7वी समाज विज्ञान 24. ऑस्ट्रेलिया
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
विषय – स्वाध्याय
पाठ 16 – कर्नाटकाचे एकीकरण आणि सीमावाद
खालील प्रश्नांची
एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. कर्नाटक विद्या
संवर्धक संघाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर – आर.एच.देशपांडे हे कर्नाटक विद्या संवर्धक संघाचे पहिले अध्यक्ष होते.
2. हैदराबाद संस्थानातील कन्नड जिल्ह्यांची नावे
लिहा.
उत्तर – कलबुर्गी, बिदर, रायचूर ही हैदराबाद संस्थानातील कन्नड जिल्ह्यांची नावे
आहेत.
3. ‘कर्नाटक कुलपुरोहित‘ असे कोणाला
म्हणतात ?
उत्तर – अलूर व्यंकटराय यांना ‘कर्नाटक कुलपुरोहित‘ असे म्हणतात.
4. कर्नाटकच्या एकीकरणात योगदान दिलेल्या दोन
संघटनांची नावे लिहा.
उत्तर – कर्नाटक साहित्य परिषद, कर्नाटक सभा या कर्नाटकच्या एकीकरणात योगदान दिलेल्या
संघटना होत्या.
5. कन्नडमधील पहिले राष्ट्रकवी कोण?
उत्तर – गोविंद पै हे कन्नडमधील पहिले राष्ट्रकवी
दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे
लिहा.
1. फजल अली आयोगाच्या
कोणत्या शिफारशीला कन्नडगांनी विरोध केला?
उत्तर – कासरगोड केरळ राज्याला जोडला,बळ्ळारी जिल्ह्यातील काही तालुके आंध्र प्रदेशला जोडले याला
याला कन्नडिगांनी तीव्र विरोध केला.
2. कर्नाटकाचे एकीकरण कधी झाले? एकत्रित
कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर – कर्नाटकाचे एकीकरण 01 नोव्हेंबर 1956 रोजी झाले. एकत्रित कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री एस .
निजलिंगप्पा होते.
टीपा लिहा.
अलूर व्यंकटराव: अलूर
व्यंकटराय यांना ‘कर्नाटक
कुलपुरोहित‘ असे म्हटले जाते.त्यांनी
कर्नाटक राज्य,भाषा आणि संस्कृतीच्या
प्रगतीसाठी झटणारे प्रमुख व्यक्ती होते.कन्नडिगांमध्ये अभिमान जागृत करण्यासाठी ‘कर्नाटकाचे गतवैभव‘ हे पुस्तक प्रकाशित केले.
फजल अली आयोग:केंद्र सरकारने भाषेवर आधारित राज्यांची पुनर्रचना
करण्यासाठी ‘राज्य पुनर्रचना आयोग‘ नेमण्यात आला.फजल अली हे या आयोगाचे अध्यक्ष होते.म्हणून या
आयोगाला फजल अली आयोग असे म्हणतात.या आयोगाने भाषा आणि प्रशासकीय सोयींवर आधारित
राज्यांची पुनर्रचना करण्याची शिफारस केली.या आयोगाच्या शिफारशीनुसार केरळमधील
कासरगोडचा समावेश करण्याला कन्नडिगांनी विरोध केला.