इयत्ता
– नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – राज्यशास्त्र
सुधारित २०२4 पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 6. केंद्र सरकार
स्वाध्याय
रिकाम्या जागा भराः
1. भारत हे संघराज्य आहे.
2. केंद्रीय कामदेमंडळाला संसद असे म्हणतात.
3. राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती हे असतात.
4. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष पूर्ण केलेली असावी.
5. तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात.
6. घटनेच्या 54 व 55 कलमानुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते.
7. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची निवड राष्ट्रपती करतात.
II. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
8. संसदेच्या दोन सभागृहांची नावे सांगा.
उत्तर –संसदेची दोन सभागृहे म्हणजे राज्यसभा (उच्च सभागृह) आणि लोकसभा (कनिष्ठ सभागृह).
9. राज्यसभेची रचना स्पष्ट करा.
उत्तर –राज्यसभेच्या एकूण 250 जागा असून त्यापैकी 238 सदस्य राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशातील सदस्यांद्वारे निवडले जातात आणि साहित्य, कला, विज्ञान आणि सामाजिक कार्य अशा विविध विविध क्षेत्रातील तज्ञांमधून उर्वरित 12 सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात.उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि उपसभापती सदस्यांमधून निवडले जातात.
10.लोकसभा सदस्य होण्यासाठी आवश्यक पात्रता लिहा.
उत्तर – लोकसभेचे सदस्य होण्यासाठी, खालील गोष्टी आवश्यक आहेत:
1) भारताचे नागरिक असावा.
2) किमान वय 25 वर्षे असावे.
3) सरकारी नोकर नसावा.
4) मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
5) कोणत्याही कायद्यानुसार शिक्षा झालेली नसावी.
6) संसदेने वेळोवेळी निर्दिष्ट केल्यानुसार पात्रता असणे.
11. राष्ट्रपतीपदांसाठी निवडणूक प्रक्रिया स्पष्ट करा.
उत्तर – संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (राज्यसभा आणि लोकसभा) निवडून आलेले सदस्य आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते.राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो आणि राष्ट्रपती पुन्हा निवडून येऊ शकतात. महाभियोग प्रस्तावाद्वारे राष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाऊ शकते.
12. पंतप्रधानांच्या अधिकारांची यादी करा.
उत्तर – पंतप्रधानांकडे खालील महत्त्वपूर्ण अधिकार असतात:
a) मंत्र्यांची नियुक्ती आणि बडतर्फ करणे.
b) मंत्र्यांना खात्यांचे वाटप करणे.
c) विविध मंत्र्यांच्या कार्यात समन्वय साधणे.
e) राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करणे.
e) आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे.
f) नियोजन, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित धोरणे तयार करणे.
g) राष्ट्रपती आणि कॅबिनेट मंत्री यांच्यातील दुवा साधणे.
उत्तर –केंद्रीय मंत्रिमंडळ हे प्रत्यक्ष कार्यकारी मंडळ असते आणि मंत्र्यांचे दोन स्तरावर विभाजन होते.कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री.मंत्रिमंडळाची कमाल संख्या संसदेच्या एकूण संख्याबळाच्या 15% असते.कॅबिनेट मंत्री त्यांच्या संबंधित विभागांच्या प्रशासनासाठी जबाबदार असतात.पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांच्या बैठकांचे अध्यक्ष असतात.