमुना (Model) स्वरूपाची आहे. शिक्षकांनी आपल्या शाळेच्या गरजेनुसार, विद्यार्थ्यांच्या पातळीप्रमाणे किंवा अभ्यासक्रमातील आवश्यक बदलांनुसार कोणताही प्रश्न किंवा मजकूर बदलू शकतात.
द्वितीय संकलित मूल्यमापन २०२५-२६ – गणित

द्वितीय संकलित मूल्यमापन 2025-26

नमूना प्रश्नपत्रिका-1

इयत्ता – ५वी विषय – गणित गुण – 40 कालावधी – 90 मिनिटे
प्रश्न 1. खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा: (4 × 1 = 4)
1. एका संख्येला दुसऱ्या संख्येने गुणले असता येणाऱ्या संख्येला काय म्हणतात?
A) भागाकार B) बेरीज C) गुणाकार D) वजाबाकी
2. घनाला (Cube) किती चौरसाकृती पृष्ठभाग असतात?
A) 4 B) 6 C) 8 D) 12
3. 300 x 3000 चा गुणाकार किती येईल?
A) 900000 B) 9000 C) 90000 D) 900
4. खालीलपैकी चौरस संख्या कोणती आहे?
A) 3 B) 6 C) 9 D) 10
प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा: (4 × 1 = 4)

5. दंडगोलाला 2 वर्तुळाकार पृष्ठभाग व 1 __________ पृष्ठभाग असतो.

6. कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता गुणाकार __________येतो.

7. 1 + 2 + 3 + 2 + 1 = __________

8. शंकूला (Cone) __________ वर्तुळाकार पृष्ठभाग असतो.

प्रश्न 3. एका वाक्यात उत्तर द्या: (4 × 1 = 4)

9. घनायातला किती पृष्ठभाग असतात?

10. 1, 3, 6, 10, 15 या संख्यांना कोणत्या प्रकारच्या संख्या म्हणतात?

11. जर 2007 या वर्षात 900 सायकली तयार झाल्या आणि 2008 मध्ये 500 सायकली तयार झाल्या, तर सर्वात जास्त सायकली कोणत्या वर्षी तयार झाल्या?

12. 30 x 700 चा गुणाकार काढण्यासाठी राम प्रथम 3 x 7 = 21 लिहितो, तर त्यापुढे तो किती शून्य देईल?

प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा: (2 × 10 = 20 गुण)

13. गुणाकार करा: 30 x 700

14. खालील आकृतीबंध पूर्ण करा: 1, 4, 9, 16, 25, ____, ____.

15. 2005 मध्ये 800 सायकली आणि 2006 मध्ये 600 सायकली तयार झाल्या. तर या दोन वर्षांत मिळून एकूण किती सायकली तयार झाल्या?

16. घन (Cube) आणि घनायात (Cuboid) यांच्या पृष्ठभागांमधील एक फरक सांगा.

17. ‘अ’ गट आणि ‘ब’ गट यांच्या जोड्या जुळवा:

अ) गटब) गट
A. दंडगोल1) 1 वर्तुळाकार पृष्ठभाग व 1 वक्र पृष्ठभाग
B. शंकू2) 2 वर्तुळाकार पृष्ठभाग व 1 वक्र पृष्ठभाग

18. बेरीज करून वर्गसंख्या मिळवा: 1 + 2 + 3 + 4 + 5 + 4 + 3 + 2 + 1 = ?

19. 2007 मध्ये 900 सायकली तयार झाल्या आणि 2008 मध्ये 500 सायकली तयार झाल्या. 2007 मध्ये 2008 पेक्षा किती जास्त सायकली तयार झाल्या?

20. पुढील त्रिकोणी संख्यांचा आकृतीबंध पूर्ण करा: 1, 3, 6, 10, 15, ____, ____.

21. दिलेल्या आकारांची नावे लिहा:
A) ज्याला 1 वक्र आणि 2 वर्तुळाकार पृष्ठभाग असतात.
B) ज्याला 6 चौरसाकृती पृष्ठभाग असतात.

22. गुणाकार करा: 4 x 4 x 4 x 4 = ?

प्रश्न 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा: (4 × 2 = 8 गुण)

23. खालील बेरजेचा आकृतीबंध ओळखा आणि गाळलेल्या जागा भरून तो पूर्ण करा.

  • A) 1 + 2 + 1 = 4
  • B) 1 + 2 + 3 + 2 + 1 = 9
  • C) 1 + 2 + 3 + 4 + 3 + 2 + 1 = 16
  • D) 1 + 2 + 3 + 4 + 5 + 4 + 3 + 2 + 1 = 25
  • E) 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1 = _______
  • F) 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1 = _______

24. सायकलींच्या संख्येचा तक्ता:

वर्षसायकलींची संख्या
2005800
2006600
2007900
2008500
2009700

A) सर्वात जास्त सायकली कोणत्या वर्षी तयार झाल्या आणि किती? (1 गुण)
B) सर्वात कमी सायकली कोणत्या वर्षी तयार झाल्या आणि किती? (1 गुण)
C) 2005, 2006 आणि 2007 या तीन वर्षांत मिळून एकूण किती सायकली तयार झाल्या? (2 गुण)

MODEL ANSWER SHEET

प्रश्न 1. बहुपर्यायी

1. C) गुणाकार | 2. B) 6 | 3. A) 900000 | 4. C) 9

प्रश्न 2. रिकाम्या जागा

5. वक्र | 6. 0 (शून्य) | 7. 9 | 8. 1

प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे

9. 6 पृष्ठभाग | 10. त्रिकोणी संख्या | 11. 2007 | 12. 3 शून्य (000)

प्रश्न 4 & 5. उत्तरे

13. 21000 | 14. 36, 49 | 15. 1400 | 18. 25 | 19. 400 | 20. 21, 28 | 22. 256

23. E) 36, F) 49 | 24. A) 2007 (900), B) 2008 (500), C) 2300

ORAL TEST (20 × 1 MARK)

1. गुणाकार म्हणजे काय? (उत्तर: एका संख्येला दुसऱ्याने गुणण्याची क्रिया)

2. 10 x 10 किती होतात? (उत्तर: 100)

3. घनाला एकूण किती पृष्ठभाग असतात? (उत्तर: 6)

4. कोणत्याही संख्येला 0 ने गुणले तर उत्तर काय? (उत्तर: 0)

5. शंकूला किती वक्र पृष्ठभाग असतात? (उत्तर: 1)

6. 1, 4, 9, 16 कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? (उत्तर: चौरस संख्या)

7. 40 x 20 किती? (उत्तर: 800)

8. घनायाताला इंग्रजीत काय म्हणतात? (उत्तर: Cuboid)

9. 15 आणि 21 कोणत्या प्रकारच्या संख्या? (उत्तर: त्रिकोणी संख्या)

10. 1 + 2 + 1 बेरीज किती? (उत्तर: 4)

11. दंडगोलाचे किती पृष्ठभाग वर्तुळाकार असतात? (उत्तर: 2)

12. 25 ही कोणती संख्या आहे? (उत्तर: चौरस संख्या)

13. 500 x 2 किती? (उत्तर: 1000)

14. 1, 3, 6, 10 च्या पुढील संख्या? (उत्तर: 15)

15. विटेचा आकार कोणता असतो? (उत्तर: घनायात)

16. 16 नंतरची चौरस संख्या? (उत्तर: 25)

17. 300 x 3000 मध्ये 9 च्या पुढे किती शून्य? (उत्तर: 5)

18. स्तंभालेखाचा उपयोग कशासाठी होतो? (उत्तर: माहितीची तुलना करण्यासाठी)

19. 25 + 25 किती? (उत्तर: 50)

20. फासा (Dice) कोणत्या आकाराचा असतो? (उत्तर: घन)

साधने डाऊनलोड करा (Download Resources)

खालील बटणांचा वापर करून पीडीएफ स्वरूपात फाईल्स मिळवा.

DOWNLOAD QUESTION PAPER DOWNLOAD ANSWER SHEET DOWNLOAD ORAL TEST

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now