6th SS 21.Asia आशिया

  इयत्ता – सहावी

6th SS 21.Asia आशिया

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

पाठ 21– आशिया 


हे तुम्हाला
माहित असू दे.

 •  माउंट एव्हरेस्ट हे आशिया खंडातील
  सर्वात उच ठिकाण आहे. (
  8848 मीटर)
 • मृत समुद्र आशिया खंडातील सर्वात खोल ठिकाण आहे.
 • जगातील सर्वात जास्त हिमनद्या काराकोरम पर्वतश्रेणी मध्ये आहेत.
 • जगात अति उंच असे तिबेटचे पठार आहे. त्याला “जगाचे छप्पर”
  असे म्हणतात.
 • कॅस्पियन समुद्र जगातील अत्यंत विशाल समुद्र आहे.
 • दक्षिण सैबेरियातील “बैकल सरोवर” सर्वात खोल सरोवर आहे.
 • क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या मानाने मालदीव हा देश आशियातील सर्वात लहान
  देश आहे.

1. “आशिया खंडाला वैविध्यपूर्ण खंड” का म्हणतात ?
उत्तर –जगात आशिया खंड मोठा
आहे.त्यामुळे येथील स्वाभाविक लक्षणे
, हवामान, वनस्पती, वन्यप्राणी, मातीचे प्रकार इत्यादीमध्ये विविधता दिसून येते.म्हणून
आशिया हा वैविध्यपूर्ण खंड म्हणून ओळखला जातो.या खंडामध्ये अति उंच पर्वत
, विशाल व सुपीक मैदाने, वाळवंटी प्रदेश, नद्यांची मैदाने आणि सरोवरे दिसून येतात.त्याचप्रमाणे भाषा, धर्म, लोकसंख्येची
विभागणी आणि लोकसंख्येची घनता यामध्येही आम्हाला विविधता आढळून येते.त्यामुळे
आशिया
वैविध्यपूर्ण खंडम्हणून ओळखला जातो.2.
आशिया खंडाची भौगोलिक परिस्थिती लिहा.
उत्तर –आशियाला तीन बाजूंनी महासागर
आणि एका बाजूला जमिनीने वेढलेले आहे. उंच पर्वत
, पठार, विस्तीर्ण
मैदाने
,
वाळवंट आणि नदी प्रणाली यासारख्या विविध भौतिक
वैशिष्ट्यांचा हा सर्वात मोठा खंड आहे.या खंडात विविध हवामान
, वनस्पती आणि वन्यजीव आहेत.
3.
आशिया खंडाचे स्वाभाविक विभाग कोणते ?
उत्तर –आशिया खंड 5 प्रमुख स्वाभाविक विभागात विभागलेला आहे.
1.
वायव्येकडील सखल मैदाने.
2.
मध्यभागातील पर्वतमय प्रदेश.
3.
दक्षिणेकडील पठारी प्रदेश.
4.
नद्यांचा विशाल मैदानी प्रदेश.
5.
बेटांच्या समुहाचा प्रदेश.

4. आशिया खंडातील सर्वात उंच पर्वत आणि पठार कोणते ?
उत्तर –हिमालय हा आशियातील सर्वात
उंच पर्वत आहेत आणि हिमालयात असलेले माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर
आहे.तिबेट हे आशियातील सर्वात उंच पठार आहे याला
जगाचे छप्परअसे म्हटले जाते.


5.
आशिया खंडात कोणत्या ऋतूमध्ये जास्त पाऊस पडतो ?
उत्तर –नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे
आशियामध्ये उन्हाळ्यात ज्यादा पाऊस पडतो.

6. आशियातील प्रमुख आहार पिके कोणती ?
उत्तर –तांदूळ आणि गहू ही आशियातील
प्रमुख आहार पिके आहेत.तांदळाचे उत्पादन प्रामुख्याने चीन
, भारत, जपान, बांगलादेश आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये केले जाते, तर गव्हाची लागवड प्रामुख्याने चीन, भारत, पाकिस्तान
आणि आशियाई देशांमध्ये केली जाते.


7.
आशियातील प्रमुख ज्वालाग्रही इंधनाची नावे लिहा. ?
उत्तर –दगडी कोळसा हे आशियातील
महत्त्वपूर्ण जीवाश्म इंधन आहे आणि ते चीन
, भारत, इंडोनेशिया, सायबेरिया आणि मध्य आशियाई देशांमध्ये मुबलक प्रमाणात
आढळते.


8.
आशिया खंडातील कोणत्या भागात लोकसंख्या विरळ आहे ? का?
उत्तर –सायबेरियाचा उत्तर आणि
पूर्वेकडील भाग
,अरबस्तानचे वाळवंट, इराण, भारतातील
थार आणि मध्य आशियातील उच्च प्रदेश अत्यंत थंड
, कोरडेपणा किंवा खडबडीत भूप्रदेशामुळे विरळ लोकवस्तीचे आहेत.


9. ‘
औद्योगिक प्रदेशम्हणजे काय ?
उत्तर –प्रमुख उद्योगधंदे आणि
उद्योगधंद्याला अनुरूप असलेल्या भागाला
औद्योगिक प्रदेशअसे म्हणतात.

 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *