6th SS 14.Indian Intellectualism and Bhakti Movement Religious and social reform movements भारतीय वैचारिकता आणि भक्ती पंथ

 इयत्ता – सहावी

6th SS 14.Indian Intellectualism and Bhakti Movement Religious and social reform movements भारतीय वैचारिकता आणि भक्ती पंथ

 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

 

अभ्यासक्रम – 2023 सुधारित 

स्वाध्याय 

प्रकरण 14 – भारतीय वैचारिकता आणि भक्ती पंथ

धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी

 

कालगणना

 

शंकराचार्य – 8 वे व 9 वे
शतक

 

रामानुजाचार्य –11 वे व 12 वे
शतक

 

बसवेश्वर- 12 वे शतक

 

मध्वाचार्य – 13 वे व 14 वे
शतक

 

श्री चैतन्य – 1486-1534

 

गुरु नानक – 1469-1538

 

मीराबाई – 1498-1546

 

निजामुद्दीन औलिया – 1238-1325

 

मोइनुदिन विस्ती – 13 वे शतक

 

बंदेनवाज – 15 वे शतक

 

सलीम चिस्ती – 16 वे शतक

 

 

 

गटांमध्ये चर्चा करा आणि उत्तर द्या.

 

1. शंकराचार्यांनी कोणत्या सुधारणा
केल्या
?

 

उत्तर –  शंकराचार्यांनी
तात्कालीन हिंदू समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या.प्रमुख ठिकाणी चार मठ (मठ)
स्थापन केले आणि भजन व भक्तिगीते लिहिली.त्यांनी अनेक शास्त्रीय ग्रंथ
लिहिले.त्यांची भजगोविन्दम हि कृती आजची लोकप्रिय आहे.भारतीयांना धार्मिकरित्या
जोडणे हा त्यांच्या सुधारणांचा उद्देश होता.

 

 

 

2. रामानुजाचार्य
यांनी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या
?

 

उत्तर –  रामानुजाचार्य
यांनी जातिवादाचा निषेध केला आणि दक्षिण भारतात अनेक भव्य मंदिरे बांधली.भक्ती आणि
देवाला शरण जाऊन मोक्ष मिळू शकतो या विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार केला.

 

 

 

3. बसवेश्वरांची
शिकवण काय आहे
?

 

उत्तर –  जातिरहित
समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने बसवेश्वरांनी “कार्य हीच पूजा”
(कायकवे कैलास) या ब्रीदवाक्याचा प्रचार केला.जातिव्यवस्था
,मूर्तिपूजा आणि यज्ञ-यागांचा निषेध केला आणि स्त्री हीच
सर्वस्व असते या मतावर जोर दिला.

 

 

 

4. वचन
साहित्याचे महत्व सांगा. काही वचनकारांची नावे सांगा.

 

उत्तर –  वचन साहित्य
हा एक वेगळा साहित्य प्रकार आहे.जो गद्यासारखा वाचला जाऊ शकतो किंवा कवितांप्रमाणे
गायला जाऊ शकतो.बसवेश्वर
, जेडर
दासीमय्या
,अल्लमप्रभू,चन्नबसवण्णा, अक्कमहादेवी आणि इतरांनी वचने रचली त्या वचनांचे प्रकटपणे
चिंतन आज
ही चालू आहे.

 

 

 

5. मध्वाचार्यांचे
योगदान काय आहे
?

 

उत्तर –  मध्वाचार्यांनी
द्वैत तत्त्वज्ञानाशी संबंधित ग्रंथांची रचना केली.उडुपी येथे नियमित पूजेसाठी
शिष्यांची नियुक्ती केली आणि भक्तीचा सोपा मार्ग सांगितला.त्यांच्या उपदेशांचा
प्रभाव कर्नाटक
,महाराष्ट्र,आंध्र व तामिळनाडू येथील जनतेवर झाला.

 

 

 

6. भक्ती
संतानी काय उपदेश केला
?

 

 

 

उत्तर –  भक्ती
संतांनी भक्तीमार्गाचा उपदेश केला.भेदभाव
, कालबाह्य रूढी आणि प्रथा यांचा निषेध केला आणि लोकांन योग्य
मार्गावर चालण्यास प्रोत्साहित केले.

 

 

 

7. गुरु
नानक यांच्या गाण्यांना काय म्हणतात
?

 

उत्तर –  गुरु
नानकांच्या गाण्यांना जपजी म्हणतात आणि ते शिखांचे पवित्र ग्रंथ ग्रंथसाहिबमध्ये
आढळतात.

 

 

 

8. भारतातील
प्रमुख सुफी संत कोण
?

 

उत्तर – निजामुद्दीन औलिया,बंदेनवाज, सलीम
चिस्ती आणि मोईनुद्दीन चिस्ती हे भारतातील प्रमुख सूफी संत आहेत.

 

 

 

9. भक्ती
चळवळीचे परिणाम सांगा.

 

उत्तर – भक्ती चळवळीने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा निर्माण
केला.साहित्याच्या रचनेद्वारे भारतीय भाषा समृद्ध केल्या आणि मानवजातीसाठी प्रेम
,समानता आणि सेवा यांना प्रोत्साहन दिले.

 

 

 

10. संतानी
उपदेश केलेला मार्ग कोणता
?

 

उत्तर –  संतांनी
भक्तिमार्गाचा उपदेश केला.भक्ती
, प्रेम
आणि ईश्वरसेवा यावर भर दिला.

 

 

 

11. शिखांचा
पवित्र ग्रंथ कोणता
?

 

उत्तर –  शिखांचा
पवित्र ग्रंथ म्हणजे ग्रंथसाहिब.

 

 


Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *